लेख, व्याख्याने आणि उपदेश

देवाचा व आपला संबंध

(रा. रा. नारायणराव पंडित यांच्या घरीं एका कौटुंबिक उपासनेच्या वेळीं झालेल्या उपदेशाचें साधारण स्वरूप.)

आपल्याला व्यवहारामध्यें नित्य असा अनुभव येतो कीं पुष्कळांचा व देवाचा संबंध साधारणपणे दोन प्रकारचा असतो. हे दोन्ही संबंध उदाहरणाने चांगल्या रीतीने दाखविता येतील म्हणून केवळ उदाहरणासाठीच मी असे म्हणतो की, परमेश्वराचा व मनुष्याचा संबंध साधारणपणे एकादी तरूण स्त्री व तरूण पुरूष ह्यांच्या संबंधासारखा असतो. एवढे म्हटल्याने आपल्याला माझ्या विचारांची काहीच कल्पना होणे नाही. म्हणून थोडे अधिक स्पष्टीकरण करितो. आमच्या स्त्रिया जात्याच लाजाळू असतात, त्यांच्यात जो विनय असतो, जो लाजाळूपणा असतो, त्याचा अतिरेक न झाला तर तो त्यांस फारच शोभतो. विनयाचा, लाजाळूपणाचा अतिरेक म्हणजे कोणाच्या वा-यास केव्हाच उभे न राहणे व कोणी कितीही सदबुद्धीने, कितीही चांगल्या रीतीने काहीही विचारिले तरी त्याचे उत्तर न देता दूर उभे राहणे किंवा दूर निघून जाणे. विनयाच्या ह्या अतिरेकाशी आपल्याला काही कर्तव्य नाही. आमच्या स्त्रियांमध्ये सर्वसाधारण सा जो विनय आढळून येतो तो हा की, पर पुरूषाशी अगदी सरळ असे दोन शब्द बोलण्यासही लज्जा वाटावयाची. त्याचा व आपला काही संबंध नाही, ओळख नाही, परिचय नाही, तो आपणांस अगदीच परका म्हणून त्याच्याशी एक अक्षरही बोलावयचे नाही, ही एक स्थिती. ह्या स्थितीचे कारण परिचयाचा अभाव. दुसरी जी स्थिती तिचे कारण अति परिचय. स्त्री-पुरूषाचा अशा संबंध की स्त्रीला पुरूषाच्या बद्दल काही आदर नाही, त्याच्याविषयी काही पूज्यभाव नाही. त्याच्याशी वाटेल त्या वल्गना करण्यास काही वाटत नाही. त्याचा पाणउतारा करण्यात आपल्या हातून काही अनुचित कार्य घडत आहे ह्याची जागृती नाही. त्याला आपली उत्तरे टोचतील ह्याची पर्वा नाही. हा संबंध आपण अत्यंत त्याज्य असे समजतो, हे ठीकच आहे, परंतु असा संबंध आपल्या लक्षात कधी कधी येऊन चुकतो ह्यात काही संशय नाही. खरे पाहता ह्या दोन अपूर्ण संबंधांहून निराळा एक तिसरा पूर्ण संबंध आहे. स्त्री व पुरूष ह्यांचा संबंध एक तर पहिल्या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अपरिचयाचा किंवा दुस-या उदाहरणात दाखविल्याप्रमाणे अतिपरिचयाचा असाच सला पाहिजे असे नाही. त्यांच्यात तिसरा एक पूर्ण परिचयाचा दैवी संबंध असू शकतो. त्याच्या योगे परस्परांस परस्परांची योग्यता कळून चुकते. कोण कोणाहून श्रेष्ठ आहे, कोणामध्ये कोणते गुण अधिक आहेत, त्याची छाप कोणावर कशी पडते हे जाणणारा, एक दुस-यावर निर्मळ प्रेम करणारा, पण आदराने वागणारा असा तो संबंध असतो. असा संबंध जडला म्हणजे तेथे प्रेमाचे सारखे वर्धन होत असते. विचारास विचार जुळतात. आणि तो संबंध केवळ स्वर्गीय संबंध होय. असा संबंध असणा-या व्यक्ती मग पतिपत्नी असोत किंवा मित्रमित्र असोत.

आता जे आम्ही आपल्याला प्रार्थनासमाजाचे म्हणून म्हणवितो त्या आम्हांमध्ये पहिल्या दोन्ही उदारणांत दाखविलेली स्थिती नसली पाहिजे. ती आमच्यात न यावी म्हणून आम्ही फार जपले पाहिजे. पण ह्या दोन्ही प्रकारचा आम्हांस केव्हाच अनुभव येत नाही असे आपल्याला म्हणता यावयाचे नाही. देव अत्यंत करणाघन, दयाघन, मग त्याच्या जवळ जावयास आम्हांला लाज का वाटावी? आमचे मन का कचरावे? पण, प्रार्थना करा असे म्हटले असता टाळाटाळी करणारे व उघडपणे नाही म्हणणारे तरूण व प्रौढ आपल्याला आढळत असतील, मला आढळलेही आहेत व नित्य आढळतात. प्रार्थना करण्यास केव्हाही तयार न होणे म्हणजे काय तर देवापुढे जाण्यास लाजणे होय. माझा व ह्या मनुष्याचा काही परिचय नाही, त्याचे नाव फार तर मी इतरांच्या तोंडून ऐकलेले. त्याच्यापाशी मी काय बोलू? त्यास मी काय विचारू? हा भाव जसा त्या तरूणीत आढळून येतो व ती त्या माणसाच्या वा-यास उभी राहत नाही, त्यास टाळते, त्याचप्रमामे आमचे कित्येक तरूण करीत असतात. देव प्रेमाचे भातुके हाती घेऊन प्रेमाने आम्हांला पाचारीत असता आम्ही त्याला पाठमोरे होतो, त्याच्या अंकी बसून त्याच्या प्रेमाचा लाभ घेण्यास आम्ही धजत नाही. हा असला संबंध आम्ही टाळला पाहिजे. देवापाशी जाण्यास आम्ही लाजणे म्हणजे आम्ही आमच्या हानीस कारण होणे होय हे लक्षात ठेविले पाहिजे.

परंतु देवाशी अतिपरिचय होणे म्हणजे काय ते कदाचित तत्क्षणी आपल्या लक्षात यावयाचे नाही. कारण देवशी आमचा परिचय घडावयाची जेथे मारामार तेथे अतिपरिचय होऊन पुढे अवज्ञा कशी होणार? होय, आमचा देवाशी अतिपरिचय होतो आणि त्यामुळे त्याची आम्ही अवज्ञाही करतो, त्याचा व आमचा काय संबंध आहे हे अगदी विसरतो. त्याची योग्यता विसरतो व त्यास आम्ही केवळ निर्जीवाहून निर्जीव दुर्बळाहून दुर्बळ असा करून टाकितो आणि हे केवळ संवयीच्या जोरावर आम्ही करीत असतो. कल्पना करा की एकाद्या माणसाला रोज प्रार्थना करण्याची, भजन करण्याची सवय आहे असा मनुष्य त्याच्या मनाची तयारी नसली, मन अत्यंत मलिन, पापविचारानी भरलेले असे जरी असले तरी देवापाशी जाऊन त्याची स्तुती, त्याची प्रार्थना करण्यास, त्याचा म्हणवून घेण्यास मागेपुढे पहात नाही आपले कुटिल विचार सर्वज्ञ देव जाणून आहे, आपले अशुद्ध अंत:करण त्यास चांगले दिसत आहे, आपला वरपांगी व बेगडी भक्तिभाव त्यास केव्हाच कळून चुकलेला आहे हे तो विसरतो, व सात्विक भक्तिभावाचा आव आणून आपणा स्वत:स फसवून घेतो. अशा वेळी सर्वज्ञ, सर्वसमर्थ, जो देव त्यास मूढाहून मूढ, दुबळ्याहून दुबळा तो करून टाकतो नाही तर काय? हा मनुष्य आधी किती तरी दुबळा आणि मलिन, पण ती मलिन स्थिती देवाला न कळण्यासाठी वर बेमुर्वतीचे वर्तन असे मी समजतो. आम्ही प्रार्थनासमाजिक, जे आम्ही वारंवार प्रार्थना व भजन करणारे त्यांच्यात हा दांभिक भाव शिरण्याचा संभव आहे. म्हणून आम्ही त्यापासून दूर रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. देवावर आमचे प्रेम पाहिजे. पण, त्याच्यासंबंधाने आमच्या ठिकाणी आदरभाव पाहिजे, भीतीही पाहिजे. एकादे चांगल्या वळणातील मूल पहा, त्याचे आपल्या आईवर प्रेम नसते काय? बापावरही प्रेम असते. ते मूल आईबापाशी फार सलोख्याने वागते. पण, त्याच्या संबंधाने त्याचे ठिकाणी किती आदर, त्यांचा त्यास किती वचक असतो. तेच लाडाने बिघडलेले किंवा इतर वाईट मुलांच्या सहवासाने उद्दाम बनलेले मूल घ्या. त्यास आपल्या आईबापासंबंधाने काही क्षिती वाटत नाही. त्यांच्या समोर ते वाटेल ती ढोंगे करील, खोटे बोलून वेळां मारून नेईल, सर्व काही करील. आमचा व देवाचा संबंध असा अवज्ञा करण्यापर्यंत केव्हाही येऊ नये. तो अनंत, आम्ही सान्ताहून सान्त, तो सर्वज्ञ, आम्ही आपणास अल्पज्ञ म्हणविणे म्हणजेही आम्ही आमच्या ज्ञानाची घमेंड दाखविणे होय. तो सर्वसमर्थ आणि आम्ही त्याचे प्रेमास अपात्र, तो न्यायी आणि आम्ही अन्यायाकडे सदा धावणारे असा त्याच्यामध्ये व आमच्यामध्ये भेदभाव आहे. हा भेदभाव ओळखून, त्यास वचकून असले पाहिजे. त्याच्यापुढे जावयाचे तर अंत:करण शुद्ध करून, मलिन भाव शुद्ध करून आम्ही गेले पाहिजे. निदान अंत:करण मलिन आहे हे त्याजपाशी अनुतापपूर्वक कबूल तरी केले पाहिजे. त्या मलिन स्थितीवर जाणूनबुजून आवरण घालण्याचा तरी प्रयत्न होतां कामा नये.

लेख, व्याख्याने आणि उपदेश

   प्रस्तावना
   शिंदे यांचे त्रोटक चरित्र
 भाग पहिला-लेख
 - जलप्रवास
 -  मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ
 - लंडन शहर.
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 -  सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुडफ्रायडे येथील उल्हास
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - युनिटेरिअन् समाज
 - इंग्लडांतील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि
    लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरिअन् परिषद
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 - पृथ्वीच्या पोटांत ४४० यार्डीखाली
 - जनांतून वनांत आणि परत
 -  जन आणि वन
 -  बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट
 -  वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा
 -  स्कॉच सरोवरांत
 -  बेन लोमंड शिखरावरील समाधि
 - बंगळूरच्या रस्त्यांतील एक फेरी
 -  मंगळूर येथील कांही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 -  शांतिनिकेतन बोलपूर
 - रा. गो. भांडारकर यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमजा अप्रिय असल्यास तो का?
 -  मुरळी
 - बहिष्कृत भारत
 - निराश्रित साहाय्यक मंडळ
 - भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाची संस्थापना
भाग दुसरा - व्याख्याने
 -  डॉ. भांडारकरांस मानपत्र
 -  ब्राह्मसमाज व आर्यसमाज
 - धर्मजागृति
 - निवृत्ति व प्रवृत्ति आणि अवतार बाद व विकासवाद
 - राजा राममोहन राय
 - देशभक्ति आणि देवभक्ति
 - स्वराज्य आणि स्वाराज्य
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्माचा जीर्णोद्धार
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - एकनाथ व अस्पृश्य जाति
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसति
 - हिंदुस्थानांतील उदार धर्म
 भाग तिसरा - उपदेश
 - आवड आणि प्रीति
 -  देवाचा व आपला संबंधविषय
 - स्तुति, निर्मत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 स्त्रीदैवत
 दान आणि ऋण
 - राज्यारोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति
 - कर्मयोग
 - संतांचा-धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 -  धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवि श्रद्धा
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ति
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति
 - परमार्थाची प्रापंचिक साधने
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 -  धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ति, विश्वास आणि मतें.
 - व्यक्तित्वविकास
 -  मनुष्यजन्माची सार्थकता
 - 'आपुलिया वेळी घालावी हे कास'
 - कालियामर्दन