लोकमान्य टिळकांचे शिंदे यांना पत्र (PDF पाहण्यासाठी इथे क्लिक करा)
परिशिष्ट १/२
जाहीरनामा
श्री
बहुजनपक्ष
येत्या नवंबर महिन्यामध्यें हिंदुस्थानांत नवीन राज्यपद्धतीची प्राणप्रतिष्ठा व्हावयाची आहे. हा मुहुर्तकाल खास महत्त्वाचा आहे. ह्या काळानंतर हल्लींची पक्षघटना, हल्लींच्या राज्यपद्धतीबरोबर लयास जाऊन नवीन परिस्थितीला अनुसरून नवीन राजकीय पक्ष रचिले जाणार, हें भाकित कित्येक राज्यधुरंधर पुरूषांनी केलें आहे, तें खरें होणार. हल्लींचे “जहाल” अथवा “मवाळ” किंवा “राष्टीय” व “प्रागतिक” हे नांवाचे मुख्य भेद केवळ पद्धतिदृष्टया पडले आहेत. तत्त्वदृष्ट्या नव्हेत. निरनिराळ्या दृष्टीनें पहातां दोन्ही पक्ष राष्ट्रीय किंवा प्रागतिक आहेत असें दिसून येईल. इतकेंच नव्हें, तर हल्ली “राष्ट्रीय’’ हाणविणारा पक्ष सामाजिक बाबतींत जितका व जसा मवाळ आहे, तितका व तसाच “प्रागतिक” हाणविणारा पक्ष सामाजिक बाबतींत जहाल आहे. तात्पर्य इतकेंच कीं, हे पक्ष केवळ कार्यपद्धतीच्या पायावर उभे झाले आहेत. तत्त्वभेदांवर उभे नाहींत. त्यामुळे पुष्कळ वेळां एकाच भूमिकेवर येऊन आपल्या सामान्य तत्त्वांना न सोडतां एक होऊन ह्या दोहों पक्षांना काम करतां येतें. उलटपक्षीं जेव्हां हे पक्ष परस्पर विरूद्ध झगडत असतात तेव्हां तेव्हां ते आपल्या कार्यपद्धतींना अघिक महत्त्व देत असतात किंवा ह्याहूनही कमी दर्जाचीं अशीं कांहीं व्यत्त्किविषयक कारणें घडल्यामुळें त्यांना तात्पुर्ते नसतें महत्त्व येऊन ते भांडत राहतात. अशा दुस-या प्रसंगीं त्या दोघांनाही प्रिय असलेलें जें सामान्य राष्ट्रहित त्यालाही बाधा येते, हें दोघांनाही कळत असतें. असो.
आमच्या भावी राजकारणांत ज्या नवीन नवीन पक्षांच्या पुनर्घटना होत जाण्याचा आज उद्यां संभव आहे, त्यांपैकीं ज्या एका नवीन पक्षाचा आह्यीं वरील मथळ्यांत उल्लेख केला आहे तो पक्ष उभारण्याची शक्यताच नव्हे तर इष्टता, किंबहुना आवश्यकता आहे, असें आमचे नम्र मत झालें आहे. हें मत आमच्या पुष्कळ दिवसांच्या अनुभवानें व निदिध्यासानें झालें आहे. ह्मणून आह्यीं तें जनतेपुढें प्रांजलपणानें आणि निश्चयानें ठेवीत आहों. ह्यावर आमच्या पुष्कळ मित्रांचाही मतभेद होण्याचा पूर्ण संभव आहे. इतरांची तर गोष्टच वेगळी. आमच्याशीं प्रामाणिक मतभेद असलेल्या मित्रांनी जर ह्या मतावर टीका केली तर तिच्यापासून आह्यांला जी शिकवण मिळेल व फायदा होईल, तो आह्यीं अवश्य करून घेऊंच घेऊं. परंतु ह्या आमच्या मतावर वादविवाद करण्याची मात्र आमची इच्छा नाहीं. ज्या अर्थी हें मत आह्यीं जनतेपुढें केवळ पूर्वपक्ष ह्मणून ठेवीत नाहीं, त्या अर्थी त्याला उत्तरपक्ष ह्मणून कसल्याही वादाचा अथवा मताचा स्वीकार करण्याची आह्यांला जरूरी दिसत नाहीं.
व्याप्ति : हिंदुस्थांनातील एकंदर लोकसंख्येचे केवळ राजकीय दृष्टया दोन मुख्य व स्पष्ट भाग पडत आहे ते हे कीं, एक, विद्याबल, द्रव्यबल किंवा अधिकारबलानें पुढारलेला वर्ग आणि दुसरा ह्यांतील कोणतेंच बल अंगी नसल्यामुळें व नाइलाजामुळें मागासलेला वर्ग, किंवा बहुजनसमाज. ह्या दुस-या वर्गांतच अगदीं तिरस्कृत अशा “ अस्पृश्य” वर्गाचा अंतर्भाव होतो. हल्लींच्या राजकीय सुधारणेचा नुसता अरूणोदय होतो व होतो तोंच ह्या दोन भागांमध्यें मोठा विराध भासूं लागला. आणि ह्या विराधानुसारें बहुजनसमाजाचा अथवा मागासलेल्या वर्गाचा एक आतां जवळ जवळ नवीन पक्षच होऊन चुकला आहे, असें ह्मणण्यास हरकत नाहीं. ह्यालाच केव्हां केव्हां ब्राह्मणेतर पक्ष असेंही नांव दिलें जातें; पण नाइलाज आणि बलहीनता हीं जीं मागासलेल्या वर्गांचीं मुख्य लक्षणें, तीं ह्या वर्गाच्या पक्षास “ब्राह्मणेतर पक्ष” असें केवळ जातिविशिष्ट नांव दिल्यानें अगदीं काटेकोर रीतीनें सार्थ होत नाहीं. ह्मणूनच ह्या नवीन पक्षास “बहुजनपक्ष” अथवा “जनपदपक्ष” अशीं अगदीं सार्थ आणि निर्विकल्प नांवे दिल्यानें ह्यावर कसलेही आक्षेप आणणारास जागा उरणार नाहीं. जाती. धर्म अथवा सामाजिक डामडौल इत्यादि जे केवळ भावनात्मक विषय असतात, त्यांचा राजकारणांतील व्यवहारांशीं किंवा पक्षांशीं प्रत्यक्ष रीतीनें संबंध पोहोंचत नाहीं. ह्मणून अशा विषयांच्या पायावर किंवा सबबीवर राजकीय पक्षाची उभारणी करणें इष्ट होणार नाहीं, किंबहुना शक्यही नाहीं, असा इतिहासाचा अनुभव आहे. ह्यासाठीं आमच्या ह्या “बहुजनपक्षा” शीं देखील ह्या किंवा असल्या इतर आगंतुक विषयांचा तत्त्वत: संबंध नाहीं, हें निराळें सांगावयास नकोच. कारण, आमचा हा पक्ष केवळ ऐहिक हितसंबंधाच्या भरीव पायावर रचिलेला आहे. जात, धर्म अथवा देश एतदविषयक द्वेषाच्या किंबहुना प्रेमाच्या पोकळ भावनात्मक पायावर नव्हे. व्यत्त्कि किंवा व्यत्त्किसमूह कोणत्याही जातीचा अथवा कोणत्याहि धर्माचा अथवा देशाचा असो किंवा नसो, ते सर्व ह्या नवीन पक्षांत सामील होऊं शकतात. मात्र त्यांचा हितसंबंध आणि आमचा हितसंबंध एक असले पाहिजेत. इतकेंच नव्हे तर अशी त्यांनीं उघड उघड कबुली देऊन एकनिष्ठेची प्रतिज्ञा केली पाहिजे.
