धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

बहुजन पक्ष

[रा. रा. विठ्ठल रामजी शिंदे हे पुणे शहरातर्फे नव्या कौन्सिलमध्ये निवडून येण्याची खटपट करीत आहेत. त्यांनी ‘बहुजन पक्ष’ असा मथळा देऊन एक विस्तृत लेख बडोद्याच्या जागृती पत्रामध्ये प्रसिद्ध केला आहे. ह्या लेखामध्ये बहुजन समाजाच्या निरनिराळ्या हितसंबंधाचे रा. शिंदे ह्यांनी केलेले विवेचन बोधपर म्हणून पुढे दिले आहे............ संपादक.]

१ शेतकरी- ह्यात डोईजड जमीनदारांचा अथवा पिढीजाद जहागीरदारांचा समावेश मुळीच होऊ शकत नाही जो आपल्या मालकीचे अथवा कौलाचे शेत आपणच वाहतो, आणि त्या कामासाठी पुरेशा मजूरदारांना समान दर्जाचे योग्य वेतन देऊन सांभाळतो, तोच शेतकरी जाणावा. पाश्चात्य देशात अशालाच ‘पेझंट प्रोप्रायटर’ म्हणतात. तो जरी स्वतंत्र असला तरी, धन, विद्या अथवा अधिकार नसल्यामुळे अद्यापि मागासलेला राहिला आहे.

२ शिपाई- ह्यात सरदाराची गणना मुळीच नाही. कारण अधिकारबलामुळे त्यांचा समावेश पुढारलेल्या वर्गात करणे योग्य आहे. हितसंबंधाच्या विरोधामुळे बहुजन पक्षात हे सामील न होणे साहजिकच आहे. पण सामान्य शिपायांचे हितसंबंध आमच्या पक्षानेच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेले आहेत. कुणबी जसा सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमीनदार अथवा जहागीरदार हे केवळ पोष्य, तसाच हातावर शीर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय. तो केवळ पट्टेवाला, चपराशी नव्हे. त्याच्या बळावर किताब मिळविणारे व पिढीजाद पेन्शने झोडणारे सरदार हे जरी जातीने क्षत्रिय असले, तरी ते मागासलेले नसतात. म्हणूनच त्यांच्या हितसंबंधाची काळजी आमच्या पक्षाला वाहण्याचे कारण नाही. पण शिपाईगिरी मात्र आम्ही राखलीच पाहिजे.

३ शिक्षक वर्ग- ह्यात सोवळेशास्त्री हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी ह्याची गणना करिता येत नाही. वाड़मयाचे किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत, आपल्या वृत्तीला पिढीजाद हक्क न सांगता बाजार भावाप्रमाणे चालू वेतन घेण्यास तयार आहेत त्यांची जात, धर्म, देश काही असो, त्यांचे हितसंबंध त्या पक्षाने राखणे जरूर आहे. कारण तेही मागासलेलेच आहेत, व त्यांचे हितसंबंध हे राष्ट्रीय आहेत.

४. उद्यमी- सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी हेही राष्ट्राचे धारक असून ह्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई ह्यांच्यापेक्षा रतीभरही कमी नाही. ते मागासलेले आहेत. नाटकवाले, गोंधळी, शकून सांगणारे जोशी आणि पोवाडे गाणारे शाहीर, वैदू आणि पोरक्या मुलांना पाजणा-या दायांचीही जरूरी प्रसंगविशेषी ह्या बहुजन समाजरूपी बळीराजाला लागते. तर मग त्यांच्या हिताचा विसर त्याला कसा पडेल?

५. दुकानदार- ह्यात व्याज देऊन दुस-याचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत, असे समजावे. परंतु उद्यमी लोकांच्या व मजुरांच्या साहाय्याने जी राष्ट्रीय संपत्ती शेतक-याने निर्माण केली व शिपायाने राखिली तिची देशभर वाटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांचीही तितकीच जरूरी आहे. तोही जोवर मागासलेला राहील तोवर त्याला पुढे आणण्यासाठी आमच्या पक्षाने झटणे अवश्य आहे.

