धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

नाममंत्राचे सामर्थ्य

नाममंत्र आहे सोपा । अविश्राम चाळी पापा ।।
जो का निश्चय धरील । नाम तया उद्धरील ।।
नर नारी कोणी याती । नाम ठेवे एके पंक्ती ।।
तुका म्हणे या नामाने । कृपा केली भगवंताने ।।

आता ज्या साधूचा अभंग गाईला त्या तुकाराम महाराजांच्या चरित्राची कालच (ता. १६ रोजी) आपण ओळख करून घेतली. ते कसे वाढले, संसारात असताना त्यांनी कसे दिवस काढले, ईश्वराच्या सेवेत ते कसे राहिले, लोकांस त्यांनी सन्मार्ग कसा दाखविला, संकटास त्यांनी कशी पाठ दिली, शत्रूंशीही ते कसे वागले वगैरे अनेक महत्त्वाच्या गोष्टींचे ज्ञान आपण करून घेतले आहे. असे जे साधूंत श्रेष्ठ साधू तुकाराम महाराज त्यांनी सर्वकाल भजनात, देवाच्या सेवेत घालविला हे खरे. पण, त्यांनी आमच्यासाठी मागे काही निरोप ठेविला आहे काय, काही आनंदाची बातमी, काही विश्रामाचे स्थान, संसारात असताना काही समाधानाची जागा असे काही ठेविले आहे, किंवा काही शुभ वर्तमान गाजविले आहे काय, असे वारंवार मनात येते. त्यास ह्या अभंगात संपूर्ण उत्तर मिळणार आहे. होय. तुकाराम महाराजांनी आपल्या मागे मोठा निरोप ठेविला आहे, आनंदाची बातमी आम्हा सर्वांच्यासाठी ठेविली आहे. तथा थकलेल्या भागलेल्यास विश्रांतीचे स्थान ठेविले आहे. आम्ही मात्र आपली तयारी केली पाहिजे. आणि हा निरोप, ही बातमी, हे शुभवर्तमान सर्व काही, ह्या एका अभंगामध्ये भरून आहे. ह्या अभंगाच्या प्रत्येक ओळीमध्ये हे आनंदाचे वर्तमान ओतप्रोत भरलेले आहे. त्याचा स्वीकार करण्याची मात्र आमची तयारी पाहिजे. पहा ह्या अभंगाच्या द्वारे तुकोबा काय संदेश पोहोचवीत आहेत तो !

मनुष्यजन्माचा किती थोर अधिकार आहे ! मनुष्यजन्म प्राप्त होणे म्हणजेच आमची जणू काय पापापासून मुक्तता होणे आहे. परंतु असे असून ह्या (फुट नोट – रविवार ता. १७-३-१९११ रोजी डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या तिस-या जयंतीनिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.) मुक्तीच्या, ह्या पापविमोचनाच्या गोष्टी सांगावयाच्या सोडून आम्ही अधिकाधिक पापात पडतो आणि रात्रंदिवस पापाच्याच गोष्टी सांगतो ! इतर प्राणी पुष्कळ आहेत, सर्प आहेत, वाघ आहेत, सिंह आहेत, दुसरे अनेक हिंस्र पशू आहेत, पक्षी आहेत, त्या सर्वांना आत्मे आहेत. पण त्यांना मन नाही. त्यांच्या ठिकाणी स्वतःच्या संबंधाने काही जागृती नाही. काही जाणीव नाही. यातना होत असल्या तरी कालच्या यातनांची आज आठवण नाही, उद्याविषयीची कल्पना नाही. आम्हांला मन मिळाले आहे, आम्हांला बुद्धी आहे. पापदग्ध करून टाकणारा हा अमोलिक मनुष्यजन्म सापडला आहे. आणि आम्ही त्याचे सार्थक करून घेत नाही. देवाच्या नामाचा हा सोपा मंत्र जणू काय सापडला असून त्याची आम्ही हेळसांड करतो, पापकर्माचा इतका ढीग करतो, परस्परांच्या हेव्यामध्ये इतके गुंततो, संशयाने आपली मने इतकी दूषित करून घेतो, मत्सराने इतके वेडावून जातो, ज्ञानी असून अज्ञानाचा इतका पसारा मांडतो, प्रेम-निष्काम प्रेम-करण्याचे सामर्थ्य आमच्यामध्ये ठेविले असून सूड घेण्याच्या बेतामध्ये इतके गुंग होतो की त्यामुळे अगदी हिंस्र, अगदी क्रूर, अधिक कृतघ्न, अधिक दुष्ट होतो व आपल्या थोर अधिकारास मुकतो ! हे पाहून तुकोबा सांगताहेत असे भांबावू नका, असे सैरावैरा पळू नका. हा नाममंत्र अगदी सोपा आहे. दुसरे लोक जादू टोण्याचे मंत्र पुष्कळ सांगत असतात. परंतु त्या सर्वांहून हा मंत्र सोपा आहे, ह्याचे सामर्थ्य अपार आहे. तुम्ही कितीही अपार पापे केलीत, पापांचे ढीग रचिलेत तरी एका क्षणामध्ये त्यांची राख करून टाकणारा हा मंत्र आहे ! एके बाजूला तुमची अपार पापे आणि दुस-या बाजूला प्रेमाची मूर्ती पण परम सामर्थ्यवान परमेश्व असा हा संबंध आहे. त्यामुळे त्या देवापुढे तुमच्या पापांचा तो काय टिकाव लागणार आहे ? मात्र तुम्ही ह्या सोप्या नाममंत्राचा निश्चयाने आश्रय केला पाहिजे. हा धर्म नवीन आहे म्हणून बुझून जाऊ नका. कोणतीही संकटे आली, कसेही प्रसंग आले तरी देवाचे नाव सोडावयाचे नाही, देवाच्या सेवेला मुकावयाचे नाही त्याचा जो हा मार्ग त्याच्यापासून एक रतिभरही मागे सरावयाचे नाही अशा निर्धाराने, अशा दृढ निश्चयाने ह्या संसारात फिरा, कर्मे करा, वावरा, आनंदाने रहा, सेवेत रत रहा म्हणजे पहा तुमच्या हातून कितीही पापे झाली असली तरी एका क्षणामध्ये ती दग्ध होतील. मात्र तुमच्या ठिकाणी निश्चयाचे बळ असले पाहिजे.

