लेख, व्याख्याने आणि उपदेश

प्रेमप्रकाश

(रा. रा. द्वा. गो. वैद्य यांच्या मातोश्रीच्या आद्यश्राद्धानिमित्त केलेल्या उपदेशाचा सारांश.)

पुत्र वित्त वारा गृहादि सकळ ।। देऊनि दयाळ वाट पाहे ।।
देवाचे मनांत मज हे ध्यातील ।। अंती पावतील निजपद ।।
सोडूनि देवासि गुंतले दोरासी ।। झाले अविश्वासी विश्वंभरीं ।।
तुका म्हणे फार भुलूनिया मेले ।। विरळा लागले हरिपायीं ।।

ह्या अभंगातील उक्ती विचार करण्यासारखी आहे. देवाने पुत्र, वित्त, दारा देऊन गृह निर्माण केले व त्या घरामध्ये अशी एक प्रेमाची ज्योत उत्पन्न केली की त्या ज्योतीच्या प्रकाशामुळे कुटुंबातील माणसे एकमेकांस स्पष्ट दिसतात, आपणांस नेत्र आहेत पण बाहेरच्या व आतल्या गोष्टींचे संनिकर्ष करणारा प्रकाश नसता तर त्या नेत्राचा काहीएक उपयोग होणार नाही. त्याचप्रमाणे धैर्य, सहनशीलता वगैरे प्रेमाची अधिष्ठाने असूनही प्रेमाचा प्रकाश पडला नाही तर त्याचा काहीएक उपयोग होणार नाही, म्हणजे जड सृष्टीमध्ये प्रकाश हे कार्य करतो. ह्या प्रेमप्रकाशातूनच पुत्र, पती, पत्नी, बंधू, भगिनी, माता, पिता ही सर्व संबंधाच्या योगे एकत्र झालेली माणसे परस्परांस स्पष्ट दिसतात. बाह्य सृष्टीतील प्रकाशामुळे पदार्थ जसा स्पष्ट दिसतो, त्याचप्रमाणे डोळ्यांस अंधारी येऊन सूक्ष्म पदार्थही दिसत नाही किंवा तो आहे त्यापेक्षा निराळा दिसतो, त्याचप्रमाणे प्रेम हे डोळ्यांना डोळेपण देणारे आहे तसेच आंधळेपणही देणारे आहे. म्हणजे प्रेमाच्या प्रकाशातून स्वत:च्या संबंधी माणसाचे गुण जेवढे दिसतात, तेवढे अवगुण दिसत नाहीत. माता केवळ बालकाच्या लाघवाने मोहीत स्वकर्तव्यास कधी कधी विसरते. पण साधारणपणे मनुष्याच्या अंगी जाणीवबुद्धी असेल तर स्वयंस्फूर्तीने व स्वयंशक्तीने प्रेमाच्या प्रकाशाच्या साहाय्याने घरातील मंडळीचे गुणावगुण दिसतील म्हणजे मग आपण प्रेमाच्या प्रवाहात सापडून ईश्वराकडे सहजगत्या चाललो आहो हे आढळून येईल. ह्याकरिता एकमेकांविषयी यथार्थ ज्ञान होण्यास प्रेमप्रकाश ही ईश्वराची एक योजना आहे. ह्या योजनेमुळे आपणांस ईश्वराबद्दलचे ज्ञान प्राप्त होते. पण ह्या प्रकाशाचा योग्य उपयोग केला नाही तर देवास विसरून दोरीवर प्रेम बसते. म्हणजे हा प्रेमप्रकाश ज्याने उत्पन्न केला त्यासच आपण ओळखीत नाही. देव हा गारूड्याप्रमाणे आपल्याकडून खेळ करवून शेवटी आपल्या सर्वांना स्वत:कडे खेचतो, ह्यात त्याचा स्वार्थ नसून आपणांस निजपद प्राप्त करून देण्याचा त्याचा हेतू असतो. ह्याकरिता आपणांस आपला पुढचा मार्ग सुलभ करणे असेल तर आपण आपल्या गृहातील माणसांच्याच गुणावगुणांचे निरीक्षण करावे. मात्र अवगुण काढून टाकण्याची जेव्हा त्यांना संधी प्राप्त झाली तेव्हा ती संधी त्यांनी साधली की नाही ह्याचे योग्य निरीक्षण करावे व त्यापासून आपण धडा घ्यावा म्हणजे आपोआप आपण निजपदास जाऊ. तुकारामांनी अभंगात सांगितल्याप्रमाणे पुत्र, वित्त, घर, दार, आपणास देऊन तो द्याळू परमेश्वर आपण निजपद अंती पावू अशी वाट पहात बसला आहे तर ह्याची पूर्ण गाठ बांधून ज्याने प्रेमप्रकाश निर्माण केला त्या प्रभूला आपण ओळखावे आणि ते घरातील कुटुंबाच्या गुणावगुणांच्या निरीक्षणानेच उत्तम साधले जाईल, शेजा-यावर, देशावर, राष्ट्रावर प्रीती ठेवून ईश्वरास ओळखणे हा निराळा मार्ग, पण सोपा म्हणजे वर सांगितलेलाच होय.