६. मजूर वर्ग- ह्यात बाजार भावाप्रमाणे वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हे तर बुद्धिचातुर्य लढविणारे वकील, डॉक्टर ह्यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबळामुळे आपल्या गरजेपेक्षा जास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही जाऊन सहज बसतो. इतकेच नव्हे तर बहुजन समाजाचे पुढारीपणही त्याच्याच वाट्याला येते. आणि मग सगळीच कालवा कालव होते. असे लोक तत्त्वत: मजूर असले तरी वस्तुत: मागासलेले नसल्यामुळे त्याच्या हितसंबंधाची जोपासना करण्याची जबाबदारी दुर्बळ जनपद पक्षावर न ठेवता त्यांच्या स्वत:वरच ठेवणे अगदी योग्य होईल. बाकी उरलेल्या ख-या आणि अंगमेहनती मजुरांची दाद तर आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेच लागणे शक्य नाही. बाजार भावाप्रमाणे आपल्या मजुरीचे दर, कामाची वेळ, विश्रांतीच्या अटी, बाळपण, आजारीपण, म्हातरपण, कौटुंबिक आणि स्त्रीपणाच्या आपत्ती इत्यादी कारणावरून उदभवणारे हक्क वगैरेची मागणी करण्यास हा वर्ग मोकळा आहे, ह्याविषयी तर प्रश्नच नाही. पण ही मागणी राष्ट्राचे समवाय-हित सांभाळून ती पूर्ण रीतीने वसूल करून घेण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी येईल अशी संघशक्ती त्यांच्यामध्ये आणणे हे ह्या पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे जरूरीचे आणि कठीण असे कर्तव्य आहे. तथापि, हा पक्ष म्हणजे केवळ मजूर पक्षच नव्हे, तो जनपद पक्ष असल्यामुळे सर्व राष्ट्राचा पक्ष आहे. मजूर डोईजड झाल्यास त्याची समजूत  करण्याचाही अधिकार सर्वापेक्षा ह्या पक्षाला जास्त आहे.

७. अस्पृश्यवर्ग- अस्पृश्यपणामुळे हा वर्ग मागासलेला आहे, इतकेच नव्हे तर चिरडला गेला आहे. धर्माची, परंपरेची, रूढीची अगर दुसरी कोणतीही खरी खोटी कारणे न सांगत बसता ह्या वर्गाची अस्पृश्यता व असाह्यता पूर्णपणे नष्ट करून त्यांना अगदी समान दर्जाने बहुजन समाजात एकजीव करणे हे ह्या पक्षाचे केवळ पवित्र काम आहे. ते तातडीने केले तरच धडगत आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादात, ढोंगी ठरावात आणि मतलबी सहानुभूतीत अगोदरच दवडली गेली असल्यामुळे त्या वर्गातील काही व्यक्तींना साहाजिकपणे भलतेच वळणही लागून चुकले आहे. ही ठेच खाऊनही आमच्या पक्षाचे डोळे उघडले नाहीत तर ते कायमचेच झाकलेले बरे, असे म्हणण्याची पाळी जवळ येऊन ठेपली आहे.

८. स्त्रीवर्ग- चालू राज्यक्रांतीत आमच्या देशातील स्त्रीवर्गाचे हाती काहीच लाभले नाही म्हणून आमच्या पक्षाने हताश होण्याचे कारण नाही. उलटपक्षी आमचा पक्ष विद्वानांचा नाही, वक्त्यांचा नाही, ओरडणारांचा नाही, म्हणून तो स्त्रीवर्गाला विसरणारांचा आहे असे थोडेच होणार आहे! स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा. त्यांची हयगय करू तर पाळण्यातच आमचे थडगे डोलू लागेल हे आम्ही जाणून आहो.