कार्यपद्धति : मुसलमान, ख्रिस्ती, शीख, यूरोपियन इत्यादिकांना स्वतंत्र मतदारसंघाचे सवलतीचे हक्क मिळाले आहेत. परंतु त्या हक्कांच्या बळावर हे वर्गही डोईजड होण्याचा संभव मात्र निःसंशय आहे. खरोखरच ते डोईजड होतील तर त्यांच्या आणि बहुजनसमाजाच्या हितसंबंधांत परस्पर विरोध उत्पन्न होणार. ज्या अर्थी अशा विरोधामुळेंच हिंदु समाजांतील पुढारलेल्या वर्गांशीं वेगळें होऊन, स्वतंत्रपणानें हा नवीन पक्ष उभा करावा लागत आहे, त्या अर्थी, वरील परदेशी किंवा परधर्मी लोक जर डोईजड होऊन आमच्या हितसंबंधांच्या आड येतील तर त्यांच्याशींही अगदीं स्वतंत्र बहाण्यानें ह्या पक्षाला वागावें लागेल, हें उघड आहे. तथापि ही महत्त्वाची गोष्ट देखील सर्वांनीं ध्यानांत ठेवणें जरूर आहे कीं, हा नवीन पक्ष जरी इतरांशीं स्वतंत्रपणानें वागणार आहे तरी जेथें जेथें त्याच्या हितसंबंधाचा प्रश्न उभा राहील, तेथें तेथें त्याचा समानतेचा दर्जा संभाळून जी कोणी व्यत्त्कि असो अथवा पक्ष असो, त्याला सक्रीय साह्म करावयास तयार असेल, त्याच्याशीं तेवढ्यापुरतें सहकार्य करावयाला हा पक्षही तयार राहील. कारण ह्या पक्षाच्या पायाखाली केवळ पोकळ मनोभावना नसून, भरीव हितसंबंध आहेत. त्यांची राखण आणि पुरस्कार करण्याचें निस्पृह काम ह्या पक्षाला आपल्याच पायांवर उभा राहून व आपल्याच हातांनीं करावयाचें आहे. आमचे सहकारी ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असोत, मवाळ कीं जहाल असोत, किंबहुना स्वकीय असोत कीं परकीय असोत, त्यांनी कोणतींही नांवें, रूपें किंवा मतें स्वीकारिलीं असोत, फार तर काय त्यांचा पूर्वेतिहास कसाही असो, जोंपर्यंत आपल्या हितसंबंधांचा पुरस्कार प्रामाणिकपणानें आणि जोरानें त्यांच्या हातून होईल अशी आमची खातरजमा कायम राहील, तोंपर्यंतच आह्यी त्यांच्याशीं व तेवढ्यापुरतेंच सहकार्य करावयास मोकळे राहूं. एरवीं त्यांना आमचा रामराम. थोडक्यांत सांगावयाचें झाल्यास आह्यी आमच्या दोस्तांशीं समान दर्जानें केव्हांही करण्यास तयार, पण त्यांच्यांत सामील होण्यास तयार नाही; आणि जर कोणी आमचे दुष्मन असतीलच तर त्यांनाही पण आमचा दुरूनच रामराम! पण त्यांचाही द्वेष करण्यास आह्यीं तयार नाहीं. कारण द्वेषावर आमचा मुळी भरंवसाच नाहीं. आमचे कोणी हितशत्रु आह्यांला हे द्वेषाचें शुभवर्तमान शिकविण्यास आलेच तर त्याप्रसंगीं परमेश्वरच आमचें रक्षण करील.
हितसंबंध : आमची व्याप्ति व पद्धति वर सांगितली. पण आमची मुख्य मदार आमच्या विशिष्ट हितसंबंधांवरच आहे. हे हितसंबंध केवळ मनोभावनांवर किंवा एकाद्या तात्त्विक सामान्य सिध्दांतावर अवलंबून नाहींत. ते नित्याच्या व्यवहारांशी व ऐहिक नफ्यातोट्यांशी निगडीत आहेत. असे हे विशिष्ट हितसंबंध अर्थांतच असंख्य असल्यामुळें, त्यांची पूर्ण यादी तयार करणें हें कांहीं सोपें काम नाहीं व त्याची आज व्यावहारिक जरूरीही पण नाहीं. सामान्य स्वरूपानें त्यांतील कांहींचा येथे निर्देश करणें जरूर आहे. तथापि ही गोष्ट सर्वांनींच ध्यानांत ठेवणें अवश्य आहे. कीं, धर्म अथवा तत्त्वज्ञान ह्यांतील विषय किंवा मुद्दे ज्या प्रकारे त्रिकालाबाधित व शाश्वत स्वरूपाचे असतात, तसा राजकारणाचा प्रकार मुळींच नाहीं. बुद्धीबळांतील मोह-यांप्रमाणें राजकाराणांतील मुद्यांचा रोखच नव्हें तर ठावठिकाणही बदलणें भागच पडतें. राजकारण हें व्यवहारशास्त्र आहे. त्याचेहि नियम आहेत. पण त्या नियमांचे कायमचे साचे बनवितां येत नाहींत. आपल्या अंतिम ध्येयाला बाधा न आणतां आपले स्थान बदलणें, आपलें धोरण बळकट राखूनही आपला दर्शनी रोंख बदलणें, इत्यादि डावपेच राजकारणांत जो खेळेल तोच टिकेल. आणि अशा डावपेंचांत जो निर्भ्रांत प्रामाणिकपणा राखील, वाटेंत कोणत्याहि मोहाला वश होणार नाहीं, संकटाला जुमानणार नाहीं, कीं कपटाला बळी पडणार नाहीं तोच ह्या खेळांत अखेरी मारील. ह्मणूनच राजकारणाचा जरी कोत्या दृष्टीच्या कांहीं लोकांनीं एकाद्या वेश्येप्रमाणें धिःकार केला आहे, तरी जे खरे दूरदर्शी आहेत त्यांनी ह्याची अत्युच्च कर्मयोगांत गणना केली आहे. ही दूरदृष्टि शाबूत ठेवूनच खालील हितसंबंधांचे निदर्शन करण्यांत आलें आहे.
१ शेतकरी वर्ग - ह्यांत डोईजड जमीनदारांचा अथवा पिढीजाद जहागीरदारांचा समावेश मुळींच होऊं शकत नाहीं. जो आपल्या मालकीचें अथवा कौलाचें शेत आपणच वाहतो, आणि त्या कामासाठीं पुरेशा मजूरदारांना समान दर्जानें योग्य वेतन देऊन सांभाळतो. तोच शेतकरी जाणावा पाश्चात्य देशांत अशालाच “पेझंट प्रोप्रायटर” हाणतात. तो जरी स्वतंत्र असला तरी, त्याला कोठेंही धन, विद्या अथवा अधिकार नसल्यामुळें, अद्यापि तो सर्वत्र मागसलेला राहिला आहे.
२ शिपाईवर्ग - ह्यांत सरदारांची गणना मुळींच नाहीं. कारण अधिकारबलामुळें त्यांचा समावेश पुढारलेल्या वर्गांत करणें योग्य आहे. हितसंबंधांच्या विरोधामुळें बहुजनपक्षांत हे सामील न होणे साहजिकच आहे. पण सामान्य शिपायांचे हितसंबंध आमच्या पक्षानेंच राखले पाहिजेत. कारण ते मागासलेलेच आहेत. कुणबी हा सर्वांचा खरा पोशिंदा आणि मोठमोठे ऐतखाऊ जमिनदार अथवा जहागिरदार हें केवळ त्याचे पोष्य होत! तसेंच हातावर शीर घेऊन लढणारा एकांडा शिलेदार हाच खरा क्षत्रिय होय. तो केवळ पट्टेवाला चपराशी नव्हे. त्याच्या बळावर किताब मिळविणारे व पिढीजाद पेन्शनें झोडणारे सरदार हे जातीनें क्षत्रिय असले तरी ते मागसलेले नसतात ह्मणूनच त्यांच्या हितसंबंधांची काळजी आमच्या पक्षाला वाहाण्याचें कारण नाहीं. पण शिपाईगिरी मात्र आह्यीं राखलीच पाहिजे. ती आह्यी आनंदानें राखूं.
३ शिक्षक वर्ग - ह्यांत सोंवळेंशास्त्री, हक्कदार पुरोहित किंवा बलुते जोशी हे असल्या इतर ऐतखाऊंची गणना करतां येत नाहीं. वाड्मयाचें किंवा उद्यमाचे व्यावहारिक शिक्षण देण्याला जे कोणी लायक आहेत, आणि जे आपल्या वृत्तीचा पिढीजाद हक्क न सांगता बाजारभावाप्रमाणें चालू वेतन घेण्यास तयार आहेत, त्यांची जात, धर्म, देश कांहीं असो, त्यांचे हितसंबंध ह्या पक्षानें राखणें जरूर आहे. कारण तेही मागासलेलेच आहेत व त्यांचे हितसंबंध हे राष्ट्रीय आहेत.
४ उद्यमी - सुतार, सोनार, साळी, शिंपी, गवळी, माळी, तेली, तांबोळी, इत्यादी दिसण्यांत लहानसान धंदे करून राष्ट्राची सेवा करणारे जे अशिक्षित आणि अनधिकारी वर्ग आहेत, हेही राष्ट्राचे धारक असून ह्यांचा दर्जा शेतकरी किंवा शिपाई यांच्यापेक्षां रतीभरही कमी नाहीं ते मागसलेले आहेत. नाटकवाले, गोंधळी, शकून सांगणारे जोशी आणि पोवाडे गाणारे शाहीर, फार तर काय पण वैदू आणि पोरक्या मुलांना पाजणा-या दायांचीही जरूरीं प्रसंग विशेषीं ह्या बहुजन-समाजरूपी बळीराजाला लागते. तर मग त्यांच्या हिताचा विसर त्याला कसा पडेल?
५ दुकानदार - ह्यांत व्याज देऊन दुस-यांचे भांडवल वळवून आणून त्यावर गब्बर होणारे पेढीवाले वर्ज्य आहेत, असें समजावें. परंतु उद्यमी लोकांच्या व मजुरांच्या साह्याने जी राष्ट्रीय संपत्ति शेतक-यांनें निर्माण केली व शिपायानें राखिली तिची देशभर वांटणी होण्याला बिनव्याजी भांडवलवाल्या दुकानदारांचीही तितकीच जरूरी आहे. तोही जोंवर मागसलेला राहील, आणि डोइजड होऊन बहुजनसमाजाचें रक्त बिन हक्क शोषणार नाही तोंवर त्यालाही पुढें आणण्यासाठीं आमच्या पक्षानें झटणें अवश्य आहे.
६ मजूरवर्ग - ह्यांत बाजारभावाप्रमाणें वेतन घेऊन अंगमेहनत करणारेच नव्हें तर बुद्धिचातुर्य लढविणारे वकील, डॉक्टर ह्यांचाही समावेश होण्याचा संभव आहे. परंतु हा दुसरा वर्ग आपल्या विद्याबलामुळें आपल्या गरजेपेक्षां ज्यास्ती धनसंचय करून अधिकारपदावरही जाऊन सहज बसतो. इतकेंच नव्हे तर आपल्या विद्येच्या व चळवळी स्वभावाच्या जोरावर बहुजनसमाजाचेंही पुढारीपणही बहुतेक हिस्से त्याच्याच वांट्याला येंते. आणि मग सगळीच कालवाकालव होऊं लागते. असे लोक तत्त्वतः मजूर असले तरी वस्तुतः मागसलेले नसल्यामुळें, त्यांच्या हितसंबंधाची जोपासना करण्याची जबाबदारी दुर्बळ जन-पद-पक्षावर न ठेवतां, त्यांच्या स्वतःवरच ठेवणें अधिक योग्य होईल. बाकी उरलेल्या ख-या आणि अंगमेहनती मजुरांची दाद तर आमच्या पक्षाशिवाय इतर कोठेंच लागणें शक्य नाहीं. बाजारभावाप्रमाणे आपल्या मजुरीचे दर, कामाची वेळ, विश्रांतीच्या अटी, बाळपण, आजारीपण, ह्यातारपण, कौटुंबिक आणि स्त्रीपणाच्या आपत्ति इत्यादि कारणांवरून उद्भवणारे हक्क वगैरेंची मागणी करण्यास हा वर्ग मोकळा आहे, ह्याविषयीं तर प्रश्नच नाहीं. पण ही मागणी राष्ट्राचें समवाय-हित सांभाळून, ती पूर्ण रीतीनें वसूल करून घेण्याचें सामर्थ्य त्यांच्या अंगी येईल अशी संघशक्ति त्यांच्यामध्यें आणणें हें ह्या पक्षाचें अत्यंत महत्त्वाचें, जरूरीचें आणि कठिण असें कर्तव्य आहे. तथापि हा पक्ष ह्मणजे केवळ मजूरपक्षच नव्हे. तो जनपदपक्ष असल्यामुळें सर्व राष्ट्राचा पक्ष आहे. मजूर डोईजड झाल्यास त्याची समजूत करण्याचाही अधिकार सर्वांपेक्षां ह्या पक्षालाच जास्त आहे.
