शिंदे लेखसंग्रह

भागवत धर्माचा पाया

पहिल्या व्याख्यानांत 'भागवत' धर्माचा 'वैदिक' धर्माशीं किती अत्यल्प संबंध आहे, खरा संबंध पाहावयाचा असल्यास वैदिक धर्माच्याहि फार पलीकडे गेलें पाहिजे, हें सांगितलें. आधुनिक जाडे विद्वान् देखील हिंदुस्थानच्या कोणत्याहि बाबीचा इतिहास पाहावयाचा झाल्यास वेदांकडे धाव घेतात. ह्याचें कारण वेद हे इतिहासाचे उगम नव्हत, तर नुसते अशा विषयाचा एक उपलब्ध लेखी पुरावा येवढ्यामुळेंच, हेंहि प्रथमदर्शनींच सांगितलें; व शेवटीं ह्या भागवत धर्माचें संशोधन करण्यासाठीं हिंदुस्थानांतील वैदिक किंबहुना आर्य संस्कृतीपलीकडील द्रावीड, कोल, मोंगल किंवा त्याहूनहि प्राचीन इतर आर्येतर संस्कृतींचाहि शोध करणें क्रमप्राप्‍त आहे, असें सांगितलें. मात्र ह्या शोधासाठीं कागदोपत्रीं किंवा लेखी पुरावाच पाहिजे. अशा लेखी पुराव्याशिवाय कोणत्याहि गोष्टीला आम्ही सत्य म्हणणारच नाहीं, असा येथें आग्रह धरून चालावयाचें नाहीं. लेखी पुरावा म्हणजेच केवळ बिनतोड पुरावा, व इतर अनुमानें म्हणजे टाकाऊ, असें कोणी सुज्ञ म्हणणार नाहीं. इतकेंच नव्हे तर एखाद्या गोष्टीविषयीं अगदीं स्पष्ट लेख मिळाला, म्हणून त्या गोष्टीविषयीं अगदीं प्रत्यक्ष पुरावा मिळाला, असेंहि म्हणतां येणार नाहीं. नुसत्या पोशाखावरूनच सभ्य गृहस्थाला ओळखतां येत नाहीं, तसेंच नुसत्या लेखावरूनच त्यांतील गर्भितविषय सत्य आहे, असेंहि म्हणतां येत नाहीं. आमच्या विद्यार्थिदशेंतील एक विनोद आठवतो, तो सांगणें प्रासंगिक आहे. डेक्कन कॉलेजचे विद्यार्थी आम्हां फर्ग्यूसनवाल्यांना टिन्पॉट् कॉलेजवाले, असें पूर्वी हिणवीत असत. डेक्कन कॉलेजांतील टेनिसक्लब, बोटक्लब वगैरे भपक्याच्या संस्था, विद्यार्थ्यांची आणि अध्यापकांची अक्कडबाज राहणी पाहून निदान माझे तरी डोळेच दिपत. इतकेंच नव्हे, एकदा तर कडक इस्त्री केलेला लिननशर्ट अंगांत नसलेल्या माणसाला सुशिक्षित तरी कसें म्हणावें, अशी शंका नवीन भरती झालेल्या कांहीं तरुण डेक्कन कॉलेजवाल्यांना आलेली पाहून, मी कधीं तरी सुशिक्षित होईन कीं नाहीं, ह्याची मला तेव्हां खात्री नसे ! असो. कडक इस्त्रीचा व सुशिक्षणाचा गेल्या पिढींत जितका संबंध होता, तितकाच किंबहुना कांकणभर जास्तच संबंध, लेखी पुरावा आणि ऐतिहासिक सत्य ह्यांमध्यें असावा, अशी कांहीं संशोधकांची अद्यापि समजूत असलेली आढळते; निदान आर्यानार्य वादांत तरी ही समजूत फार नडते, ही गोष्ट सर्व इतिहाससंशोधकांनीं समजून असणें सुरक्षितपणाचें आहे.

हिंदुस्थानांतील आहे नाहीं तें सर्व सत्य आणि शुभ चार वेदांतच आहे, बाकी उरेल तो अंधकार अशी भाविक समजूत केवळ जुन्या कर्मठ ब्राह्मणांचीच नसून अगदीं आजच्या कांहीं आर्यसमाजी प्रोफेसरांचीहि आहे. प्रोफेसर मॅक्समुल्लर हे परकीय असूनहि त्यांना आर्यत्वाचाच नव्हे तर वेदांचाहि त्यांच्या पांडित्यामुळें मोठा अभिमान होता. त्यांनीं आपल्या पौरस्त्य पवित्र ग्रंथमालेंतील, उपनिषदांवरील ग्रंथाच्या प्रस्तावनेंत म्हटलें आहे कीं, राममोहन राय ह्यांनीं उपनिषदांचें भाषांतर केलें, तुलनात्मक धर्माचें पहिलें अधिष्ठान उभें केलें व त्यांचे अनुयायी देवेंद्रनाथ, केशवचंद्र सेन आणि 'साधारण ब्राह्मसमाजा''चे संस्थापक व चालक ह्या सर्वांना आपल्या धर्माची प्रेरणा उपनिषदांतून झाली आहे, हें मॅक्समुल्लरचें म्हणणें सर्व खरें आहे. पण शेवटीं देवेंद्रनाथांनींच उपनिषदांतून जरी स्वतः प्रेरणा घेतली तरी वेदाचें प्रामाण्य गौतम बुद्धाप्रमाणेंच झुगारून दिलें, हेंहि पण तितकेंच खरें आहे. ह्या गोष्टींत जें रहस्य आहे, तें हेंच कीं, वेद संहिता काळचा जो आर्यांचा अस्सल 'वैदिक' धर्म तो पुढें उपनिषत्काळांत आपल्या शुद्ध आर्यस्वरूपांत उरला नाहीं. प्रस्थानत्रयीचा शेवटचा टप्पा जो भगवद्‍गीता धर्म त्यांत तर तो फारच कमी उरला, आणि शेवटीं देवेंद्रनाथांच्या काळीं तर तो धर्म आपल्या कीर्तिरूपानेंच केवळ उरला, प्रामाण्यरूपानें उरणें शक्यच नव्हतें. तात्पर्य इतकेंच कीं, उपनिषत्काळीं म्हणजे गौतम बुद्धाच्या पूर्वी १।२ शतकांचा धर्म म्हणजे वैदिक धर्म नसून बाहेरून आलेल्या आर्य धर्मावर, सुमेरियन ऊर्फ सुमेरु, आसुर, नाग, द्राविड, मोंगल, कोल, इ. आर्यांच्या इतकेंच किंबहुना कांहीं बाबतींत आर्याहूनहि निःसंशय अधिक सुसंस्कृत मानववंश सिंधू नदीच्या पूर्वेकडे हिंदुस्थानांतच जे राहात होते, त्यांच्या धर्मांचा, भाषेचा व इतर संस्कृतीचा संस्कार घडून बनलेला मिश्रधर्म तत्कालीन वरिष्ठ वर्गात चालू होता. आर्यांहून अधिक वैभवाची संस्कृति, ते येण्यापूर्वी हिंदुस्थानांत होती; तिचे प्रत्यक्ष आणि आश्चर्यकारक अवशेष नुकतेच सिंध आणि पंजाब प्रांतांत ब्रिटिश सरकारच्या संशोधनखात्याला सांपडले आहेत. ते डोळ्यांनीं पाहूनहि उपनिषत्काळाच्या अत्यंत संकीर्ण संस्कृतीमुळें नवीन निर्माण झालेल्या स्वतंत्र व उदार धर्माचें सर्व श्रेय अस्सल पण आर्ष 'वैदिक' धर्मालाच देणें म्हणजे आजकालचें तुलनात्मक धर्माचें शास्त्र आणि वाङ्‌मय वाचून, ख्रिस्ती अथवा त्याहूनहि कडव्या इस्लाम धर्माच्या कांहीं सुशिक्षित प्रचारकांमध्यें आज जें मनाचें औदार्य व दृष्टीचा मोकळेपणा आला आहे, त्याचें सर्व श्रेय बायबलला किंवा कुराणाला देण्यासारखेंच आहे. श्रेयाच्या ह्या भोळसर वांटणीला अगदींच सौम्य नांव द्यावयाचें झाल्यास 'अनैतिहासिक' ह्यापेक्षां दुसरें यथार्थ नांव सांपडावयाचें नाहीं.

शिंदे लेखसंग्रह

  पुरस्कार
  प्रस्तावना
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा जीवनक्रम
विभाग पहिला
 - भागवत धर्माचा विकास
 - वैदिक धर्म
 - भागवत धर्म
 - भागवत धर्माचा पाया
 - "भागवत" शब्दाचा इतिहास
 - निराळे भागवत पंथ
 - शक्ति अथवा देवी भागवत
 - शिव-भागवत
 - श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता
 - जैन आणि बौद्ध भागवत
 - बौद्धांचा इतर भागवतांशी संबंध
 - विष्णु-भागवत
 - वासुदेव आणि एकान्तिक धर्म
 - अशोक आणि वैष्णव धर्म
 - शैव, बौध आणि वैण्णवांची परंपरा
 - भगवद्गीता
 - राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
 - मंदिरे आणि मूर्ति
 - कुशान-काळ
 - गुप्तांचा काळ
 -हर्ष आणि चालुक्य
 - मात्रिकांची दुकानदारी
 - मूर्तिकार ब्राह्मणच !
 - तांत्रिक वाममार्ग
 - वेदोक्त आणि पुरागोक्त
 - पुराणांचा विपर्यास
 - पुराणिक आणि हरिदास
 -विचित्र मायपोट!
 - ओढिया जगन्नाथ
 - नामदेव तुकाराम
 - भागवत पुराण
 - तामीळ भक्त
 महाराष्ट्र भागवत धर्म
 - संस्थापक कोण?
 - दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
 - वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता
 - तुकाराम
 - लिंगायत धर्म
 - महानुभाव पंथ
 - रामानंद
 - कबीर
 - चैतन्य पंथाची भूमिका
 - चैतन्यचरित्र
 -  पंथाचा प्रचार व अवनति
 - इतर पंथ
 - शीख धर्म मुसलमान-संस्कृतीचा प्रवेश
 -  पंजाब प्रांत
 -  नानक चरित्र
 -  पंथभेद
 -  गुरु गोविंदसिंग
विभाग दुसरा
 - मराठ्यांची पूर्वपीठिका/रट्टवंशोत्पत्तीदिषयी शास्त्रीय विचार 
 - मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
 -  समाजशास्त्रीय विंचार
 - लिखित इतिहासाचे पुरावे
 -  अस्सल राजपुतांची मूळ छत्तीस कुळें
विभाग तिसरा
 -  अस्पृश्यांचे राजकारण (प्रस्तावना)
विभाग चवथा
 -  महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग !
 - मराठे हिशेबी नाहीत
विभाग पाचवा
 -  तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र (भाष्य-भारुड)
 - साक्षात्कारी वाड्मय
 - आधुनिक रुपान्तरे
 समाजशास्त्र
 उपसंहार
विभाग सहावा
 -  महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला !
विभाग सातवा
 -  दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
 - राजकीय स्वरुप
 - मुख्य मुद्दा
 -  व्यापाराचा इतिहास
 -  ह्या व्यापाराचें पिलूं
 -  दारुची बंदि कीं शिक्षणाची सक्ति?
 -  विषारी जाळें
 -  व्यभिचाराचा सांवळा गोंधळ
विभाग अठवा
 - कोकणी व मराठी परस्पर संबंध
 - ऐतिहासिक विवेचन
 - कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
 - ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
 - व-हाडी आणि इतर शाखा
 - शब्दकोश
 - व्याकरण
 - साधित शब्द
 - स्वरवैशिष्टय
 - संप्रदाय
विभाग नववा
 - कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्य़यन
 - पूर्वपीठिका
 - कानडी लिपी
 - शब्दकोश
 - मराठींत कानडी शब्दांचा भरणा
 - कानडी क्रियापदे
 - व्याकरण
 - नामांच्या विभक्ति
 - क्रियापदांच्या विभक्ति
 - लकबा
 - वाड्मय
 - उपसंहार
विभाग दहावा
 -  मराठीचा प्रवास
 -  कानडी विरुद्ध मराठी
 -  चौदावें शतक
 - पुण्यातील जाहीर सभा
 - कर्नाटकांची दुर्दशा
विभाग अकरावा
 -  राधामाधव-विलास-चंपू आणि रा. राजवाडे
 - मराठ्यांविरुद्ध आगळीक
 - जैन लिंगायतांशी भांडकुदळपणा 
   व महाराष्ट्राची बदनामी
 - केवळ ब्राह्मणेतर द्वेष
विभाग बारावा
 - पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी(!)
 - श्री शाहू व नाना
 - मराठे व पेशवे
विभाग तेरावा
 - मराठेतर कोण?
विभाग चौदावा
 - वेदोक्त कीं पुराणोक्त
विभाग पंधरावा
 - चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
विभाग सोळावा
 - कौलिकता हाच आत्मयी शिक्षणाचा पाया
विभाग सतरावा
 -  पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च
    शिक्षणाची प्रगति
विभाग अठरावा
 - महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
विभाग ऐकोणीसावा
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
विभाग विसावा

 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन:त्यांचे
   विश्वधर्म 
विकासांतील स्थान

 - सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या
   प्रचारपद्धतीचा मासला
विभाग एकविसावा
 - अस्पृश्यांची शेतकी परिषद
विभाग बावीसावा
 - मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
 - मध्यभाग
विभाग तेवीसावा
 - प्रांतिक सामाजिक परिषद सातारा
 - समाजसुधारणा यशस्वी कां होत नाही?
 - सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
 - ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
 - तपशिलाचें वर्गीकरण
 - सांप्रदायिक अस्पृश्यता
विभाग चोवीसावा
 - संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदळ
 - जागतिक मंदी
 - चळवळीचा कोंडमारा
 - परिषदेचें सहकार्य
 - बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा
 - संघटना
विभाग पंचविसावा
 - अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
 - इतिहास
 - चालू स्थिती
 - भावी सुधारणा
विभाग सव्वीसावा
 - वाळवें तालुका शेतकी, परिषद, बोरगांव
 - मालकी हक्क
 - अवर्षण, कीड मुंगी, भिकार-बुणगे
 - मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
 - सौम्य उपाय
 - भविष्य
विभाग सत्ताविसावा
 - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर
 - शेतकरी व सरकार
 - शेतकरी आणि भांडवलदार
 - शेतकरी आणि कॉग्रेस
 - विधायक घटना
 - जमीनदार वर्ग
 - कुणब्यांची जूट
 - अमेरिकेंतले शेतकरी
 - महाराष्ट्राचा गांवगाडा
 - सामाजिक व धार्मिक बाबी
 - शेतक-यांचा स्वयंनिर्णय
विभाग अठ्ठाविसावा
 - ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
 - फ्याचून
 - तुबायाझा
 - सगाईन
 - न्याँऊ
विभाग एकोणतीसावा (परिशिष्ट पहिलें.)
 - भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिलें)
  -भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)
 - ब्राह्म समाज आणि बौद्धधर्म: व्याख्यान तिसरे
विभाग तिसावा (परिशिष्ट दुसरे.)
 - INDIAN CIVILIZATION
 - टीपा
 - परिशिष्ट चौथें