धर्म, जीवन व तत्त्वज्ञान

  संपादकीय
  पुरस्कार
विभाग पहिला : प्रवासवर्णन
 - जलप्रवास
 - मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ व ते
     पाहून सुचलेले विचार
 - लंडन शहर
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 - सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला
    विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुड फ्रायडे
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड
    येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - पृथ्वीच्या पोटात ४४० यार्डाखाली
 - जनातून वनात आणि परत
 - बंगलूरच्या रस्त्यातील एक फेरी
 - मंगळूर येथील काही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 - शांतिनिकेतन
 - सह्याद्रीवरुन-१
 - सह्याद्रीवरुन-२
 विभाग दुसरा : धर्मपर लेख
 - युनिटेरियन समाज
 - इंग्लंडातील आधुनिक धर्मविषयक
   चळवळ आणि लिव्हरपूल
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - ब्राह्मसमाज व आर्यसमाज (ह्यातील
    हल्लीचे साम्य,भेद व पुढे ऐक्यार्थ यत्न)
 - धर्मजागृती
 - निवृत्ती व प्रवृत्ती आणि अवतारवाद व विकासवाद
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्म जीर्णोद्धार
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसती
 -  हिंदुस्थानातील उदार धर्म
 - कौटुंबिक उपासनेच्यावेळी केलेला
    उपदेश देवाचा व आपला संबंध
 - आवड आणि प्रीती
 - स्तुती, निर्भत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्त्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 - धर्मप्रसारार्थ स्वानुभवाची आवश्यकता
 - ब्राह्म आणि प्रार्थनासमाजास एक विनंती
 - दास्यभक्तीची ध्वजा
 - प्रेमसंदेश
प्रो. ऑयकेन ह्यांची जीवनमीमांसा
 - धर्म-१
 - धर्म-२
 - नीती-१
 - नीती-२
 - नीती-३
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-१
 - शास्त्र आणि तत्वज्ञान-२
 - सार्वजनिक नित्य व नैमित्तिक
    उपासनेच्यावेळी केलेले उपदेश
 - संतांचा धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म, समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 - धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवी श्रद्धा-१
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ती -२
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना -३
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ती-४
 - परमार्थाची प्रापंचिक साधने-५
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 - धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ती, विश्वास आणि मते
 - व्यक्तित्वविकास
 - स्त्री-दैवत
 - दान आणि ऋण
 - राज्यरोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - मनुष्यजन्माची सार्थकता
 - आपुलिया बळे घालावी हे कास
 - कालियामर्दन
विभाग तिसरा : इतर लेख
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 -  स्वराज्य आणि स्वाराज्य
 - देशभक्ती आणि देवभक्ती
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - रा.गो.भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमाज अप्रिय असल्यास तो का?
 - राजा राममोहन रॉय
 - मुरळी अथवा पश्चिम हिंदुस्थानातील हिंदू
    देवळांतील अनितिमूलक आणि बीभत्स प्रकार
 - श्रीशाहू छत्रपतींच्या मनाचा विकास
 - रावसाहेब थोरात ह्यांच्या "बोधमृत" ला प्रस्तावना
 - जमखिंडी येथील परशुरामभाऊ हायस्कूलचा
    सुवर्णमहोत्सव
 - थोरल्या शाहू महाराजांच्या कारकीर्दीचे मराठ्यांच्या
    इतिहासातील महत्त्व
 - डॉ. भांडारकरांस मानपत्र
 - मराठी भाषेद्वारा ब्राह्मधर्माचा प्रचार
 - राजा राममोहन व बुवाबाजी
 - प्रार्थनासमाजाचा एक नमुना
 - क्षात्रधर्म
 - स्वराज्य विरुद्ध जातिभेद
 - इतिहास, संशोधन व भाषाशास्त्र
 - गुन्हेगार जातीची सुधारणा
 - निराश्रित साह्यकारी मंडळी
 - वाई प्रार्थना संघ मंदिर प्रवेश
 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन
 - साधारण ब्राह्मसमाजाची पन्नास वर्षे
 - निराश्रित साहाय्य
 - मुंबई येथील मानपत्रास उत्तर
 - सत्यशोधकांना इशारा अथवा नव्या पिढीचे राजकारण
 - बंदिस्त बळीराजा
 - सही नाही; सहानुभूती!
 - टिळकांच्या मानपत्रास विरोध
 - A Scientific Catechism
 - Gleanings from Periodicals
 - The Arya Samaj of India
 - Liberal Religion in Japan
 - The New Light of Persia
 - Liberal Christianity in Europe
 - Unitarianism in England and America 
विभाग चौथा : परिशिष्टे
 - महर्षी शिंदे ह्यांचे पहिले कीर्तन
 - रामजी बसाप्पा शिंदे ह्यांचा मृत्यू
 - लाहोर येथील धर्मपरिषद

 - कोल्हापूर येथील धर्मविषयक चळवळ व

    प्रगतीपत्रातील अहवाल

 - विसावे व्याख्यान
 - आख्यान
 - महाराष्ट्र सुधारक आगळा
 - भगिनी जनाबाई ह्यांची स्मृतिचित्रे
 - परलोकवासी विठ्ठल रामजी शिंदे
 -  The Late Mr. V. R. Shinde
 - कै. अण्णासाहेब शिंदे, चरित्र व कार्य
 - प.वा. अण्णासाहेब शिंदे
 - व-हाड मध्यप्रांतीय सत्यशोधक हीरक महोत्सव
 - १९ मार्च १९३३-७१ वा वाढदिवस
 - श्री. महाराजांचे अस्पृश्योद्धारक कार्य-श्रीमंत
   सयाजीराव गायकवाड
 - दांभिक देशभक्तापेक्षा
 - धर्मरहस्य अथवा अंत्यजोद्धार
 - लाहोर येथील धर्म परिषद
 - आपुले स्वहित करावे पै आधी
 - सुखवाद व सुखाची साधने
 - लुटूपुटूची पार्लमेंट
 - बहाई समाजाचा ब्राह्मसमाजास संदेश
 - प्रेमाचा विकास
 - भोकरवाडी येथील आपत्ती
 - सुधारकांची जुनी परंपरा (स्फुट)
 - सुधारकच हिंदूधर्माचे खरे रक्षक
 - निष्ठा व नास्तिक्य
 - विठ्ठल रामजी शिंदे व श्री शाहू छत्रपती
 - विठ्ठल रामजी शिंदे व सयाजीराव गायकवाड
 - विठ्ठल रामजी शिंदे व महात्मा गांधी
 - वि.रा. शिंदे व राजाराम छत्रपती
 - विजापूर येथी धर्मकार्य, विजापूर
 - सोमवंशीय सन्मार्गदर्शक समाज
 - रोगनिवारक प्रयत्न-एक निकडीची विनंती
 - कवित्व आणि भरारी
 - मोफत व सक्तीचे शिक्षण नको !!
 - बहुजन पक्ष
 - डी.सी.मिशनचा १७ वा वाढदिवस
 - अहंकार नासाभेद
 - यश परिणामात नसून प्रयत्नात आहे.
 -  Maharashtra Provincial Social Conference
 - प्रांतिक सामाजिक परिषद-सातारा
 - शिवाजी की रामदास?
 - बडोदे-तत्वज्ञान व समाजशास्त्र विभागाचे अध्यक्ष
 - श्री. विठ्ठल रामजी शिंदे व सुबोध पत्रिका
 - कै. डॉ. संतूजी रामजी लाड
 - मागासलेले व अस्पृश्य
 -  Shree V. R. Shinde’s Work
 - पुण्यातील मानपत्रास उत्तर
-   Liberal Religion in India
- वाई ब्राह्मोसमाज-विश्वास लेख
 - गुरुवर्य शिंदे सूक्ती