७ अस्पृश्यवर्ग - अस्पृश्यपणामुळें हा वर्ग मागसलेला आहे, इतकेंच नव्हें तर चिरडला आहे. धर्माची, परंपरेचीं, रूढींचीं, अगर दुसरीं कोणतींही खरीं खोटीं कारणें सांगत न बसतां ह्या वर्गाची अस्पृश्यता व असाह्मता पूर्णपणें नष्ट करून त्यांना अगदीं समानदर्जानें बहुजनसमाजांत एकजीव करणें हें ह्या पक्षाचें केवळ पवित्र काम आहे. तें तातडीनें केलें तर धडगत आहे. पुष्कळशी संधी वायफळ वादांत, ढोंगी ठरावांत आणि मतलबी सहानुभूतींत अगोदरच दवडली गेली असल्यामुळें, ह्या वर्गांतील कांहीं व्यक्तींना साहाजिकपणें भलतेंच वळणही लागून चुकलें आहे. ही ठेंच खाऊनही आमच्या पक्षाचे डोळे उघडले नाहींत तर ते कायमचे झांकलेले बरे, असें ह्मणण्याची पाळी जवळ येऊन ठेपली आहे!
८ स्त्रीवर्ग - चालूं राज्यक्रांतींत आमच्या देशांतील स्त्रीवर्गाचे हातीं कांहींच लाभलें नाही ह्मणून आमच्या पक्षानें हताश होण्याचें कारण नाहीं. उलटपक्षीं, आमचा पक्ष विद्वानांचा नाहीं, वतयांचा नाहीं, ह्मणून तो स्त्रीवर्गाला विसरणारांचा आहे असें थोडेंच होणार आहे! स्त्रीवर्ग म्हणजे तर आमचा पाळणा! त्यांची हयगय करूं तर पाळण्यांतच आमचे थडगें डोलूं लागेल हे आह्यीं पूर्ण जाणून आहों. ह्याची साक्षही आह्यी थोडी बहुत पटवून दिली असतांही नामधारी “राष्ट्रीय’’ आमच्यावर रागावतात आणि “प्रागतिक”’ ही आयत्या वेळेस आमच्यावर रुसतात. पण आज नाहीं उद्यां तरी जागरूक स्त्रियांच्या ध्यानांत खरा प्रकार आल्याशिवाय राहणार नाहीं.
येथवर आह्यीं केवळ वर्गवारीनें हितसंबंधांचें निरीक्षण केलें. पण ज्यांची अशी वर्गवारी मुळींच करतां येत नाहीं असे पुष्कळ हितसंबंध आहेत. त्यांचा पुरस्कार करण्याची जरूरी पुढारलेल्या पेक्षांही मागसलेल्यांसच जास्त आहे, हें बारकाईनें विचार केल्याशिवाय स्पष्ट दिसणार नाहीं. उदाहरणार्थ सक्तीच्या शिक्षणाचा, मद्यपाननिषेधाचा, धार्मिक विधि आणि सामाजिक परंपरा पाळण्याचे बाबतींत स्वयंनिर्णयाचा, इत्यादि कोणताही प्रश्न घ्या.
हे सर्व राष्ट्रीय असूनही, स्वत:स “राष्ट्रीय” म्हणवून घेणाराच पक्ष जेव्हां त्यांच्या आड येतो आणि “प्रागतिक” म्हणवून घेणारा पक्षही आपले हात टेंकतो तेव्हां बहुजनसमाजास जागें करून त्याला स्वत:च्याच पायावर उभें करण्याचें कठीण काम करण्यासाठीं आमच्यासारख्या एकाद्या नवीन आणि स्वतंत्र पक्षाला पुढें यावें लागतें, ह्यांत आमचा नाइलाज आहे. निदान आमची प्रौढी तरी खास नाहीं. इतकेच नव्हें तर ह्या पूर्वीच हा पक्ष निर्माण झाला नाहीं आणि पुढें तरी ह्याचे हातून काय होणार, याची खातरजमा नाहीं, तोंपर्यंत ह्या विषयावर अधिक विचक्षणा करण्याचें देखील आम्हांला धैर्य येत नाहीं. राष्ट्रहिताची ज्याला चाड असेल, ज्याचे हितांचा आमच्याशीं विरोध नसेल, ते सर्व आम्हांला सामील होतील, निदान साह्म तरी करतीलच. इतर वावदूकांच्या वाटेला जाण्याला आम्हांला वेळ नाहीं. त्यांच्या उपटसूळ वादांवर आमचा विश्वासच नाहीं, ह्यांत आमचा तरी काय इलाज?
वरील विवेचन आम्हीं केवळ आमच्या अनुभवानें केलें आहे. तें निर्भ्रांत आहे, असा आमचा भ्रम झालेला नाहीं, एवढी तरी आमच्यामध्यें जागृति आहे. वरील विवेचनांत चूक असेलच तर ती जोंपर्यंत आम्हांला दिसत नाहीं, तोंपर्यंत आम्हीं उगाच खोळंबून राहावें हें आम्हांस आत्मघातकी व देशघातकीपणाचें वाटत आहे. पक्षाची रचना किंवा घटना व्हावयाची आहे. हा लेख त्याची जाहीर प्रस्तावना एवढ्याच भावनेनें प्रसिद्ध करण्यांत येत आहे. पुढील कार्य ईश्वरी संकेतावरच अवलंबून आहे.
विठ्ठल रामजी शिंदे.
नानाची पेठ, भोकरवाडी,
पुणे, ता. १ सप्टेंबर १९२०
परिशिष्ट ३
अखेरचे वृत्त
महर्षी अण्णासाहेब शिंदे यांच्या निधनाची वार्ता एक सार्वजनिक कार्यकर्ते श्री. जकाते यांनी कर्ण्यावरून शहरभर सांगितली. हस्तपत्रिका वाटूनही ती जाहीर करण्यात आली. सकाळपासून दुपारी १ वाजेपर्यंत शहरातील विविध थरांतील मंडळी ‘रामविहारा’ मध्ये येऊन अण्णासाहेबांचे अखेरचे दर्शन घेत होती. दीड वाजता त्यांच्या घरामधून स्मशानयात्रा निघाली. स्मशानयात्रेला नगरध्यक्ष श्री. बाबुराव जेधे, श्री. बापूसाहेब सणस, रॅं. र. पु परांजपे, प्रिं. केशवराव कानिटकर, श्री. बापूसाहेब पारगे, शंकररीव मोरे, र. के. खाडिलकर, सकाळचे श्री. बाबासाहेब घोरपडे इत्यादी मंडळी हजर होती. डी. सी. मिशनमधील, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या युनियन बोर्डिंगमधील श्री. शंकरराव खरात इत्यादी विद्यार्थीही आलेले होते. अण्णासाहेबांच्या पार्थिवाला ह्या सर्व जातींच्या व विविध धर्मांच्या विद्यार्थ्यांनी व नागरिकांनी खांदा दिला. ‘रामविहारा’ मधून निघालेली अंत्ययात्रा कॉंग्रेसभवनावरून, नवापूल, बुधवार चौक, मंडईतील टिळक पुतळ्यावरून, विश्रामबाग वाडा, सदाशिव पेठ हौदावरून लकडी पुलावरील स्मशानभूमीत येऊन पोहोचली.
अण्णासाहेबांच्या पार्थिव देहाला डिप्रेस्ड क्लासेस मिशन, पुणे नगरपालिका, महाराष्ट्र साहित्य परिषद, सेवासदन सोसायटी, धनगर समाज, हातगाडी मालकसंघ वगैरे अनेक संस्थांनी तसेच व्यक्तींनी पुष्पहार घातले. स्मशानभूमीवर रॅं. र. परांजपे, प्रिं. केशवराव कानिटकर, डी. सी. मिशनमधील श्री. के. आर. मधाळे, श्री. शंकरराव चव्हाण वकील, श्री. पोटे, जकाते यांनी गौरवपर भाषणे केली व त्यानंतर त्यांच्या पार्थिव देहाला अग्नी देण्यात आला.
अण्णासाहेबांबद्दल बोलताना रॅं. र. पु. परांजपे म्हणाले, “भारताचा जेव्हा सामाजिक कामगिरीचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा त्या इतिहास कै. शिंदे यांना फार उच्च व मनाचे स्थान इतिहासकार देतील.” (सकाळ, पुणे, ३ जानेवारी १९४४.)
संदर्भ - साहित्य
मराठी ग्रंथ
१) आपटे, दा. ना. (लेखक व प्रकाशक)- श्री. सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र, खंड २, बडोदा, १९३६.
२) कर्नाटकी, श्री. ना. - डॉ. सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे चरित्र, श्री. ना. कर्नाटकी, पुणे, १९२७.
३) काणे, पां. वा. - धर्मशास्त्राचा इतिहास: सारांशरूप ग्रंथ-पूर्वाध व उत्तरार्ध, अनुवादक: यशवंत आबाजी भट, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९८०.
४) कीर, धनंजय - डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, पहिली आवृत्ती, १९६६, दुसरी आवृत्ती १९७७.
५) कुळकर्णी, पुरूषोत्तम बाळकृष्ण - नाना शंकरशेट यांचे चरित्र (काळ व कामगिरी), पु. बा. कुळकर्णी, मुंबई, १९५९.
६) केतकर, श्री. व्यं. - (प्रमुख संपादक) महाराष्ट्रीय ज्ञानकोश, विभाग ७वा, महाराष्ट्रीय ज्ञानकोश मंडळ लि, पुणे, १९२४.
७) केसकर, बी. बी. नाईक, रा. ना. - उच्च जीवितसरणी (रावसाहेब वामन सदाशिव सोहोनी यांची व्याख्याने) बी. बी. केसकर, विलेपार्ले, १९४२.
८) केसकर, बी. बी. - बाबण बापू कोरगांवकर, रावसाहेब वामन सदाशिव सोहोनी, विलेपार्ले, १९४३.
९) केसकर, बी. बी. - संसार व धर्मसाधन, (व्दा. गो. वैद्य यांचे धर्मपर लेख व व्याख्याने), बी. बी. केसकर, विलेपार्ले १९३५.
१०) केळकर, न. चिं. - गतगोष्टी अर्थात माझी जीवनयात्रा, य. न. केळकर, पुणे, १९३९.
११) केळकर, न. चिं. - लोकमान्य टिळक यांचे चरित्र, उत्तरार्ध-खंड २, न. चिं. केळकर, पुणे, १९२८.
१२) केळकर, न. चिं. - लोकमान्य टिळक यांचे चरित्र, खंड,३ न. चिं. केळकर, पुणे, १९२८.
१३) केळकर, माधव - एका वेडया समाजिष्टाचे बरळणे अथवा महाराष्ट्रातील प्रार्थनासमाजाचे अंतरंग, (अन्य तपशील अनुपलब्ध).
१४) कोठारी, वा. रा. - जुन्या आठवणी, संकल्प प्रकाशन, पुणे, १९७३.
१५) कोत्तापल्ले, नागनाथ - जोतिपर्व, स्वरूप प्रकाशन, औरंगाबाद, २०००.
१६) खराटे, ग. वा. - डॉ. संतूजी रामजी लाड यांचा परिचय, (सन १८४१ ते १९१६), ग. वा. खराटे, मुंबई, १९५४.
१७) खैरमोडे, चांगदेव भवानराव - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (चरित्रखंड १), प्रताप प्रकाशन, मुंबई, पहिली आवृत्ती, १९५२, तिसरी आवृत्ती १९७८.
१८) खैरमोडे, चांगदेव भवानराव - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, खंड १, सुगावा प्रकाशन, पुणे, चौथी आवृत्ती, १९९२.
१९) खैरमोडे, चांगदेव भवानराव - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र द्वितीय खंड (सन १९२० ते १९३० पर्यंत), बौद्धजन पंचायत समिती, मुंबई, १९५८.
२०) खैरमोडे, चांगदेव भवानराव - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचे चरित्र (खंड तिसरा), प्रताप प्रकाशन, मुंबई, १९६४.
२१) खैरमोडे, चांगदेव भवानराव - डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड ५,चिटणीस, पब्लिकेशन कमिटी, डॉ.आंबेडकर एज्युकेशन सोसायटी, मुंबई, १९६८.
२२) गाडगीळ, नरहर विष्णू - पथिक (भाग पहिला), व्हीनस प्रकाशन, पुणे, १९६४.
२३) चंदावरकर, ग. ल. (संपा.) - प्रार्थनांति परमेश्वर (प्रार्थनासमाजाच्या दुस-या पिढीतील नऊ पुढा-यांची चरित्रे) कार्यवाह, मुंबई प्रार्थनासमाज, मुंबई, १९६९.
२४) चव्हाण, यशवंतराव - कृष्णाकाठ, प्रेस्टीज प्रकाशन, पुणे, १९८४.
२५) चव्हाण, रा. ना. व - महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे, (काही आठवणी), डी. पाटील, डी. एल. (संपा.) एल. पाटील, महर्षी शिंदे विद्यामंदिर, वाई, १९७४.
२६) चव्हाण, वैशाली (संपा.) - सेवितो हा रस वांटितो आणिका || उदार धर्मपर लेखांचा संग्रह, रा. ना. चव्हाण, वैशाली रमेश चव्हाण, सातारा, १९९६.
२७) चिटणीस, ग. य. - माझ्या आठवणी (माया चिटणीस ह्यांच्या लेखासह), पॉंप्युलर बुक डेपो, मुंबई, १९५५.
२८) चौगुले-पारगावकर, पी. के. - शापित महात्मा, लोकवाड्मय गृह, मुंबई, १९९९.
२९) चौसाळकर, अशोक - नवरात्र, लोकवाड्मय गृह, मुंबई, २०००.
३०) जव्हेरे, कृष्णाबाई - प. वा. सीतारामपंत जव्हेरे यांचे चरित्र, कृष्णाबाई जव्हेरे, मुंबई, १९४५.
३१) जाधव, पंजाबराव रामराव - कर्मवीर भाऊराव पाटील जीवनदर्शन, कर्मवीर प्रकाशन, पुणे, पहिली आवृत्ती, १९६४.
३२) जाधव, रमेश - लोकराजा शाहू छत्रपती, सुरेश एजन्सी, पुणे, १९९७.
३३) जावडेकर, शं. द. - आधुनिक भारत, सुलभ राष्ट्रीय ग्रंथमाला, पुणे, दुसरी आवृत्ती, १९५३.
३४) जोगळेकर, मृणालिनी - स्त्री-अस्मितेचा आविष्कार: एकोणिसावे शतक, भाग ३, ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे, पॉप्यलर प्रकाशन, मुंबई, १९९१.
३५) जोशी, एस्. एम्. - मी, एस्. एम्. कॉंटिनेंटल प्रकाशन, पुणे, १९८४.
३६) जोशी, लक्ष्मणशास्त्री - जोतिचरित्र, नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, नवी दिल्ली, १९९२.
३७) जोशी, लक्ष्मणशास्त्री - (प्रमुख संपादक) मराठी विश्वकेश, खंड ४, सचिव महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. मुंबई, १९७६.
३८) टोपे, त्र्यं, कृ. - म. गो. रानडे: व्यक्ती, कर्तृत्व आणि कार्य, रोहन प्रकाशन, पुणे, १९९२.
३९) ठोसर, ल. दे. (संपा.) - मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड: तीन व्याख्याने, ल. दे. ठोसर, चिटणीस, मराठा स्टुडंट्स ब्रदरहूड, पुणे, १९१४.
४०) दिघे, पी. डी. - दोन कर्मवीर, रवींद्र सबनीस ट्रस्ट, कोल्हापूर, १९९२.
४१) दिवेकर, महादेवशास्त्री - पहिली चार पुस्तके-अस्पृश्योद्धार विचार, प्राज्ञ पाठशाळा मंडळ, वाई, १९२६.
४२) दिवेकर, महादेवशास्त्री - हिंदूसमाज समर्थ कसा होईल, महादेवशास्त्री दिवेकर, वाई, दुसरी आवृत्ती, १९३०.
४३) देशपांडे, स. वि. (संपा) - मराठी साहित्य संमेलन, बडोदे अधिवेशन, बडोदे चिटणीस, मराठी साहित्य संमेलन, बडोदे, १९३४.
४४) देसाई, परशुराम सदाशिव (अनु.) - पंडित शिवनाथशास्त्री यांचे आत्मचरित्र, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९७३.
४५) नवलकर, हरिश्चंद्रराव नारायणराव - श्रीयुत शिवराम जानबा कांबळे यांचे त्रोटक चरित्र सत्याग्रहाचा इतिहास, पुणे, १९३०.
४६) पंडित, नलिनी - आंबेडकर, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, १९९६.
४७) पळशीकर, वसंत (अनु.) - गोपाळ कृष्ण गोखले-ब्रिटिश राजवट व भारतीय नेमस्त युग, विश्वकर्मा साहित्यालय, पुणे, १९८६.
४८) पवार, गो. मा. (संपा) - महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे यांची रोजनिशी, औरंगाबाद, मराठवाडा साहित्य परिषद, १९७९.
४९) पवार, गो. मा. - विठ्ठ्ल रामजी शिंदे, (राष्ट्रीय चरित्रमाला),नॅशनल बुक ट्रस्ट इंडिया, नवी दिल्ली, १९९०.
५०) पवार, गो. मा. - विठ्ठ्ल रामजी शिंदे, (भारतीय साहित्याचे निर्माते माला), साहित्य अकादेमी, नवी दिल्ली, २०००
५१) पाटणकर, वसंत (संपा.) - ग. स. भाटे: एक वाड्मयसमीक्षक, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ आणि प्रतिमा प्रकाशन, मुंबई-पुणे, १९९५.
५२) पाटील, एन्. डी. - महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे: एक उपेक्षित महात्मा, प्रबोधन प्रकाशन ज्य़ोती, कोल्हापूर, १९९९.
५३) पाटील, पां. चि. - माझ्या आठवणी, मौज प्रकाशनगृह, मुंबई, १९६४.
५४) पानतावणे, गंगाधर - पत्रकार डॉ. आंबेडकर, अभिजित प्रकाशन, नागपूर, १९८७.
५५) पाळेकर, भगवंत - ‘जागृति’कार पाळेकर, आत्मवृत्त आणि लेखसंग्रह, अ. भ. पाळेकर, बडोदे, १९६१.
५६) पोतदार, दत्तो वामन - लो. टिळकांचे सांगाती, केसरी प्रकाशन, पुणे, १९७५.
५७) पांगारकर, लक्ष्मण रामचंद्र - चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र, लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, नाशिक, १९३८.
५८) फडके, य. दि. -केशवराव जेधे, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८२.
५९) फडके, य. दि. (संपा.) - दिनकरराव जवळकर समग्र वाड्मय, महात्मा जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, १९८४.
६०) फडके, य. दि. (संपा.) - महात्मा फुले समग्र वाड्मय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, सुधारित चौथी आवृत्ती, १९९१.
६१) फडके, य. दि. - विसाव्या शतकातील महाराष्ट्र, १९०१-१९१४ खंड १, अध्यक्ष, सासवड आश्रम विश्वस्त मंडळ, सासवड, १९८९.
६२) फडके, य. दि. - विसाव्या शतकातील महाराष्ट्र, (राजकीय इतिहास: १९१४-१९२०), खंड २, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८९.
६३) फडके. य. दि. - विसाव्या शतकातील महाराष्ट्र (राजकीय इतिहास: १९२१-१९२९), खंड ३, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९१.
६४) फडके. य. दि. - विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड ४, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९९३.
६५) बागल, माधवराव - बहुजनसमाजाचे शिल्पकार, ग. ल. ठोकळ, पुणे, १९६६.
६६) बापट, स. वि. - लो. टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका, खंड २, पुणे, १९२५.
६७) बाबर, कृष्णराव भाऊराव - कर्मवीर विद्यार्थी, कृ. भा. बाबर, भिलवडी, १९३०.
६८) बाबर, रा. कृ. - महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे आणि वाई ब्राह्मसमाज, साकेत प्रकाशन, औरंगाबाद, १९९१.
६९) बिजें, वासुदेवराव - क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व, वा. लिं. बिजें, मुंबई, १९०३.
७०) भावे, सविता - प्रधान मास्तर, अमेय प्रकाशन, पुणे, १९९९.
७१) मद्वण्णा, यशवंत दादा - स्व. अण्णासाहेब लठ्ठे जीवन व कार्य, अध्यक्ष, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी, सांगली, १९७९.
७२) माटे, श्रीपाद महादेव - चित्रपट, (मी व मला दिसलेले जग), व्हीनस प्रकाशन, पुणे, १९५७.
७३) मून, वसंत (संपा.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बहिष्कृत भारत आणि मूकनायक, शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई, १९९०.
७४) मोटे, ह. वि. (संपा.) - त्र्यंबक शंकर शेजवलकर, निवडक लेखसंग्रह, ह. वि. मोटे, मुंबई, १९७७.
७५) मोटे, ह. वि. (संपा.) - विश्रब्ध शारदा, खंड पहिला, ह. वि. मोटे, मुंबई, १९७२.
७६) मोरे, शेषराव - सावरकरांचे समाजकारण: सत्य आणि विपर्यास, राजहंस प्रकाशन, पुणे, १९९२.
७७) मोरे, सदानंद (संपा.) - जागृतिकार पाळेकर, म. जोतीराव फुले समता प्रतिष्ठान, पुणे, १९९६.
७८) येडेकर, श्याम - ज्ञानभास्कर भास्करराव जाधव, अ. भा. जाधव, कोल्हापूर, १९८१.
७९) राजवाडे, वि. का. - आत्मवृत्त, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८०.
८०) रानडे, महादेव गोविंद - न्या. महादेव गोविंद रानडे ह्यांची धर्मपर व्याख्याने, श्रीधर भांडारकर लायब्ररी फंड, मुंबई, चौथी आवृत्ती, १९४०.
८१) रानडे, रा. द. - परशुरामभाऊ हायस्कूल सुवर्ण-महोत्सव स्मारक ग्रंथ, चिटणीस, सुवर्ण-महोत्सवी स्मारक-ग्रंथ मंडळ, जमखंडी, १९३८.
८२) वलंगकर, गोपाळ बाबा - विटाळविध्वंसन, प्रथम प्रकाशन, मु. मौजे रावढूळ, ता. महाड, जि. कुलाबा, १८८९; सुधारीत आवृत्ती, बाबा आढाव, म. जोतीराव फुले समता
प्रतिष्ठान, पुणे.
८३) वैद्य, द्वा. गो. - नारायण गणेश चंदावरकर, कर्नाटक पूब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९३७.
८४) वैद्य, द्वा. गो. - प्रार्थनासमाजाचा इतिहास, प्रार्थनासमाज, मुंबई, १९२७.
८५) वैद्य, द्वा. गो. - महादेव गोविंद रानडे, प्रार्थनासमाज, मुंबई, आवृत्ती, तिसरी, १९२३.
८६) वैद्य, द्वा. गो. - डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांचे अल्पचरित्र, प्रार्थनासमाज, मुंबई.
८७) वैद्य, द्वा. गो. (संपा.) - रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांचे धर्मपर लेख व व्याख्याने, द्वा. गो. वैद्य, मुंबई, १९३०.
८८) वैद्य, द्वा. गो. (संपा.) - सर नारायण गणेश चंदावरकर यांची व्याख्याने, प्रार्थनासमाज, मुंबई, १९२१.
८९) वैद्य, सरोजिनी (संपा.) - समग्र दिवाकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९९६.
९०) शहा, मृणालिनी व इतर (संपा.) - ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी: विचार आणि कार्य, वा. रा. कोठारी जन्मशताब्दी समिती, पुणे, १९९३.
९१) शिंदे, मा. श्री. - विजयी मराठाकार श्रीपतराव शिंदे, युवराज प्रकाशन, औरंगाबाद, १९७३.
९२) शिंदे, विठ्ठ्ल रामजी - धर्म, जीवन व तत्त्वज्ञान, (संपा. मा. प. मंगुडकर इ.) महाराष्ट्र शासन, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग, मुंबई, १९७९.
९३) शिंदे, विठ्ठ्ल रामजी - भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, (संपा.) मा. प. मंगुडकर इ, समाजकल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रीडा व पर्यटन विभाग, मुंबई, १९७६.
९४) शिंदे, विठ्ठ्ल रामजी - विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने व उपदेश (संपा. बी. बी. केसकर), दामोदर सावळाराम आणि मंडळी, मुंबई, १९१२.
९५) शिंदे, विठ्ठल रामजी - भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, नवभारत ग्रंथमाला, नागपूर, १९३३.
९६) शिंदे, विठ्ठल रामजी - माझ्या आठवणी व अनुभव, भाग १, वत्सला प्रकाशन, पुणे, १९४०.
९७) शिंदे, विठ्ठल रामजी - माझ्या आठवणी व अनुभव, भाग १,२ व ३, श्री लेखन वाचन भांडार, पुणे, १९५८.
९८) शिंदे, विठ्ठल रामजी - शिंदे, लेखसंग्रह, (संपा. मा. प. मंगुडकर),ठोकळ प्रकाशन, पुणे, १९६३.
९९) शिर्के, आनंदीबाई - सांजवात, मौजे प्रकाशन, मुंबई, १९७२.
१००) शिवतरकर, शंकर सीताराम - श्री. सीताराम शिवतरकर मास्तर:समर्पित प्रवास, प्रदीप प्रकाशन, मुंबई, १९९१.
१०१) शेंडे, ना. रा. - ग. आ. गवई: व्यक्ती आणि कार्य, प्रभाकर पांडुरंग भटकर, अमरावती, १९६३.
१०२) सावकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. - जाज्युच्छेदक निबंध, विश्वास प्रकाशन, मुंबई, १९४०.
१०३) स्वामी, दयानंद सरस्वती - सत्यार्थप्रकाश, श्रीमती आर्य प्रतिनिधिसभा, संयुक्तप्रात, कोल्हापूर, १९२६.
१०४) साळुंखे, पी. बी. व इतर (संपा.) - राजर्षी शाहू गौरव ग्रंथ, महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग, सचिवालय, मुंबई, १९७६.
१०५) सुखटणकर, ज. स. - धर्मानंद: आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे आत्मचरित्र आणि चरित्र, गोवा हिंदू असोसिएशन, मुंबई, १९७६.
संपादक आणि चरित्रलेखक
१०६) सूर्यवंशी, कृ. गो. - राजगुरू- अमात्य सर रघुनाथ व्यंकाजी सबनीस, रवींद्र सबनीस ट्रस्ट, कोल्हापूर, १९९१.
१०७) सोमण, सुलोचना - अनुभव मॅजेस्टिक प्रकाशन, पुणे, १९८०.
१०८) साळुंके, श्रीकांत - महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ, बी. रघुनाथ प्रकाशन, परभणी, १९९६.
इंग्रजी ग्रंथ
1) Allen, Rev. Joseph Henry and others - Unitarianism: It’s Origin and History, American Unitarian Association, Boston, 1895.
2) Chakravarti, Satish Chandra Ray, Sarojendra Nath - Brahmo Samaj, The Depressed Classes and Untouchability, Sadharan Brahmo Samaj, Calcutta, 1933.
3) Davis, V. D. - The London Domestic Mission Society, Record Of Hundred Years---1835 to 1935, The Lindsey Press, London, 1935.
4) Ghugare, Shivaprabha - Renaissance in Western India: Karmaveer V. R. Shinde, Himalaya Publishing House, Bombay, 1983.
5) Gore, M. S. - Vittal Ramaji Shinde: An Assessment of his Contribution, Tata Institute of Social Sciences, Bombay, 1989.
6) Hewett, Philip - On Being a Unitarian, The Lindsey Press, London, repr. 1979.
7) Hostler, John - Unitarianism, The Hibbert Trust, London, 1981.
8) Hughes, Thomas - David Livingstone, Macmillan and Co, London, 1889, 13th repr. 1928.
9) Mozoomdar, P. C. - Keshub Chunder Sen, Nababidhan Trust, Calcutta, repr. 1931.
10) Olcott H. S. - The Poor Pariah, Theosophical Society, Adyar, Madras.
11) Porter, David (ed.) - The Gospel, the Spinit, the Church, Bromley, Kent, Send the Light Trust, 1978.
12) Shinde, V. R. - The Depressed Classes Mission Society Of India- What it is and What it Does, Bombay, 1912.
13) Shinde, V. R. - The Theistic Directory and Review of the Review of the Religious Thought in the Civilized World, Bombay, 1912.
14) Short, Basil - A Respectable Society, Moonraker Press, Bradford-on-Avon, 1976.
नियतकालिके
१) सुबोधपत्रिका, मुंबई
२) जागृती, बडोदा
३) राष्ट्रवीर, बेळगाव
४) हंटर, कोल्हापूर
५) विजयी मराठा, कोल्हापूर
६) ज्ञानकोश, पुणे
७) केसरी, पुणे
८) सकाळ, पुणे
९) साप्ताहिक सकाळ, पुणे
१०) नवाकाळ, मुंबई
११) दि प्युरिटी सर्व्हंट, मुंबई
१२) दि टाइम्स ऑफ इंडिया, मुंबई
१३) बॉंम्बे क्रॉनिकल, मुंबई
१४) स्वदेशाभिमानी (कन्नड), मंगलोर
१५) दि इन्क्वायरर, लंडन
१६) दि ख्रिश्चन लाइफ, लंडन
१७) ब्रिडपोर्ट न्यूज, ब्रिडपोर्ट, इंग्लंड
18) De Hervorming (Dutch), Amsterdam
19) De Tijd (Dutch), Amsterdam
20) Nieuwe Rotterdamsche Courant (Dutch), Rotterdam
विशेषांक
१) कालेकर रा. ग. (संपा.) - सत्यशोधक कर्मवीर विठ्ठ्ल रामजी शिंदे स्मृतिअंक, रा. ग. कालेकर, मुंबई, जानेवारी १९५१.
२) ढावरे, रमेश (संपा.) - माणगाव परिषद ६१ वा स्मृति-महोत्सव विशेष अंक, माणगाव परिषद ६१ वा स्मृति-महोत्सव समिती, कोल्हापूर, १९८२.
३) संपादक, नवहिंद - महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे स्मरणिका, कन्नड व मराठी द्विभाषिक विशेषांक, जमखंडी, १९७३.
४) फडके, भालचंद्र (संपा.) - महाराष्ट्र साहित्य पत्रिका, महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे अभिवादन ग्रंथ, कार्यवाह, म. सा. परिषद, पुणे, एप्रिल-मे-जून १९७३.
५) बाबर, रा. कृ. (संपा.) - नारायणराव चव्हाण स्मृतिग्रंथ, द. ना. चव्हाण, वाई, १९७१.
६) भोसले, एस्. एस्. व शिवाजीराव सावंत - महर्षी शिंदे जन्मशताब्दी स्मृती ग्रंथ, अध्यक्ष कर्मवीर वि. रा शिंदे जन्मशताब्दी समिती, कोल्हापूर, १९७४.
७) सेक्रेटरी, डी.सी. मिशन - महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे जन्मशताब्दी स्मारक ग्रंथ, सेक्रेटरी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया, पुणे १९७३.
८) संपादक, लोकसत्ता - लोकसत्ता, दिवाळी विशेषांक, १९९५.
अहवाल
1) Reports of The Depressed Classes Mission Society of India
i) The Third Quarterly Report, Bombay, 9th July 1907.
ii) The Third Yearly Report, Bombay, 17th October 1909.
iii) The Fourth Annual Report, Bombay, 1911.
iv) The Fifth Annual Report, December, 1911.
v) The sixth Annual Report, 1913.
vi) The First Half Yearly Report, Poona Branch, June 1908, and December, 1908.
2)Report of the Reforms Committee (Franchise), Vol. I & II, Superintendent, Govemment Printing Press, India, 1919.
३)भारतीय निराश्रित साहाय्यकारी मंडळीची महाराष्ट्र परिषद, पुणे, १९१२, अहवाल.
4)Report of Thirty Second Session of the Indian Natioal Congress, Jitendralal Banerjee, Calcutta. 1918.
कागदपत्रे
१) महर्षी विठ्ठ्ल रामजी शिंदे यांची कागदपत्रे.
२) श्री. धनंजय कीर यांचा कागदपत्रसंग्रह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
3) Proceedings of The Poz Club, 1901-1907, Manchester College, Oxford.
4) Minute Book (1897-1918), Martineau Club, Manchester College, Oxford.
5) Discussion Society, Minute Book, 1885-1907, Manchester College, Oxford.
मुलाखती
गुरूवर्य बाबुराव जगताप, पुणे
श्री. गणपतराव शिंदे, पुणे
श्री. भाऊराव विष्णूपंत देशपांडे, तेरदाळ
डॉ. दामोदर हुल्याळकर, जमखंडी
श्री. कृ. भा. बाबर, पुणे
श्री. नरहर केशव कानिटकर, पुणे
श्री. बाबुराव हुळ्याळकर, जमखंडी
श्रीमती संजीवनी केळवकर, कोल्हापूर
श्री.एकनाथराव घोरपडे गुरूजी, पुणे
श्री. रा. ना. चव्हाण, वाई
भाई ए. के. भोसले, सोलापूर
लिखित निवेदने
श्रीमती शंकुतलाबाई जमदग्नी, कोल्हापूर
श्रीमती लक्ष्मीबाई प्रतापराव शिंदे, पुणे
छायाचित्रे
खालील व्यक्तींनी आवश्यक ती छायाचित्रे उपलब्ध करून दिली. त्यांचे मन:पुर्वक आभार.
१) भाई माधवराव बागल, कोल्हापूर
२) श्री. दत्ता शिंदे, कोल्हापूर
३) श्री. बन्सीधर जमदग्नी, कोल्हापूर
४) श्री.अशोक वाडकर, कोल्हापूर
५) श्री.मेहबूब ए. गोकाक, जमखंडी
६) श्री. राजा कृष्णराव पाताडे, पुणे
७) सौ. अनुराधा केशव शिंदे, पुणे
८) डॉ. अविनाश बाबूराव जगताप, पुणे
९) श्री. एम्. डी. शिंदे, छायाचित्रकार, पुणे
१०) श्री. नितीन कोत्तापल्ले, पुणे
११) डॉ. एम्. ए. शेख, सातारा
१२) सौ.अपर्णा अरूण केसकर, विलेपार्ले, मुंबई
१३) श्री.माधव दामोदर पटवर्धन, विलेपार्ले, मुंबई
१४) श्री. मिलिंद नगरकर, वांद्रे (पूर्व), मुंबई
१५) ऍड. सौ. नीला विद्यासागर मोरे, सोलापूर
१६) डॉ. गौतम कलघटगी, चेस्टर
१७) डॉ. फिलिप कॉन्स्टेबल, प्रेस्टन
१८) डॉ. के.जी. पठाण, पुणे
१९) श्रीमती सुमती भालचंद्र भिसे, सोलापूर (श्री. दत्तात्रय नागवंशे, मंडाले यांच्या नात)
२०) अधिक्षक पुरातत्त्वलेखाभिगार, कोल्हापूर