मुख्यपान

महर्षी शिंदे यांनी आपल्या लेखनातून समाजसुधारणेचे विचार मांडले. त्यांनी ‘उपासना’ या मासिकातून व ‘सुबोधचंद्रिका’ या साप्ताहिकातून लेखन केले. बहिष्कृत भारत (संशोधनात्मक प्रबंध), भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्र्न - या लेखनाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यतेचा प्रश्र्न समाजासमोर मांडला. हॉलंडच्या धार्मिक परिषदेत सादर केलेला ‘हिंदुस्थानातील उदार धर्म’ हा त्यांचा प्रबंध त्या काळी गाजला होता. त्यांनी ‘आठवणी आणि अनुभव’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तकही लिहिले आहे. १९३४ च्या बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषविले.


एक सत्याग्रही म्हणून ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होते. उपरोक्त संस्थांसह त्यांनी राष्ट्रीय मराठा संघ, समता सैनिक दल, बहुजन समाज पक्ष या संस्था-संघटनांच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य केले. मुरळीची प्रथा, अस्पृश्यांना मंदिर प्रवेश, होळी उत्सवातील बीभत्स प्रकार या सर्वच समस्यांबाबत त्यांनी लक्षणीय कार्य केले. शेतकर्‍यांच्या समस्याही त्यांनी अभ्यासल्या, त्यासाठी शेतकर्‍यांच्या संघटनाचाही त्यांनी प्रयत्न केला.

 

 

अस्पृश्यांच्या उद्धाराचे, विकासाचे कार्य करायलाच हवे, अस्पृश्यांमध्ये आत्मविश्र्वास निर्माण करायलाच हवा, त्याचबरोबर सवर्णांच्या मनातील अस्पृश्यतेची भावना नष्ट करणेही तितकेच महत्त्वाचे आहे या विचाराचा त्यांनी नेहमी पुरस्कार केला.  

आपल्या हयातभर प्रामुख्याने अस्पृश्योद्धारासाठी झटणार्‍या महर्षी शिंदे यांचे २ जानेवारी, १९४४ रोजी निधन झाले.