लेख, व्याख्याने आणि उपदेश

   प्रस्तावना
   शिंदे यांचे त्रोटक चरित्र
 भाग पहिला-लेख
 - जलप्रवास
 -  मार्सेय शहर
 - पॅरीस शहर
 - नॉटर डेम द ला गार्ड देऊळ
 - लंडन शहर.
 - ब्रिटिश म्युझिअम
 - लंडन येथील बालहत्यानिवारक गृह
 -  सोमयागाचे वर्णन वाचून वाटलेला विस्मय व विषाद
 - डेव्हनपोर्ट येथील गुडफ्रायडे येथील उल्हास
 - बोअर युद्धाचा शेवट व ऑक्सफर्ड येथील उल्हास
 - राष्ट्रीय निराशा
 - बर्टन खेड्यातील शाळा कशी दिसली?
 - विभूतीपूजा
 - मॅंचेस्टर कॉलेज
 - युनिटेरिअन् समाज
 - इंग्लडांतील आधुनिक धर्मविषयक चळवळ आणि
    लिव्हरपूल येथील त्रैवार्षिक युनिटेरिअन् परिषद
 - सुशिक्षित धर्मभगिनींस अनावृत पत्र
 - आपला व खालील प्राण्यांचा संबंध
 - पृथ्वीच्या पोटांत ४४० यार्डीखाली
 - जनांतून वनांत आणि परत
 -  जन आणि वन
 -  बॉरोडेलमधील प्रार्थना व भेट
 -  वर्डस्वर्थ भेट आणि डव्ह कॉटेजची यात्रा
 -  स्कॉच सरोवरांत
 -  बेन लोमंड शिखरावरील समाधि
 - बंगळूरच्या रस्त्यांतील एक फेरी
 -  मंगळूर येथील कांही विशेष गोष्टी
 - बंगालची सफर
 -  शांतिनिकेतन बोलपूर
 - रा. गो. भांडारकर यांचे धर्मपर लेख व व्याख्याने
 - प्रार्थनासमजा अप्रिय असल्यास तो का?
 -  मुरळी
 - बहिष्कृत भारत
 - निराश्रित साहाय्यक मंडळ
 - भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळाची संस्थापना
भाग दुसरा - व्याख्याने
 -  डॉ. भांडारकरांस मानपत्र
 -  ब्राह्मसमाज व आर्यसमाज
 - धर्मजागृति
 - निवृत्ति व प्रवृत्ति आणि अवतार बाद व विकासवाद
 - राजा राममोहन राय
 - देशभक्ति आणि देवभक्ति
 - स्वराज्य आणि स्वाराज्य
 - ईश्वर आणि विश्वास
 - बौद्धधर्माचा जीर्णोद्धार
 - समाजसेवेची मूलतत्वे
 - ब्राह्मधर्म व ब्राह्मसमाज
 - एकनाथ व अस्पृश्य जाति
 - निराश्रित साहाय्यकारी मंडळी व आक्षेपनिरसन
 - आत्म्याची यात्रा
 - आत्म्याची वसति
 - हिंदुस्थानांतील उदार धर्म
 भाग तिसरा - उपदेश
 - आवड आणि प्रीति
 -  देवाचा व आपला संबंधविषय
 - स्तुति, निर्मत्सना व निंदा
 - विनोदाचे महत्व
 - प्रेमप्रकाश
 - संग व विषय
 - मरण म्हणजे काय?
 स्त्रीदैवत
 दान आणि ऋण
 - राज्यारोहण
 - नाममंत्राचे सामर्थ्य
 - डिप्रेस्ड क्लासेस मिशनची चवथी जयंति
 - कर्मयोग
 - संतांचा-धर्म आणि राष्ट्राचा उत्कर्ष
 - धर्म समाज आणि परिषद
 - धर्मसंघाची आवश्यकता
 - विनययोग
 - शासनयोग
 - पितृशासन
 - गुरुशासन
 - राजशासन
 -  धर्म आणि व्यवहार
 - प्रेरणा आणि प्रयत्न
 - मानवी आदर आणि दैवि श्रद्धा
 - मानवी स्नेह आणि ईश्वरभक्ति
 - मनुष्यसेवा आणि ईश्वरोपासना
 - मनाची प्रसन्नता आणि मोक्षप्राप्ति
 - परमार्थाची प्रापंचिक साधने
 - आधुनिक युग आणि ब्राह्मसमाज
 -  धर्मसाधन
 - नैराश्यवाद
 - आनंदवाद
 - संसारसुखाची साधने
 - वृत्ति, विश्वास आणि मतें.
 - व्यक्तित्वविकास
 -  मनुष्यजन्माची सार्थकता
 - 'आपुलिया वेळी घालावी हे कास'
 - कालियामर्दन