धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

रा. गो. भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने

मधाबद्दल फुलाचे अधिक आभार मानावेत की मधमाशीचे, हे सांगणे एकवेळ सोपे जाईल, पण वरील सद्ग्रंथाचे उत्पादक व संपादक ह्यांच्याविषयी वाचकांची जी उपकृतबुद्धी होणार आहे तिचा निर्णय करणे मुळीच सोपे नाही. फुलातील मधुर द्रव्याची साठवणी केल्याशिवाय त्यास मुळी मधपणाच येत नाही हे जसे खरे आहे तसेच फुलावर लुब्ध होणे हा जो मधमाशीचा आद्यगुण तो तर फुलाशिवाय मुळीच शक्य नाही हेही खरे आहे. प्रस्तुत उत्पादकांनी स्वतः पहिल्या आवृत्तीच्या निवेदनपत्रिकेतच जरी म्हटले आहे, “ह्याविषयी सर्व श्रेय माझे मित्र रा. रा. द्वा. गो. वैद्य ह्यांचेकडे आहे” तरी ह्या पुस्तकाचे श्रेय कोणाकडे आहे, हे ठरविण्याची कठीणता कमी होत नाही. कारण यद्यपि रा. वैद्यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्यात, सर्व तरुणांनी उदाहरण घेण्यासारखा उद्योग आणि उत्साह दाखविला आहे तरी दुसरेपक्षी ज्या गुणांमुळे ते ह्या परमपूज्य गुरुवर्यांचे अनन्य अनुगामी झाले आहेत ते लक्षात आणता त्यांना मिळालेल्या प्रस्तुत श्रेयाचे मूळस्थान पुनः गुरुवर्यच होतात.

आमचे मराठी वाङ्मय अद्यापि कंगाल स्थितीतच आहे, हे कोणी कितीही स्वाभिमानी असला तरी त्याला कबूल करावे लागेल. तशात धर्मपर पुस्तकांची—विशेषतः आधुनिक संस्कृतीला साजेल अशा ग्रंथांची—तर मोठीच उणीव आहे, इतकेच नव्हे तर अशा वाचनाची अद्यापि अभिरुचीदेखील आमच्या वाचकवर्गात उत्पन्न झाली आहे किंवा नाही ह्याबद्दल आजपर्यंत जबर शंकाच वाटत होती. पण थोड्याच काळात रा. वैद्यांना ह्या पुस्तकाची वाढविलेली दुसरी आवृत्ती काढण्याचा प्रसंग आला—नव्हे त्यांनी आणिला ह्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच.

प्रस्तुत पुस्तकाचे ‘धर्मपर लेख’, ‘व्याख्याने’ आणि ‘चरित्र’ असे तीन भाग होतात. पहिल्या म्हणजे लेखांच्या भागाचा काळ म्हणजे प्रार्थनासमाजाच्या जवळजवळ आरंभाचा काळ (१७७८-८२) होता. म्हणून अर्थातच हा (फूट नोट – सुबोध पत्रिका, १२-२-१९११) वादविवादात्मक झाला आहे. डॉ. भांडारकर समाजाचे सभासद होण्यापूर्वी समाजाच्या तत्त्वांची मांडणी व शब्दरचना जी कठोर आणि अपूर्ण होती तिला डॉक्टर साहेबांनी हल्लीचे सौम्य व पूर्ण स्वरूप दिले, इतकेच नव्हे, तर त्यांचा मराठी जाणणा-यांमध्ये अधिक विस्ताराने प्रसार केला. तो ज्या लेखांच्या द्वारे केला त्यांची ही मालिका होय. पूर्वीप्रमाणे हल्ली जरी समाजमताला बाहेरून उघडउघड विरोध येत नाही तरी ह्या भागाची उपयुक्तता कमी झाली आहे असे नाही. कारण समाजमतांची तपशीलवार माहिती करून घेऊ इच्छिणारांना ह्या भागापासून विशेष फायदा होण्यासारखा आहे, इतकेच नव्हे तर स्वतः गुरुवर्यांनीच सावधगिरीची सूचना केल्याप्रमाणे समाजाच्या निषेधक बाजूची पूर्ण जाणीव कायम ठेवण्यासाठी समाजाच्या सभासदांनाही हा भाग आवश्यक आहे.

