शिंदे लेखसंग्रह

कोंकणी व मराठी परस्पर संबंध

(१) आर्य आणि अनार्य (आर्येतर हिंदी) ह्यांच्या संस्कृतींची तुलना हा मुख्य विषय. त्यांच्या भाषांची तुलना हें त्यांच्या अध्ययनाचें एक मुख्य साधन. मराठी ही एक आर्यभाषेशीं संबंध असलेली प्रचलित भाषा, आणि कानडी ही तामिळशीं संबंध असलेली एक चालू भाषा. ह्यांचा निकट संबंध महाराष्ट्रांत गेल्या सहस्त्रकांत जुळला कसा, हें मीं इ. स. १९२३ चे अखेर ‘केसरी’ पत्रांत लेखद्वारा दाखविलें आहे. कारण हा निकट संबंध सांस्कृतिक इतिहासाच्या दृष्टीनें विशेषतः तौलनिक-भाषा दृष्टीनें फार महत्त्वाचा आहे. त्याच दृष्टीनें कोंकणी व मराठीचाहि संबंध महत्त्वाचा आहे.
(२) कोंकणी (मालवण, गोंवा, मंगळूर इ. ठिकाणची) ही मराठीची उपभाषा गणली जात आहे. पण इतिहासाच्या दृष्टीनें हें विधान फारच कसोशीनें पारखणें जरूर आहे. मराठी, जी हल्लीं प्रौढ ग्रांथिक भाषा झाली आहे तिचा एक हजार वर्षांपूर्वींचा इतिहास माहीत नाहीं. किंबहुना तो होता कीं नाहीं हेंहि निश्चयानें आज सांगवत नाहीं. कोंकणी तर अशा प्रौढपणाला कधीं पोंचलीच नाहीं. पोर्तुगीजांच्या राक्षसी अत्याचारांतून ती आज जिवंत आहे, हेंच मोठें भाग्य. अशा परिस्थितींत ह्यांची तुलना करावयाची ती दोहोंच्या व्याकरणांवरूनच. कोंकणीचें सारस्वत नाहीं निदान तें उपलब्ध नाहीं. जें स्वल्प आहे, तें अगदीं अलीकडचें. कोंकणीचीं लहान लहान व्याकरणेंहि एकदोन शतकांतलींच, व तींहि सहज मिळत नाहींत. अशा अनेक अडचणी आहेत.

(३) डॉ. सबॅतियन रुदाल्फ दालगादो, D.D., D.C.L., G.C. हे एक सर भांडारकरांच्या तोडीचे नामांकित पंडित होऊन गेले. पूर्वाश्रमीचे सारस्वतब्राह्मणकुलोत्पन्न. शेवटीं ते रोमन कॅथॉलिक पंथाचे मोठे धर्माचार्य झाले. सुमारें पंचवीस वर्षांपूर्वीं त्यांनीं एक मोठा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यांत त्यांनीं २१७७ अस्सल कोंकणी म्हणी संपादन केल्या आहेत. (कोइँब्रा, पोर्तुगाल, इ. स. १९२२). हें एक वाङ्मयच म्हणावयाचें. ह्यांना पूर्व आशियांतील पुष्कळच प्रचलित भाषा अवगत होत्या. त्यांचा प्रवासहि विस्तृत होता. ह्यांनीं एक कोंकणी-पोर्तुगीज कोश (Glossari Lasso Asiatico-Coimbra Portugal, 1921 A.D.) पांच वर्षांपूर्वीं प्रसिद्ध केला. पण हे ग्रंथ परकीय भाषेंत आणि रोमन लिपींत आहेत. इ. स. १९१२ मध्यें “Influence of the Portugese Vocabulary on the Asiatic Languages” ह्या नांवाचा एक तौलनिक भाषाविषयक ग्रंथ ह्यांनीं प्रसिद्ध केला. ह्यावरून त्यांचें अनेक भाषाप्रभुत्व कळतें. कोंकणीच्या पूर्वापार संबंधाविषयीं ह्या पंडितानें आपल्या वरील ग्रंथांच्या प्रस्तावनांतून जे सिद्धान्त ग्रथित केले आहेत, त्यांचा सारांश असा :-
१. खुद्द गोमांतकांत नागर लोक जी भाषा बोलतात तीच खरी कोंकणी भाषा. उत्तरेकडे कुडाळीवर मराठीचा संस्कार, आणि दक्षिणेकडे मंगळूरांतील कोंकणीवर कानडीचा संस्कार, जास्त झाला आहे.
२. खुद्द गोमांतकांतहि हल्लींचे गोवनी भाषेंत एकदशांश शब्द पोर्तुगीज आहेत.
३. ही कोंकणी भाषा संस्कृत नाटकांतील बालभाषेसारखी आहे.
४. हिच्यांत कारकें, काळ, व धातुसाधितें विपुल आहेत; म्हणजे ही Inflective आहे. म्हणून ही संस्कृतजन्य भाषा आहे. द्राविड अथवा आर्येतर म्हणजे Agglutinative नाहीं.
५. व्याकरणदृष्ट्या ही मराठीहूनहि संस्कृतच्या अधिक जवळ आहे.
६. चालू मराठीपेक्षां जुन्या मराठीशीं हिचें सादृश्य अधिक आहे.
७. उच्चाराच्या दृष्टीनें (Phonology) ही गौडी भाषा आहे. विशेषतः बंगालीसारखी आहे.
८. ही मराठीची शाखा किंवा अपभ्रंश नव्हे.
९. सारस्वत ब्राह्मणांची जी भाषा नष्ट झाली असें कांहीं युरोपिअन प्राच्य भाषावेत्ते समजतात, ती हीच असावी. बिहार प्रांतांतील तिरहुतहून जे गौड सारस्वत कोंकणांत आले त्यांनीं ही कोंकणांत सुरू केली असावी. इ. इ.

(४) अलीकडे मुंबईचे रावसाहेब डॉ. चव्हाण ह्याच विषयावर व्याख्यानें देत असतात. ते हींच मतें प्रतिपादित आहेत. डॉ. दालगादो ह्यांचे ग्रंथ पोर्तुगीज भाषेंत आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार रा. सा. चव्हाण इंग्रजींत करीत आहेत, हा एक आम्हांवर उपकारच आहे. मराठींत करते, तर बहुजनसमाज ह्या उपकारांचा अधिक वांटेकरी झाला असता. तौलनिक व ऐतिहासिक व्याकरणांत अधिक खोल शिरून ह्या विषयावर त्यांनीं अधिक प्रकाश पाडावा अशी त्यांना विनंती आहे.

शिंदे लेखसंग्रह

  पुरस्कार
  प्रस्तावना
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  ती. अण्णांच्या लेखसंग्रहाबाबत
  कर्मवीर वि.रा.शिंदे यांचा जीवनक्रम
विभाग पहिला
 - भागवत धर्माचा विकास
 - वैदिक धर्म
 - भागवत धर्म
 - भागवत धर्माचा पाया
 - "भागवत" शब्दाचा इतिहास
 - निराळे भागवत पंथ
 - शक्ति अथवा देवी भागवत
 - शिव-भागवत
 - श्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता
 - जैन आणि बौद्ध भागवत
 - बौद्धांचा इतर भागवतांशी संबंध
 - विष्णु-भागवत
 - वासुदेव आणि एकान्तिक धर्म
 - अशोक आणि वैष्णव धर्म
 - शैव, बौध आणि वैण्णवांची परंपरा
 - भगवद्गीता
 - राष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म
 - मंदिरे आणि मूर्ति
 - कुशान-काळ
 - गुप्तांचा काळ
 -हर्ष आणि चालुक्य
 - मात्रिकांची दुकानदारी
 - मूर्तिकार ब्राह्मणच !
 - तांत्रिक वाममार्ग
 - वेदोक्त आणि पुरागोक्त
 - पुराणांचा विपर्यास
 - पुराणिक आणि हरिदास
 -विचित्र मायपोट!
 - ओढिया जगन्नाथ
 - नामदेव तुकाराम
 - भागवत पुराण
 - तामीळ भक्त
 महाराष्ट्र भागवत धर्म
 - संस्थापक कोण?
 - दोन ज्ञानदेव व तीन नामदेव
 - वारकरी पंथाची लोकसत्तात्मकता
 - तुकाराम
 - लिंगायत धर्म
 - महानुभाव पंथ
 - रामानंद
 - कबीर
 - चैतन्य पंथाची भूमिका
 - चैतन्यचरित्र
 -  पंथाचा प्रचार व अवनति
 - इतर पंथ
 - शीख धर्म मुसलमान-संस्कृतीचा प्रवेश
 -  पंजाब प्रांत
 -  नानक चरित्र
 -  पंथभेद
 -  गुरु गोविंदसिंग
विभाग दुसरा
 - मराठ्यांची पूर्वपीठिका/रट्टवंशोत्पत्तीदिषयी शास्त्रीय विचार 
 - मराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं
 -  समाजशास्त्रीय विंचार
 - लिखित इतिहासाचे पुरावे
 -  अस्सल राजपुतांची मूळ छत्तीस कुळें
विभाग तिसरा
 -  अस्पृश्यांचे राजकारण (प्रस्तावना)
विभाग चवथा
 -  महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग !
 - मराठे हिशेबी नाहीत
विभाग पाचवा
 -  तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र (भाष्य-भारुड)
 - साक्षात्कारी वाड्मय
 - आधुनिक रुपान्तरे
 समाजशास्त्र
 उपसंहार
विभाग सहावा
 -  महाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला !
विभाग सातवा
 -  दारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज
 - राजकीय स्वरुप
 - मुख्य मुद्दा
 -  व्यापाराचा इतिहास
 -  ह्या व्यापाराचें पिलूं
 -  दारुची बंदि कीं शिक्षणाची सक्ति?
 -  विषारी जाळें
 -  व्यभिचाराचा सांवळा गोंधळ
विभाग अठवा
 - कोकणी व मराठी परस्पर संबंध
 - ऐतिहासिक विवेचन
 - कोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति
 - ही कोणत्या राष्ट्राची भाषा?
 - व-हाडी आणि इतर शाखा
 - शब्दकोश
 - व्याकरण
 - साधित शब्द
 - स्वरवैशिष्टय
 - संप्रदाय
विभाग नववा
 - कानडी आणि मराठी तुलनात्मक अध्य़यन
 - पूर्वपीठिका
 - कानडी लिपी
 - शब्दकोश
 - मराठींत कानडी शब्दांचा भरणा
 - कानडी क्रियापदे
 - व्याकरण
 - नामांच्या विभक्ति
 - क्रियापदांच्या विभक्ति
 - लकबा
 - वाड्मय
 - उपसंहार
विभाग दहावा
 -  मराठीचा प्रवास
 -  कानडी विरुद्ध मराठी
 -  चौदावें शतक
 - पुण्यातील जाहीर सभा
 - कर्नाटकांची दुर्दशा
विभाग अकरावा
 -  राधामाधव-विलास-चंपू आणि रा. राजवाडे
 - मराठ्यांविरुद्ध आगळीक
 - जैन लिंगायतांशी भांडकुदळपणा 
   व महाराष्ट्राची बदनामी
 - केवळ ब्राह्मणेतर द्वेष
विभाग बारावा
 - पुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी(!)
 - श्री शाहू व नाना
 - मराठे व पेशवे
विभाग तेरावा
 - मराठेतर कोण?
विभाग चौदावा
 - वेदोक्त कीं पुराणोक्त
विभाग पंधरावा
 - चातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी
विभाग सोळावा
 - कौलिकता हाच आत्मयी शिक्षणाचा पाया
विभाग सतरावा
 -  पूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च
    शिक्षणाची प्रगति
विभाग अठरावा
 - महाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी
विभाग ऐकोणीसावा
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य)
 - महात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद)
विभाग विसावा

 - ब्रह्मानंद केशवचंद्र सेन:त्यांचे
   विश्वधर्म 
विकासांतील स्थान

 - सिंहलद्वीपांतील डच मिशनच्या
   प्रचारपद्धतीचा मासला
विभाग एकविसावा
 - अस्पृश्यांची शेतकी परिषद
विभाग बावीसावा
 - मुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें
 - मध्यभाग
विभाग तेवीसावा
 - प्रांतिक सामाजिक परिषद सातारा
 - समाजसुधारणा यशस्वी कां होत नाही?
 - सामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ
 - ध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य
 - तपशिलाचें वर्गीकरण
 - सांप्रदायिक अस्पृश्यता
विभाग चोवीसावा
 - संस्थांनी शेतकरी परिषद, तेरदळ
 - जागतिक मंदी
 - चळवळीचा कोंडमारा
 - परिषदेचें सहकार्य
 - बोल्शेव्हिझमचा बागुलबोवा
 - संघटना
विभाग पंचविसावा
 - अखिल भोर संस्थान प्रजापरिषद
 - इतिहास
 - चालू स्थिती
 - भावी सुधारणा
विभाग सव्वीसावा
 - वाळवें तालुका शेतकी, परिषद, बोरगांव
 - मालकी हक्क
 - अवर्षण, कीड मुंगी, भिकार-बुणगे
 - मग महारामांगांचे काय हाल वर्णावेत !
 - सौम्य उपाय
 - भविष्य
विभाग सत्ताविसावा
 - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर
 - शेतकरी व सरकार
 - शेतकरी आणि भांडवलदार
 - शेतकरी आणि कॉग्रेस
 - विधायक घटना
 - जमीनदार वर्ग
 - कुणब्यांची जूट
 - अमेरिकेंतले शेतकरी
 - महाराष्ट्राचा गांवगाडा
 - सामाजिक व धार्मिक बाबी
 - शेतक-यांचा स्वयंनिर्णय
विभाग अठ्ठाविसावा
 - ब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग
 - फ्याचून
 - तुबायाझा
 - सगाईन
 - न्याँऊ
विभाग एकोणतीसावा (परिशिष्ट पहिलें.)
 - भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिलें)
  -भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे)
 - ब्राह्म समाज आणि बौद्धधर्म: व्याख्यान तिसरे
विभाग तिसावा (परिशिष्ट दुसरे.)
 - INDIAN CIVILIZATION
 - टीपा
 - परिशिष्ट चौथें