प्रकरण १६. महाराष्ट्र परिषद (2)

सध्या एकंदर १४ ठिकणीं २३ शाळा, ५५ शिक्षक, ११०० मुलें, ५ वसतिगृहें, इतर १२ संस्था, ५ प्रचारक असून खर्च एकंदर रु. २४४८५ आहे.

वरील विस्ताराचें निरीक्षण केल्यावर असें दिसून येईल कीं निरनिराळया ४ भाषा चालूं असलेल्या ७ प्रांतांत मंडळीला आपले प्रयत्न करावयाचे आहेत; म्हणूनच तिला हल्लीं भरलेल्या परिषदेसारख्या निरनिराळया ठिकाणीं प्रांतिक परिषदा भरविण्याची जरूरी आहे. अशा परिषदेशिवाय मंडळीला आपल्या कार्याचा विस्तार व दृढीकरण करण्यास दुसरा मार्ग नाहीं.

सरकार, संस्थानिक, म्युनिसिपालिटया आणि परोपकारी संस्था, सर्व जाती आणि सर्व धर्म एकूण ह्या प्रचंड देशांतील सर्व शुभशक्ति ह्यांचें केंद्र ह्या कार्यांत जितक्या अंशानें जास्त साधेल तितक्याच अंशानें अधिक यश येईल हें ध्यानांत वागवून परिषदेचे सर्व सभासद सात्विकवृत्तीनें विचार करतील अशी उमेद आहे.

अध्यक्ष डॉ. भांडारकर यांचें विद्वत्ताप्रचुर आणि संशोधनात्मक असें भाषण झालें. अस्पृश्यतेचें मूळ आणि मीमांसा वेद, उपनिषदें, पाली ग्रंथ, मराठी संतकवी यांच्या आधारें व प्राचीन व अर्वाचीन इतिहासाला धरून मोठया अधिकारयुक्तवाणीनें केली.

यानंतर पुढीलप्रमाणें निरनिराळया व्यक्तींनीं त्या त्या विषयांवर विद्वत्ता पूर्ण अशीं व्याख्यानें दिलीं.

       वक्ता    विषय
(१) गणेश अक्काजी गवई
व-हाडांत ख्रिश्चन मिशननें अस्पृश्यांसंबंधीं केलेलें काम मिशनच्या कार्याशीं तुलना.
२. बी.  एस्. कामत
गुरुकुलाची आवश्यकता.  
३. सौ. लक्ष्मीबाई रानडे
४. रा. गोपाळराव देवधर


सदर.

उपदेशकाची जरूरी.



यानंतर वसतिगृहासाठीं भिक्षापात्र फिरविण्यांत आलें.

५. रा. केशव रामचंद्र कानिटकर            औद्योगिक शिक्षणाची दिशा.
६. रा. भास्करराव जाधव                    सदर.
७. रा. नाथामहाराज (भंगी पुढारी)          सदर.

दिवस दुसरा

८. नामदार बाबासाहेब   - इचलकरंजीकर... उध्दाराच्या कामीं अस्पृश्यांनीं वरिष्ठ वर्गाशीं मिळून मिसळून वागावें.
यांनीं ५० रु. देणगी जाहीर केली.
९. प्रो. गो. चि माटे       - ....सर्वांस अवश्य शिक्षण द्यावें.
१०. न. चिं. केळकर     -
म्युनिसिपालिटया लोकनियुक्त व्हाव्यात व त्यांत अस्पृश्य प्रतिनिधी असावेत.
११. रा. आर. जी. प्रधान  -
सदर
१२. प्रो. हरिभाऊ लिमये  -
..म्युनिसिपालिटींत अस्पृश्य प्रतिनिधी येण्याची वाट न पाहतां त्यांच्या उन्नतीची सोय करावी.
१३. रा. भास्करराव जाधव -                         अस्पृश्यांनीं सरकारी नोकरींत शिरण्याची आवश्यकता व   कोल्हापूर संस्थानांतील प्रयत्न.
१४. रा. जोग इचलकरंजीकरांचे चिटणीस  - महाराजांनीं हत्तीवर अस्पृश्य माहूत नेमल्याचें उदाहरण.
१५. रा. वि. रा. शिंदे    - इचलकरंजी संस्थानांतील प्रयत्न.
१६. रा. एल्. बी. नायडू
    
मुंबई, पुणें येथें मिशनचे स्वतःचे इमारतीची जरूरी.
१७. श्री. महाभागवत, (भावी शंकराचार्य) - सदर
१८. प्रो. लक्ष्मणशास्त्री लेले   - संस्कृतमध्यें. मिशनच्या धार्मिक प्रयत्नांची योग्यता, हे प्रयत्न समन्वयाच्याच पायावर झाले पाहिजेत.
त्याबद्दल मिशनचे आधार.
१९. अध्यक्ष भांडारकर          -  वेदोपनिषदांतील उतारे. वेदकाळीं अशी अस्पृश्यता नव्हती. हल्लींचें विकृत स्वरूप गेलें पाहिजे.
समारोप व रा. वि. रा. शिंदे यांचे आभार.