पण ज्याला सर नारायणरावांनी “Invigorating tonic to the mind, sanctifying discipline of life” (मनाला हुरूप आणणारी पौष्टिक व जीवित शुद्ध करणारी प्रणाली) असे म्हटले आहे, तो भाग म्हणजे व्याख्यानांचाच होय. पहिल्या भागाप्रमाणे ह्यात तोडीस तोड आणि फेकीस फेक हा प्रकार नसल्यामुळे कित्येकांस हा तितका रुचण्याचा संभव नाही. पण वरवर वाचणा-यांच्या करमणुकीकरिता, किंवा कोटीक्रमाची जुळवाजुळव करणा-या वावदुकाकरिता हा भाग नाही. हा विध्यात्मक व पौष्टिक भाग आहे. धर्मपर व्याख्यानाचा अथवा उपदेशाचा उद्देश प्रतिपक्षाचा पाडाव करण्याचा किंवा एकाद्या सिद्धांताची प्रतिपत्ती करण्याचा नसतो. उपदेश हा ईश्वरोपासनेचा एक भाग आहे. ध्यान, भजन, प्रार्थना इत्यादीच्या द्वारा चित्त निर्मळ, निर्लेप आणि ग्रहणशील झाल्यावर अभ्यंतरी उमटणारी, ‘अबोलण्या’ ईश्वराकडून मिळालेली ती एक खूण आहे. हा बसल्या बैठकीला भरकन वाचून टाकण्याचा भाग नव्हे. थकल्या भागल्या वेळी एकच उपदेश वाचला की कार्यभाग होणार आहे. हा निराळाच छापून काढला असता तरी बरे झाले असते. तिसरा भाग चरित्राचा. तो ह्या दुस-या आवृत्तीचा एक विशेष असल्यामुळे हिला विशेष मोहकपणा आला आहे. डॉ. भांडारकरांसारख्या मोठ्या माणसांचे चरित्र म्हणजे एक राष्ट्रीय धनच. ते खरे पाहिले असता ह्याहून पुष्कळच मोठ्या प्रमाणावर संपादित झाले पाहिजे, ते योग्य वेळी होईलच. पण तूर्त हाती घेतलेल्या कार्याला अनुरूप असा लेख लिहून रा. वैद्यांनी वाचकाला डॉक्टरसाहेबांचे विस्तृत चरित्र जाणण्याबद्दल जो चटका लावून दिला आहे, तो वाखाणण्यासारख आहे. रानडे आणि भांडारकर ही दोन्ही नावे त्यांच्या प्रतिपक्ष्याच्याही तोंडी मिळूनच असावयाची. आधुनिक महाराष्ट्र मेरूची ही दोन अति उंच शिखरे. एक अनेक संस्था, चळवळी आणि प्रेरणांची बीजे पेरणारा मुत्सद्दी व दुसरा त्या सर्वांची शास्त्रोक्त उपपत्ती स्थापन करणारा मार्गदर्शक, एक प्रवर्तक, व दुसरा पंडित. पण दोघेही एकाच आधुनिक उदार धर्माच्या मंडपात बसून एकाच राष्ट्रयज्ञाची कामे चालविणारे, परस्परसहाय्यक अध्वर्यू. डॉ. भांडारकर हे केवळ शाळेतील व कॉलेजातीलच अध्यापक नाहीत, तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणेचेही अध्यापक आहेत हे ह्या अल्पशा चरित्रलेखात चांगले दाखविले आहे. विशेषेकरून पहिल्या १७ पानांत त्यांच्या कॉलेजातील अध्यापनाच्या माहितीचा जो साठा केला आहे तसाच पुढील त्यांच्या सुधारण्याच्याही अध्यापनाची माहिती देण्यात आली असती तर बरे झाले असते. पुढील ६० पानांत सामाजिक व धार्मिक मतांची लेखकाने चर्चा केली आहे, ती बहुतेक माहीत असलेली व पुढील भागात आलेलीच आहे. ह्यापेक्षा ह्या मतांच्या प्रसारार्थ डॉक्टरसाहेबांनी व त्यांच्या साथीदारांनी काय काय प्रयत्न केले व त्या कामी त्यांचेवर काय काय प्रसंग गुदरले ह्याचे अधिक दिग्दर्शन ह्याहून थोड्या पानांत केले असते तरी जास्त फायदेशीर झाले असते. अशा गोष्टी डॉक्टरसाहेबांच्या चरित्रात पुष्कळ मिळण्याचा संभव आहे व त्यांपैकी संमतिवयाचे बिल, त्यांच्या कन्येचा पुनर्विवाह वगैरे काही रा. वैद्यांनी दिल्याही आहेत. पण ज्या थोड्या कालावधीत आपला नित्याचा उद्योग सांभाळून ही दुसरी आवृत्ती इतक्या सुंदर रूपाने छापून काढिली तो विचार मनात घेता रा. वैद्यांनी केली आहे हीच कामगिरी मोठी भूषणावह आहे ह्यात संशय नाही. पण ह्याहून विस्तृत चरित्र डॉ. भांडारकरांच्या नावाल शोभण्यासारखे कालानुसार प्रसिद्ध करण्याचे धाडस व पात्रता रा. वैद्यांच्याच अंगी आहे असेही म्हटल्यावाचून राहवत नाही.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती