शिंदे लेखसंग्रह

भागवत धर्म

अतिसंक्षेकानें वर वैदिक धर्माचें लक्षण सांगितलें. आतां भागवत धर्माचें अगदीं थोडक्यांत लक्षण ओळखावयाचें आहे. ईश्वराचें केवळ संख्यावाचक एकत्व हें भागवत धर्माचें लक्षण नव्हे. निदान तें मुख्य लक्षणें तरी नव्हे. भागवत धर्माचें मुख्य लक्षण भक्ति (प्रेम) आणि श्रद्धा (विश्वास) हींच होत. हा भगवत् किंवा भगवान् एक आहे कीं अनेक आहेत, तो कोणी ऐतिहासिक पुरुष होता किंवा तत्त्व दृष्टीनें ओळखली जाणारी एक कैवल्य वस्तु (Metaphysical Absolute) होती, वगैरे विषय तत्त्वज्ञानाचे आहेत. ह्या विषयांचा धर्माशीं संबंध आहे, पण तेच विषय म्हणजे धर्म नव्हत. निदान भागवत धर्म नव्हत. अशी या विवेचनापूर्वी तरी माझी समजूत आहे. कर्म, ज्ञान, वैराग्य आणि भक्ति अशा मानवी मनाच्या चार अवस्था आहेत. त्यांपैकीं शेवटची अवस्था भागवत धर्माचा अगदीं प्राण किंवा आत्माच म्हटलेंतरी चालेल. कर्म (म्हणजे बाह्यविधि) आणि ज्ञान हीं वेदांमध्यें आहेत. पहिल्या तिन्ही वेदांत व ब्राह्मण ग्रंथांत कर्म आहे आणि चौथ्या वेदांत आणि विशेषतः उपनिषदांत उच्च प्रकारचें तत्त्वज्ञानहि आहे. शेवटीं शेवटीं हिंदुस्थानांत आल्यावर आर्यांच्या संस्कृतींत वैराग्याच्याहि छटा दिसूं लागल्या. पण वैराग्य हें आर्यांचें मुख्य लक्षण नव्हे. आर्यवंश हा एक अत्यंत तेजस्वी, परंतु प्रवृत्ति-प्रधान मानववंश होऊन गेला. श्रुति ग्रंथांत आणि संहिता कालीं चार आश्रमांची घटना नव्हती, फार तर काय भगवद्‍गीतेंतहि आश्रमांचा उल्लेख नाहीं ! इतकेंच नव्हे, चौथ्या ज्ञानप्रधान अथर्ववेदाचा तर गीतेंत नुसता उल्लेखहि नाहीं. स्मृति ग्रंथांतून चार आश्रमांचे उल्लेख भरपूर सांपडतात; तरी सर्व आश्रमांपेक्षां गृहस्थाश्रमाचें फार महत्त्व स्मृतींतून वर्णिलें आहे. वैराग्य आणि देहदंडन हीं झरतुष्ट्रानें केवळ पातकेंच गणलीं आहेत ! उपासातापासाचा अत्यंताभाव कोठें असेल तर तो हल्लींच्या पार्शी धर्मांतच आहे.

शेवटचें तत्त्व भक्तीचें, तें केवळ पांचरात्र अथवा सात्वत धर्मांतच प्रथम उदयास आलें, पण ह्याचा खरा परिपोष बौद्ध आणि जैन धर्मांचे संस्थापक व प्रचारक भगवान् बुद्ध आणि महावीर ह्यांच्या प्रभावशाली आणि प्रेमी प्रयत्‍नानंतरच हिंदुस्थानांत झाला. श्रीकृष्ण महात्म्यानें हा भक्तिधर्म प्रथम स्थापिला, असे प्राचीन वैदिक वाङ्‌मयांत अंधुक पुरावे आहेत, पण ह्या धर्माचे वैदिक धर्माशीं धागेदोरे उपलब्ध नाहींत. इतकेंच नव्हे तर इतरहि कोठें त्याविषयीं ऐतिहासिक पुरावे मिळावे तितके मिळत नाहींत, ही किंचित् निराशेची गोष्ट आहे. उलट भगवद्‍गीता हा ग्रंथ जो वासुदेव-कृष्ण-विष्णु धर्माचा बळकट पाया आणि किल्ला, त्यांतहि हा नवीन धर्म वैदिक त्रयीवर अवलंबून नाहीं; इतकेंच नव्हे तर खर्‍या मोक्षाला वेद अपुरे आहेत, असें स्पष्ट आणि वेळोवेळीं म्हटलें आहे. ॥ त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ॥४५॥ अध्याय २ श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला । समाधावचला बुध्दिस्तदा योगमवाप्स्यसि ॥५३॥ अध्याय २ रा. त्रैविद्या मां सोमपाः पूतपापा यज्ञैरिष्ट्वा स्वर्गति प्रार्थयत्ने ॥ ....... क्षीणे पुण्ये मर्त्यलोके विशन्ति ॥ २०-२१ ॥ अध्याय ९ यान्ति देवव्रता देवान् .... यान्ति मद्याजिनोऽपि माम् ॥२५॥ अध्याय ९ इ. अनेक उतारे देतां येतील.

भगवद्‍गीता हा ग्रंथ मिश्र मतांचा ग्रंथ आहे. त्यांत कोणकोणत्या काळीं कोणकोणतीं मतें कशीं मिसळण्यांत आलीं, हें अस्पष्टपणानेंहि ठरविण्याचें दुर्घट काम आहे. तें प्रोफेसर गार्वे त्यांनीं आपल्या Introduction to the Bhagavat Gita ह्या लेखांत केलें असून त्याचें इंग्रजींत भाषांतर रा. उटगीकरांनीं केलेलें ह्या प्रकरणीं वाचनीय आहे (Indian Antiquary १९१८). भिन्न मतें कशींहि मिसळलीं असोत, सर्व भगवद्‍गीता गौतम बुद्धाच्या कालानंतरची असून तिच्यावर उमटलेले गौतम बुद्धाच्या शिकवणीचे स्पष्ट ठसे दिसून येत आहेत. विशेषतः कर्मयोग, मध्यमाप्रतिपत्ति आणि निर्वाण ह्या ज्या तीन गोष्टी सिद्धार्थाच्या शिकवणीच्या मुख्य प्राणभूत, त्या गीतेमध्यें स्पष्ट उल्लेखिल्या आहेत. तेलंग आणि टिळक ह्या दोघां विद्वानांनीं ह्यांचा केवळ ओझरताच उल्लेख केला आहे. टिळकांनीं भर भगवद्‍गीतेवरूनच पुढें महायान बौद्ध धर्माला प्रेरणा मिळाली, असें ठरविण्याचा प्रयत्‍न केला आहे; पण हिंदुस्थानांतल्या भागवत धर्माचा उगम श्रीकृष्ण कीं बुद्ध हा वाद यथासांग करण्याला येथें अवकाश नाहीं. तरी तत्त्वज्ञानाची कशीहि दृष्टि असो, भक्ति आणि श्रद्धा ह्यांना जैन आणि बौद्ध धर्मांत स्थान होतें, इतकेंच नव्हे तर ह्या आध्यात्मिक अवस्थांचा परिपोष निदान हिंदुस्थानांत तरी महावीर नाट-पुत्र आणि सिद्धार्थ शाक्य-पुत्र, हे महात्मे जन्मले नसते, तर इतका झाला असता कीं नाहीं हा एक चितनीय प्रश्न आहे.