असा ज्यांचा जागता निश्चय आहे, असे ज्यांचे बळ आहे, ते पुरुष आहेत की त्या स्त्रिया आहेत, ते उच्च जातीचे आहेत की ते खालच्या वर्गातील आहेत, ते भाग्यवान की भाग्यहीन आहेत, ते श्रीमंत आहेत की गरीब आहेत, ते अधिकारी आहेत की नाहीत, ह्याचा मग विचार नाही. हे देवाचे नाव सर्वांना एका पंक्तीला नेऊन बसविते. उच्चनीचपदाचे भेद आम्ही क्षुद्र मनुष्यांनी केलेले. धन द्रव्याचे भेद हे निरनिराळ्या कारणांचे, निरनिराळ्या परिस्थितीचे परिणाम होत. नाममंत्राच्या आवारात त्यांचा प्रवेश नाही. तेथे सर्वांची पंगत एक, सर्वांची जात एक, सर्वांचा धर्म एक, मात्र आमचा निर्धार पाहिजे. आमचा निश्चय जितका बलवान तितका ह्या मंत्राचा परिणाम अधिक सुस्पष्ट आमच्या अनुभवास येतो. ह्या निशचयाची, ह्या निर्धाराची, मनाच्या तयारीची आपणाला दोन उदाहरणे सांगतो. गौतमबुद्धांनी लोकांस नवीन वाटणा-या धर्माची स्थापना केली. लोकांना ज्या गोष्टी नवीन वाटत होत्या त्या त्यांनी मोठ्या निर्धाराने प्रचारात आणल्या. पुरातन मार्गाचा त्याग केला. तो मार्ग खरा नव्हे असे सांगत सांगत ते संचार करू लागले. त्यामुळे त्यांस ज्याप्रमाणे अनुयायी मिळाले त्याचप्रमाणे अनेक शत्रूंचीही जोड त्यांना लाभली ! त्यांच्या शुभवर्तमानाच्या योगे ज्यांची चित्तवृत्ती अगदी क्षुब्ध झाली होती, त्यांना हा नवा धर्म अधर्म आहे असे वाटत होते. असे एक गृहस्थ एकदा गौतमबुद्धांपाशी गेले आणि त्यांनी त्यांस मनसोक्त शिव्या देण्यास प्रारंभ केला ! त्यांची त्यांनी वाटेल तशी निर्भर्त्सना केली ! परंतु त्याचा त्यांच्या मनावर काहीही परिणाम झाला नाही ! आम्हांला कोणी एक शिवी देणार असे वाटले की, ती त्याच्याकडून स्पष्टपणे बाहेर येईल अशी आमची वृत्ती होते. मग त्याने एक दिली तर आमच्या दोन होतात, त्याच्या सहा तर आमच्या बारा असे होऊन आम्ही दोघेही जिवंत नरकवासामध्ये लोळू लागतो ! परंतु बुद्धाची ही अशी वृत्ती पाहून त्या ब्राह्मणास मोठा अचंबा वाटला. इतक्या शेलक्या शिव्या दिल्या, इतकी निर्भर्त्सना केली, तरी हा बुवा काही खवळत नाही, ह्याची चित्तवृत्ती क्षुब्ध होत नाही, ह्याची शांती आहे ती आहेच. हे पाहून तोच उलट अधिक क्षुब्ध झाला व म्हणाला, मी इतक्या शिव्यांची लाखोली वाहिली, इतकी निर्भर्त्सना केली, तरी त्याचा आपल्यावर काही परिणाम नाही. आपली पूर्वीची शांती आहे ती आहेच, हे कसे ? बुद्धदेव म्हणाले, “आपल्या होत्या नव्हत्या त्या सर्व शिव्या, सर्व शाप संपले ना ? नसल्यास आणखी चालू द्या. माझे उत्तर अगदी साधे आहे. पहा, कोणी मोठ्या प्रेमाने जर आपल्याला काही भेट आणली, पण त्या भेटीचा जर आपल्याला स्वीकार करावयाचा नसला, तर ते भेटीचे ताट आपण परत करतो, त्याचप्रमाणे मीही करीत आहे. आपली ही मला भेट आहे, हे ताट माझ्यापुढे ठेविले आहे पण ते मला नको आहे, मी त्याचा स्वीकार करीत नाही. आपण ते आणले आहे तसे आपले परत न्या. ते आपले आपल्याजवळच ठेवा !” कोण हा निश्चय, कोण ही शांती ! एकार्थी अशा प्रकारच्या साधू पुरुषाची निर्भर्त्सना करणे हे देखील मोठे पुण्य आहे ! कारण अशा साधूचा प्रत्यक्ष सहवास झाला म्हणजे मग आपली आतील पापे सगळी धुवून निघून आम्ही शुद्ध होतो !

