शिंदे लेखसंग्रह

मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं

मराठ्यांतील प्रसिद्ध राजघराणीं (PDF साठी वर क्लिक करावे)

वरील नांवांचीं प्रतिष्ठित राजघराणीं महाराष्ट्रांत व खालीं दक्षिण हिंदुस्थानांत गेल्या दोन हजार वर्षांत लहानमोठी राजसत्ता गाजवून गेलीं आहेत. त्यांच्यांत परस्पर शरीरसंबंध झालेले शिलालेखी पुरावे आहेत. हीं सर्व नांवें आजच्या मराठ्यांत राजरोस आढळतात. तरी वंशदृष्ट्या ते परस्परांपासून कितीतरी भिन्न आहेत. सातव, साळवी, शिंदे हे नागवंशी, तर साळुंके, राठोड, पवार हे सूर्यवंशी; जाधव, शेलार, मोरे हे सोमवंशी; शेलार, शेळके हे धनगरहि आणि अहीर हे गवळीहि आहेत. चोळ हे द्रावीड, तर गंग हे मोगल असावेत. गाँग-डोकें, शिरोभाग असा तिबेटी आणि ब्रम्ही शब्द आहे. गंगा हें नदीचें नांव ह्याच शब्दापासून असावें. चोळ शिवायकरून बाकी सर्व उत्तरेकडून खालीं दक्षिणेंत आले असावेत असा अंदाज आहे. धारशिवाय सर्व राजधान्या गोदावरीच्या दक्षिणेस दंडकारण्यांत व त्याच्याहि खालीं आहेत. ह्या बहुतेकांच्या भाषा कानडी, तेलुगू किंवा तामीळ ह्या द्राविडी आणि सर्व चालीरीति तशाच होत्या. कारण मराठीचा उत्कर्ष होण्यापूर्वींच राजकीयदृष्ट्या ह्यांचा अपकर्ष होऊन चुकला होता. कांचीचे पल्लव (पालवे) हे पार्थ ( Parthians ) = पेहेल्लव असावेत असा आजमास आहे. कुंतल देशांतील कुरुंब (कुरुब) म्हणजे धनगर राजघराण्याशीं व धनकटक (गुंटूर जिल्हा) येथील चालुक्य सम्राटांशीं पल्लव घराण्याचे शरीरसंबंध होत असत असा पुरावा डॉ. भांडारकरांनीं दिला आहे. ह्या सर्व गुंतागुंतीवरून मराठ्यांची पूर्वपीठिका अचूक ठरविणें जवळजवळ अशक्यच  असा भास झाल्यास नवल काय?
वर जो सूर्य, चंद्र इत्यादि वंशांचा उल्लेख आला आहे, त्या त्या वंशाचा संबंध सांगूनच हें प्रकरण संपत नाहीं. ह्या सर्व भौतिक वस्तूंचा अथवा देवकांचा प्रदेश मराठ्यांच्या आडनांवांत झालेला अद्यापि आढळत आहे. मराठ्यांत सुर्वे, सोमवे, नागवे अशीं उपनांवें आहेत. तीं सूर्यवंशे, सोमवंशे, नागवंशे ह्या शब्दांचे अपभ्रंश असावेत, किंवा सुरवसे, सोमवसे अशी जीं दुसरी नांवें आहेत तीं सूर्यवंशी, सोमवंशी (सुरवंसे, सोमोसे) इत्यादींचे अपभ्रंश असून सुर्वे, सोमवे, नागवे, हे सूर्यवाहन इत्यादींचे अपभ्रंश असणें अधिक संभवनीय आहे. शालिवाहन, शातवाहन ह्यांचे अपभ्रंश साळवे, सातव, असे आढळतात, त्यांवरून ही दुसरी व्युत्पत्ति अधिक संभवनीय दिसते. सुर्वा, सातवा, साळवा ह्या एकवचनांचीं सुर्वे इत्यादि अनेकवचनी रूपें आतां प्रचारांत आहेत हें उघड आहे. देवकांचें चिन्ह अथवा चित्र निशाणावर असणें हें आतां आणि पूर्वींहि प्रसिद्धच आहे. प्राचीन चालुक्यांच्या निशाणावर वराह, तर आतांच्या इंदूरच्या होळकरांच्या निशाणावर बैल, आणि ग्वाल्हेरच्या शिंद्यांच्या ध्वजस्तंभावर शेष आढळतो. इतकेंच नव्हे तर इंग्लंड, जर्मनी आणि रशिया ह्यांच्या ध्वजांवर अनुक्रमें सिंह, गरुड आणि अस्वल हीं दिसतात; आणि जपानची बादशाही सूर्यवाहन ऊर्फ सुर्वे आहे !
राठोड ह्याची व्युत्पत्ति राष्ट्र + कूड = राठ + उड = राठोड असें वर सांगितलें; आणि असा एक रट्टांचा संघ असावा असें अनुमान निघतें असें आम्ही वर म्हणालों. त्याचप्रमाणें नलावडे, नायकोडे, गाइकवाड अशींहि आडनांवें प्रसिद्ध आहेत. नायकोडे हा मूळ नाग + वाड = नाकोड, किंवा नाक + कूड = नाकोड असा प्रयोग झालेला असावा. वाड हा शब्द राजपुतान्यांत मारवाड = मरु+वाड, मेवाड = मध्यवाड, ह्या देशवाचक आणि मेरवाड ह्या जातिवाचक नांवांत आढळतो. कर्नल टॉडनें आपल्या राजस्थानची बखर ह्या ग्रंथांत भाग १ ला, पान १२५ वर रजपूत वैश्यांच्या ज्या ८४ जातींची यादी दिली आहे त्यांपैकीं ३५ जातींच्या नांवाचा शेवटचा भाग वाळ असा आहे. जसें, ओस्वाळ, भागेरवाळ, दिसवाळ, पुष्करवाळ, दोहिळवाळ इत्यादि. हा वाळ शब्द आणि वरील वाड शब्द हे दोन्ही मुळांत एकच आहेत. ह्यावरून नलवडे, नायकोडे हे देशी मराठ्यांचे संघ असावेत असें दिसतें. नायक हा शब्द मूळ नाग किंवा नाक असा असून त्याचें पुढें नायक असें संस्कृतीकरण झालें आहे. नल लोकांचे राष्ट्र हल्लींच्या कर्नूल जिल्ह्याच्या आसपास कृष्णा व तुंगा ह्या नद्यांच्या संगमाजवळ प्राचीन काळीं होतें. नळ ह्या नांवाचा डोंगर आतां तेथें आहे. त्याचें नांव ह्या लोकांच्या नांवावरूनच पडलेलें दिसतें. रामायणांत नळ, नीळ, जांबुवंत ह्या वानरांच्या जाती होत्या असा उल्लेख आहे. आतां, नळगिरी, नीळगिरी अशीं नुसतीं डोंगरांची नांवें उरलीं आहेत. ह्यावरून हीं प्राचीन आर्येतर राजकुलें किंवा राजकारणी राष्ट्रें असावींत; ह्यांनीं आर्यांच्या दक्षिणेकडील वसाहतीचे बाबतींत मोठी मदत केलेली असावी. रट्टवाड किंवा रट्टकूड ह्यांच्या प्रमाणेंच नलवडे आणि नायकोडे ह्यांचे निराळे संघ असावेत. रड्डी हें जातिवाचक नांव मद्रासकडे आडनांवाच्या रूपानेंहि आढळतें. सर्वांत मोठा चमत्कार हा कीं, रट्टी हें आडनांव इटालियन लोकांतहि आढळतें. रोमचा पोप ११ वा पायस ह्याचें पूर्वाश्रमींचे नांव अबेटा अकिली रट्टी असें होतें ! असा हा नांवांचा गोतवळा दीर्घसूत्री आहे !!

शिंदे लेखसंग्रह

  पुरस्कार
  प्रस्तावना
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा जीवनक्रम
विभाग पहिला
 - भागवत धर्माचा विकास
 - वैदिक धर्म
 - भागवत धर्म
 - भागवत धर्माचा पाया
 - "भागवत" शब्दाचा इतिहास
 - निराळे भागवत पंथ
 - शक्ति अथवा देवी भागवत
 - शिव-भागवत
 - श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता
 - जैन आणि बौद्ध भागवत
 - बौद्धांचा इतर भागवतांशी संबंध
 - विष्णु-भागवत
 - वासुदेव आणि एकान्तिक धर्म
 - अशोक आणि वैष्णव धर्म
 - शैव, बौध आणि वैण्णवांची परंपरा
 - भगवद्गीता
 - राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
 - मंदिरे आणि मूर्ति
 - कुशान-काळ
 - गुप्तांचा काळ
 -हर्ष आणि चालुक्य
 - मात्रिकांची दुकानदारी
 - मूर्तिकार ब्राह्मणच !
 - तांत्रिक वाममार्ग
 - वेदोक्त आणि पुरागोक्त
 - पुराणांचा विपर्यास
 - पुराणिक आणि हरिदास
 -विचित्र मायपोट!
 - ओढिया जगन्नाथ
 - नामदेव तुकाराम
 - भागवत पुराण
 - तामीळ भक्त
 महाराष्ट्र भागवत धर्म
 - संस्थापक कोण?
 - दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
 - वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता
 - तुकाराम
 - लिंगायत धर्म
 - महानुभाव पंथ
 - रामानंद
 - कबीर
 - चैतन्य पंथाची भूमिका
 - चैतन्यचरित्र
 -  पंथाचा प्रचार व अवनति
 - इतर पंथ
 - शीख धर्म मुसलमान-संस्कृतीचा प्रवेश
 -  पंजाब प्रांत
 -  नानक चरित्र
 -  पंथभेद
 -  गुरु गोविंदसिंग
विभाग दुसरा
 - मराठ्यांची पूर्वपीठिका/रट्टवंशोत्पत्तीदिषयी शास्त्रीय विचार 
 - मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
 -  समाजशास्त्रीय विंचार
 - लिखित इतिहासाचे पुरावे
 -  अस्सल राजपुतांची मूळ छत्तीस कुळें
विभाग तिसरा
 -  अस्पृश्यांचे राजकारण (प्रस्तावना)
विभाग चवथा
 -  महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग !
 - मराठे हिशेबी नाहीत
विभाग पाचवा
 -  तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र (भाष्य-भारुड)
 - साक्षात्कारी वाड्मय
 - आधुनिक रुपान्तरे
 समाजशास्त्र
 उपसंहार
विभाग सहावा
 -  महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला !
विभाग सातवा
 -  दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
 - राजकीय स्वरुप
 - मुख्य मुद्दा
 -  व्यापाराचा इतिहास
 -  ह्या व्यापाराचें पिलूं
 -  दारुची बंदि कीं शिक्षणाची सक्ति?
 -  विषारी जाळें
 -  व्यभिचाराचा सांवळा गोंधळ
विभाग अठवा
 - कोकणी व मराठी परस्पर संबंध
 - ऐतिहासिक विवेचन
 - कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
 - ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
 - व-हाडी आणि इतर शाखा
 - शब्दकोश
 - व्याकरण
 - साधित शब्द
 - स्वरवैशिष्टय
 - संप्रदाय
विभाग नववा
 - कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्य़यन
 - पूर्वपीठिका
 - कानडी लिपी
 - शब्दकोश
 - मराठींत कानडी शब्दांचा भरणा
 - कानडी क्रियापदे
 - व्याकरण
 - नामांच्या विभक्ति
 - क्रियापदांच्या विभक्ति
 - लकबा
 - वाड्मय
 - उपसंहार
विभाग दहावा
 -  मराठीचा प्रवास
 -  कानडी विरुद्ध मराठी
 -  चौदावें शतक
 - पुण्यातील जाहीर सभा
 - कर्नाटकांची दुर्दशा
विभाग अकरावा
 -  राधामाधव-विलास-चंपू आणि रा. राजवाडे
 - मराठ्यांविरुद्ध आगळीक
 - जैन लिंगायतांशी भांडकुदळपणा 
   व महाराष्ट्राची बदनामी
 - केवळ ब्राह्मणेतर द्वेष
विभाग बारावा
 - पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी(!)
 - श्री शाहू व नाना
 - मराठे व पेशवे
विभाग तेरावा
 - मराठेतर कोण?
विभाग चौदावा
 - वेदोक्त कीं पुराणोक्त
विभाग पंधरावा
 - चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
विभाग सोळावा
 - कौलिकता हाच आत्मयी शिक्षणाचा पाया
विभाग सतरावा
 -  पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च
    शिक्षणाची प्रगति
विभाग अठरावा
 - महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
विभाग ऐकोणीसावा
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
विभाग विसावा

 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन:त्यांचे
   विश्वधर्म 
विकासांतील स्थान

 - सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या
   प्रचारपद्धतीचा मासला
विभाग एकविसावा
 - अस्पृश्यांची शेतकी परिषद
विभाग बावीसावा
 - मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
 - मध्यभाग
विभाग तेवीसावा
 - प्रांतिक सामाजिक परिषद सातारा
 - समाजसुधारणा यशस्वी कां होत नाही?
 - सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
 - ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
 - तपशिलाचें वर्गीकरण
 - सांप्रदायिक अस्पृश्यता
विभाग चोवीसावा
 - संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदळ
 - जागतिक मंदी
 - चळवळीचा कोंडमारा
 - परिषदेचें सहकार्य
 - बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा
 - संघटना
विभाग पंचविसावा
 - अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
 - इतिहास
 - चालू स्थिती
 - भावी सुधारणा
विभाग सव्वीसावा
 - वाळवें तालुका शेतकी, परिषद, बोरगांव
 - मालकी हक्क
 - अवर्षण, कीड मुंगी, भिकार-बुणगे
 - मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
 - सौम्य उपाय
 - भविष्य
विभाग सत्ताविसावा
 - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर
 - शेतकरी व सरकार
 - शेतकरी आणि भांडवलदार
 - शेतकरी आणि कॉग्रेस
 - विधायक घटना
 - जमीनदार वर्ग
 - कुणब्यांची जूट
 - अमेरिकेंतले शेतकरी
 - महाराष्ट्राचा गांवगाडा
 - सामाजिक व धार्मिक बाबी
 - शेतक-यांचा स्वयंनिर्णय
विभाग अठ्ठाविसावा
 - ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
 - फ्याचून
 - तुबायाझा
 - सगाईन
 - न्याँऊ
विभाग एकोणतीसावा (परिशिष्ट पहिलें.)
 - भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिलें)
  -भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)
 - ब्राह्म समाज आणि बौद्धधर्म: व्याख्यान तिसरे
विभाग तिसावा (परिशिष्ट दुसरे.)
 - INDIAN CIVILIZATION
 - टीपा
 - परिशिष्ट चौथें