असो. वरीलप्रमाणें वैदिक धर्म आणि भागवत धर्म ह्यांचीं लक्षणें ढोबळ मानानें व संक्षेपतः सांगितलीं. शाक्त आणि शैव धर्माविषयीं अद्यापि सांगावयाचें उरलेंच. जरी वेदांत ह्या दैवतांचा उल्लेख आहे किंवा उल्लेख झाल्याचा निदान भास होत आहे, तरी हीं दैवतें मूळ आर्यांच्या संस्कृतींत नाहींत. निदान हा वाद चालविण्याला येथें अवकाश नाहीं. गुरुवर्य सर डॉ. भांडारकर आपल्या Vaishnavism & Shaivism ह्या अमूल्य ग्रंथांत पान २४२ वर म्हणतात कीं ''रुद्र-शिव ह्या कल्पनेचा माग काढण्यासाठीं गृह्यसूत्रा (च्या काळा) पर्यंत आम्हीं वैदिक वाङ्‌मयाचा तपास केला, पण तेथें कोठेंहि कोणा देवीचा, मातब्बर दैवत अशा रूपानें, शोध लागला नाहीं.'' प्रो. मॅक्समुल्लर ह्यांनीं आपल्या Anthropological Religion, Gifford Lecture in १८९१ ह्या ग्रंथांत पान ४१० वरील परिशिष्टांत म्हटलें आहे कीं, ''ॠग्वेदांतील १० व्या मंडलांतील १२७ स्तोत्रांपुढें एका खिलामधील रात्री ह्या देवतेच्या स्तोत्राच्या चार चरणानंतर दुर्गा ह्या देवीचा स्पष्ट उल्लेख आहे.'' पण मुख्य व्याख्यानांत पुष्कळ प्रमाणांचा विचार करून ह्या जगप्रसिद्ध पंडितानें आपली स्पष्ट कबुली पुढील शब्दांत दिली आहे. ''म्हणून माझें असें मत आहे कीं, दुर्गा किंवा शिव हीं दैवतें वेदांतील कोणत्याहि दैवतांचीं विकसित किंबहुना विकृतहि रूपें नव्हेत.'' पान १६६. ह्या दैवतांचा संबंध वैदिक धर्माशीं नाहीं उलट पुरातन कालापासून ह्याचा निकट संबंध भागवत धर्माशीं आहे. इतकेंच नव्हे, तर विष्णु भागवतांच्याहि पूर्वी शिव भागवतांचे आणि देवी भागवतांचेहि स्वतंत्र ग्रंथ उपनिषत्काळांत आणि पुराणकाळांत भरपूर आढळतात. पण ह्या प्रकरणांचा तपशील पुढील व्याख्यानांत येणेंच बरें होईल. तूर्त एवढेंच ध्वनित करणें बरें कीं, कर्म (बाह्य विधि) आणि ज्ञान हीं जशीं आर्य संस्कृतीचीं विशिष्ट लक्षणें, तशींच वैराग्य, गूढज्ञान आणि भक्ति अथवा श्रद्धा हीं द्रावीड संस्कृतीचीं मुख्य लक्षणें होत, आणि ज्याअर्थी भागवत धर्माशीं ह्या दुसर्‍या मानसिक अवस्थांचा अधिक निकट संबंध आहे त्याअर्थी भागवत धर्माचा विकास समजून घेण्यासाठीं आर्यांच्यापेक्षां इतरांच्या संस्कृतींचाच अधिक अभ्यास करणें जरूर व इष्ट आहे.

शिंदे लेखसंग्रह

  पुरस्कार
  प्रस्तावना
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा जीवनक्रम
विभाग पहिला
 - भागवत धर्माचा विकास
 - वैदिक धर्म
 - भागवत धर्म
 - भागवत धर्माचा पाया
 - "भागवत" शब्दाचा इतिहास
 - निराळे भागवत पंथ
 - शक्ति अथवा देवी भागवत
 - शिव-भागवत
 - श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता
 - जैन आणि बौद्ध भागवत
 - बौद्धांचा इतर भागवतांशी संबंध
 - विष्णु-भागवत
 - वासुदेव आणि एकान्तिक धर्म
 - अशोक आणि वैष्णव धर्म
 - शैव, बौध आणि वैण्णवांची परंपरा
 - भगवद्गीता
 - राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
 - मंदिरे आणि मूर्ति
 - कुशान-काळ
 - गुप्तांचा काळ
 -हर्ष आणि चालुक्य
 - मात्रिकांची दुकानदारी
 - मूर्तिकार ब्राह्मणच !
 - तांत्रिक वाममार्ग
 - वेदोक्त आणि पुरागोक्त
 - पुराणांचा विपर्यास
 - पुराणिक आणि हरिदास
 -विचित्र मायपोट!
 - ओढिया जगन्नाथ
 - नामदेव तुकाराम
 - भागवत पुराण
 - तामीळ भक्त
 महाराष्ट्र भागवत धर्म
 - संस्थापक कोण?
 - दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
 - वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता
 - तुकाराम
 - लिंगायत धर्म
 - महानुभाव पंथ
 - रामानंद
 - कबीर
 - चैतन्य पंथाची भूमिका
 - चैतन्यचरित्र
 -  पंथाचा प्रचार व अवनति
 - इतर पंथ
 - शीख धर्म मुसलमान-संस्कृतीचा प्रवेश
 -  पंजाब प्रांत
 -  नानक चरित्र
 -  पंथभेद
 -  गुरु गोविंदसिंग
विभाग दुसरा
 - मराठ्यांची पूर्वपीठिका/रट्टवंशोत्पत्तीदिषयी शास्त्रीय विचार 
 - मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
 -  समाजशास्त्रीय विंचार
 - लिखित इतिहासाचे पुरावे
 -  अस्सल राजपुतांची मूळ छत्तीस कुळें
विभाग तिसरा
 -  अस्पृश्यांचे राजकारण (प्रस्तावना)
विभाग चवथा
 -  महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग !
 - मराठे हिशेबी नाहीत
विभाग पाचवा
 -  तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र (भाष्य-भारुड)
 - साक्षात्कारी वाड्मय
 - आधुनिक रुपान्तरे
 समाजशास्त्र
 उपसंहार
विभाग सहावा
 -  महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला !
विभाग सातवा
 -  दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
 - राजकीय स्वरुप
 - मुख्य मुद्दा
 -  व्यापाराचा इतिहास
 -  ह्या व्यापाराचें पिलूं
 -  दारुची बंदि कीं शिक्षणाची सक्ति?
 -  विषारी जाळें
 -  व्यभिचाराचा सांवळा गोंधळ
विभाग अठवा
 - कोकणी व मराठी परस्पर संबंध
 - ऐतिहासिक विवेचन
 - कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
 - ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
 - व-हाडी आणि इतर शाखा
 - शब्दकोश
 - व्याकरण
 - साधित शब्द
 - स्वरवैशिष्टय
 - संप्रदाय
विभाग नववा
 - कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्य़यन
 - पूर्वपीठिका
 - कानडी लिपी
 - शब्दकोश
 - मराठींत कानडी शब्दांचा भरणा
 - कानडी क्रियापदे
 - व्याकरण
 - नामांच्या विभक्ति
 - क्रियापदांच्या विभक्ति
 - लकबा
 - वाड्मय
 - उपसंहार
विभाग दहावा
 -  मराठीचा प्रवास
 -  कानडी विरुद्ध मराठी
 -  चौदावें शतक
 - पुण्यातील जाहीर सभा
 - कर्नाटकांची दुर्दशा
विभाग अकरावा
 -  राधामाधव-विलास-चंपू आणि रा. राजवाडे
 - मराठ्यांविरुद्ध आगळीक
 - जैन लिंगायतांशी भांडकुदळपणा 
   व महाराष्ट्राची बदनामी
 - केवळ ब्राह्मणेतर द्वेष
विभाग बारावा
 - पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी(!)
 - श्री शाहू व नाना
 - मराठे व पेशवे
विभाग तेरावा
 - मराठेतर कोण?
विभाग चौदावा
 - वेदोक्त कीं पुराणोक्त
विभाग पंधरावा
 - चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
विभाग सोळावा
 - कौलिकता हाच आत्मयी शिक्षणाचा पाया
विभाग सतरावा
 -  पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च
    शिक्षणाची प्रगति
विभाग अठरावा
 - महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
विभाग ऐकोणीसावा
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
विभाग विसावा

 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन:त्यांचे
   विश्वधर्म 
विकासांतील स्थान

 - सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या
   प्रचारपद्धतीचा मासला
विभाग एकविसावा
 - अस्पृश्यांची शेतकी परिषद
विभाग बावीसावा
 - मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
 - मध्यभाग
विभाग तेवीसावा
 - प्रांतिक सामाजिक परिषद सातारा
 - समाजसुधारणा यशस्वी कां होत नाही?
 - सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
 - ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
 - तपशिलाचें वर्गीकरण
 - सांप्रदायिक अस्पृश्यता
विभाग चोवीसावा
 - संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदळ
 - जागतिक मंदी
 - चळवळीचा कोंडमारा
 - परिषदेचें सहकार्य
 - बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा
 - संघटना
विभाग पंचविसावा
 - अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
 - इतिहास
 - चालू स्थिती
 - भावी सुधारणा
विभाग सव्वीसावा
 - वाळवें तालुका शेतकी, परिषद, बोरगांव
 - मालकी हक्क
 - अवर्षण, कीड मुंगी, भिकार-बुणगे
 - मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
 - सौम्य उपाय
 - भविष्य
विभाग सत्ताविसावा
 - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर
 - शेतकरी व सरकार
 - शेतकरी आणि भांडवलदार
 - शेतकरी आणि कॉग्रेस
 - विधायक घटना
 - जमीनदार वर्ग
 - कुणब्यांची जूट
 - अमेरिकेंतले शेतकरी
 - महाराष्ट्राचा गांवगाडा
 - सामाजिक व धार्मिक बाबी
 - शेतक-यांचा स्वयंनिर्णय
विभाग अठ्ठाविसावा
 - ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
 - फ्याचून
 - तुबायाझा
 - सगाईन
 - न्याँऊ
विभाग एकोणतीसावा (परिशिष्ट पहिलें.)
 - भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिलें)
  -भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)
 - ब्राह्म समाज आणि बौद्धधर्म: व्याख्यान तिसरे
विभाग तिसावा (परिशिष्ट दुसरे.)
 - INDIAN CIVILIZATION
 - टीपा
 - परिशिष्ट चौथें