हा असा निश्चय किंवा ही अशी निर्धाराची वृत्ती एकट्या गौतमबुद्धांचीच होती असे नव्हे. त्यांच्या शिष्यांनाही असेच साधन केले होते. एकदा एक शिष्य धर्मप्रचारास जाण्याची परवानगी मागू लागला. त्याची गौतमांनी अनेक प्रकारे समजूत केली, त्याचा निश्चय पाहिला. हा मार्ग नवीन आहे, लोक निर्भर्त्सना करतील, शिव्या देतील असे समजून मी समाधान मानून कामास लागेन असे बुद्धांनी सांगताच मला त्यांनी मारले नाही असे शिष्याचे उत्तर आले ! ‘पण तुला मारही बसण्याचा संभव आहे’ असे गुरूंनी म्हणताच, त्यांनी मला जिवे मारले नाही असे पाहून मी पुन्हा प्रचाराच्या कार्याला लागेन, असे शिष्याने सांगितले. ‘अरे बाबा, हा मार्ग इतका बिकट आहे, लोकांना इतका नावडता आहे की, ते खवळून जाऊन तुझा प्राणही घेतील’ असे बुद्धदेव म्हणाले. “तर मग ह्यापेक्षा आणखी काय पाहिजे ? लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत असता, लोकांच्या सेवेमध्ये असताना मला मरण आले तर ती माझी थोर पुण्याई, तर आता मला आपण मागे ठेवू नका, मला जाऊ द्याच. आपल्या कार्याला लागू द्या”. अशा शिष्याला मागे कोण ठेवणार त्याला नको जाऊ म्हटल्याने तो काय मागे रहाणार !

सारांश अशा प्रकारच्या निश्चयाने ह्या महामंत्राचा आम्ही स्वीकार केला, तर आमच्या अखिल पापांचा तत्काल नाश होईल. आमच्या सहवासाने इतरांच्या, ठिकाणी जागृती होईल. तर त्याचा स्वीकार करिताना आपण गरीब आहो, आपण स्त्री आहोत, आपण हीन जात म्हणून गणलेल्यांपैकी आहो, आपण अज्ञान आहो, आपण आधीच पापराशी आहो, असले विचारच मनात आणावयास नको. एकदा ह्या मंत्राचा स्वीकार करून निश्चयाने आम्ही वावरू लागलो की त्याचे कार्य दिसते, सर्व भेद नष्ट होतात, सर्व दोष नष्ट होतात, आपण शुद्ध होतो, आपण इतरांस शुद्ध करतो, आपण तरतो, इतरांस तारतो, असा हा नाममंत्र आहे, असा त्याचा महिमा तुकोबांनी आपल्याला सांगितला आहे तो आपण लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय करू या.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती