इंग्लंडमधील रोजनिशी (18 Aug. 02)

18 Aug. 02
The bonne1 bonne banks of Loch Lomand
By you bonne banks & by you bonne braes2
Where the sea shines bright on Loch Lomand
Where me & my true Love will never meet again
On the bonne bonne banks of Loch Lomand
Chorus
For I'll take the high road & you'll take the low road
And I'll be in Scottland before you
Where me & my true Love will never meet again
On the bonne bonne banks of Loch Lomand.
It was there that we parted on your shady glen
On the steep steep side of Ben Lomand
Where the heilen3 heather grew & the heilen hills to view
And the moon coming out in the gloaming4
Chorus – For I'll take the high road etc.
The wee5 birds sing & the wild flowers spring
And in sunshine the waters are sleeping
But the broken hearted keans6 naa7 second spring
So the cen8 may cease from their greating9
again chorus
By Prof. Blackie of Edinburgh
given by Stella Mclaren

1 pretty, 2 hills, 3 highland, 4 evening, 5 small, 6 knows, 7no, 8 eyes, 9 weeping

ह्या मुलींच्या शुद्ध व सुखी कुटुंबात मी पुढे लिहिल्याप्रमाणे थोडे दिवस घालविले. त्याला अनुसरून अनुभव वरील काव्यात आहे !६२

आदित्यवार १७ आगष्ट १९०२
काल दोन प्रहरी इनव्हर्हुलन झोपडीतून वुडबर्न कॉटेजमध्ये आलो. हे स्थान अगदी शांत व स्वच्छ आहे. घराच्या भिंतीजवळून एक धबधबा धबधबत आहे. wood वुड् म्हणजे रान आणि बर्न म्हणजे ओढा असा स्कॉच शब्द. वुडबर्नकॉट=रानटी ओढ्याच्या काठची झोपडी असा अर्थ. नवराबायको, ३ मुली, १ मुलगा, एक भाचा असे हे अत्यंत गोड कुटूंब. बाई प्रामाणिक, अल्पसंतोषी, अती समजूतदार आणि उद्योगी आहे. मुले मूर्तीमंत आरोग्य आणि आनंद आहेत. बेझी, डेझी, डंकन आणि नेली ही त्यांची खालपासून नावे. बॉब भाच्याचे नाव.

संध्याकाळी २ मैलावरच्या एक शाळेत उपासनेस गेलो. बरोबर ५ ही मुले होती. कामामुळे नवराबायकोस येणे झाले नाही. पाऊस पडत होता. उपासनेस सुमारे २५ जण हाजर होते. उपदेशकाने जुन्या करारातील मोजेसची गोष्ट सांगितली. आजारी लोकांस नीट करण्यास मोजेसने एक पितळेचा साप उभा केला. तो ज्यास चावे तो बरा होई. ४ वर्षाच्या बेझीला हे मोजेसचे आणि उपदेशकाचे दीर्घ शहाणपण कोठे समजावयाला ! साप चावे इतके ऐकून तिचे बालअंतःकरण कळवळले. शेवटपर्यंत तिने रडे कसे तरी दाबले. पण संपल्या बरोबर तिचा गळा दाटून ती ओकसाबोकशी रडू लागली. भयंकर गोष्टी सांगून ईश्वराचे प्रेम प्रतिपादण्याचे धाडस आम्ही निदान बालकांपुढे तरी करू नये. धर्मवेडाने त्यांचे मन अद्याप पुरेसे निर्ढावलेले नसते. म्हणून त्यांस साधा खरा व स्वाभाविक धर्मच सांगितला पाहिजे. नाहीतर बिचारी अर्भके रडून अगर घाबरून आपली नापसंती दर्शिवतात. पण ती समजून घेण्याची व आपली चुकी सुधारण्याची अक्कल पुष्कळ पंडितमन्य उपदेशकांस नसते, ही खेदाची पण खरी गोष्ट उघड आहे ! `उपदेशक आणि त्याची मुलगी` ही कविता पहा.६३

ता. १९ मंगळवार
लॉख लोमंड सरोवरात स्नान केले. थंड पाण्यात, उघड्या हवेत, इंग्लंड देशातील हे पहिलेच स्नान व बहुतकरून शेवटचे होईल.