महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जीवनपट

२३ एप्रिल १८७३  -   जन्म; जमखंडी या संस्थानच्या गावी (हल्ली कर्नाटक राज्यात).
१८९१  -  मॅट्रिक्युलेशन ही परीक्षा उत्तीर्ण.
१८९२  -  जमखंडी येथील हायस्कूलमध्ये शिक्षक.
१८९३-१९९८  -   पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण.
१८९५  -   पुणे येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात स्वयंसेवक. 
- अमेरिकेतील युनिटेरियन धर्मप्रचारक रेव्ह. जे. टी. संडरलँड यांचे भाषण ऐकून
एकेश्वरी धर्मपंथाबद्दल प्रथम माहिती मिळाली.
१८९८  -  प्रार्थनासमाजात प्रवेश व दीक्षा.  
- मुंबई विश्वविद्यालयाची बी.ए. परीक्षा उत्तीर्ण.
१९९९-१९००  -  मुंबई येथे एलएल.बी.च्या दुसऱ्या वर्षाचा अभ्यास.
१९००  - ब्रिटिश ऍंड फॉरेन असोसिएशनच्या वतीने इंग्लंडातील ऑक्सफर्ड येथील
मँचेस्टर कॉलेजमध्ये धर्मशिक्षणासाठी निवड.
१९०१-१९०३  -  ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात तुलनात्मक धर्म, पाली भाषा, बुध्द
धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, 
समाजशास्त्र व तत्त्वज्ञान या विषयांचा अभ्यास.
-  इंग्लंडमधील वेगवेगळया शहरांतील लोकोपयोगी कार्य करणाऱ्या विविध  मिशननी चालविलेल्या संस्थांचे निरीक्षण.
-  इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स, हॉलंड, जर्मनी, स्वित्झर्लंड व इटली या देशांमध्ये प्रवास.
-  तेथील समाजस्थितीचे विशेषतः गरीब लोकांचे अवलोकन. 
प्रेक्षणीय स्थळे, इमारती, चित्रे व शिल्पाकृती पाहिल्या.

१९०३  -   १ ते ४ सप्टेंबर रोजी ऍम्स्टरडॅम येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय उदार
धर्मपरिषदेस ब्राह्मसमाजाचे 
 भारतातील प्रतिनिधी म्हणून उपस्थित. 'हिंदुस्थानांतील
उदारधर्म' या निबंधाचे वाचन.
ऑक्टोबर १९०३  - मुंबई येथे आगमन.  

-  श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या सूचनेवरून बडोदे संस्थानातील अस्पृश्यवर्गासाठी
चालविलेल्या 
शाळांची तपासणी करून महाराजांना अभिप्राय सांगितला.  
-  मुंबई प्रार्थनासमाजाचे प्रचारक म्हणून धर्मप्रचारकाया्रला प्रारंभ. 
पोसटल मिशन, उदार धर्मग्रंथ वाचनवर्ग, 
तरुण ब्राह्मसंघ या कार्याना
नव्याने सुरुवात.

१९०३-०६  -  ब्राह्मधर्म प्रचारार्थ हिंदुस्थानभर दौरा.  अस्पृश्यवर्गाच्या स्थितीचे
अवलोकन. अहमदनगरजवळील 
भिंगार या गावी अस्पृश्यांच्या सभेत भाषण करीत असताना अस्पृश्योध्दाराच्या कामासाठी स्वतःला वाहून घेण्याची प्रेरणा.
१८ ऑक्टोबर  १९०६  -    भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी (डिप्रेस्ड क्लासेस मिशन
सोसायटी ऑफ इंडिया) 
या अखिल भारतीय पातळीवर अस्पृश्योध्दारासाठी कार्य करणाऱ्या संस्थेची स्थापना. क्ष सर नारायण चंदावरकर; स्वतः जनरल सेक्रेटरी.
१९०४-१९१३  -   अखिल भारतीय एकेश्वरी धर्मपरिषदेचे चिटणीस म्हणून कार्य संघटित केले.
१९०८  -   श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बडोदे येथे
लक्ष्मीविलास पॅलेसमध्ये  
अस्पृश्यवर्गाच्या स्थितीबद्दल अभ्यासपूर्ण  व्याख्यान.  'बहिष्कृत भारत' या नावाने पुस्तिकेच्या रूपाने, ध्ये प्रसिध्द.
१९१०  -   मुंबई प्रार्थनासमाजाच्या धुरिणांशी मतभेद झाल्याने प्रार्थनासमाजाचा संबंध सोडला. 
१९१२  -   धर्मकार्याचा एक भाग म्हणून 'दि थीइस्टिक डिरेक्टरी' (The
Theistic Directory and A Review 
Civilzed World) या पुस्तकाचे संपादन व लेखन.
-   धर्मप्रचारार्थ लिहिलेले लेख, व्याख्याने इत्यादिकांचे पुस्तक विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याख्याने
    आणि उपदेश या नावाने बी. बी. केसकर यांनी संपादित केले.
-  भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीचे मुंबई येथील ठाणे पुण्यास हलविले.
-  मिशनची महाराष्ट्र परिषद पुणे येथे यशस्वीपणे भरविली.  सुमारे ४०० स्पृश्य-अस्पृश्य
   जातींचे पुढारी व प्रतिनिधी यांचे सहभोजन.
१९१३-१४  -  गुन्हेगार समजल्या जाणाऱ्या मांग लोकांसाठी हल्लीच्या सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे
मांगांचे शेतकी खेडे वसविण्याचा प्रयत्न असफल.
१९०६-१९१८  -  भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळीच्या कार्याचा पश्चिम व दक्षिण हिंदुस्थानात विस्तार.
१९१६  -  लखनौ करारास - हिंदू-मुस्लीम ऐक्यास  - जाहीर पाठिंबा.
- अस्पृश्यांची स्थिती सुधारण्याबद्दल हिंदुस्थान सरकारास सूचना.
१९१८  -  श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे पहिली अखिल
भारतीय अस्पृश्यतानिवारण परिषद भरविली.
-  अस्पृश्यतानिवारणाचा ठराव मंजूर.  आपण व्यक्तिगत जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही अशा प्रतिज्ञापत्रावर विविध प्रांतांतील तीनशे पुढाऱ्यांच्या अनुमतीदर्शक सह्या मिळाल्या.
१९१९  -   साऊथबरो कमिटीपुढे साक्ष.  जातवार प्रतिनिधित्वासाठी अस्पृश्यवर्गाचा वार
करून त्यांना नऊ टक्के जागा देण्यात याव्यात व त्यांच्याबाबतीत मतदानपात्रतेच्या अटी
शिथिल करण्यात याव्यात अशी मागणी.
-  पुणे नगरपालिकेने मुलांप्रमाणे मुलींनाही सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी यासाठी चळवळ संघटित केली.
१९२०  -  महात्मा गांधींच्या अध्यक्षतेखाली नागपूर येथे अस्पृश्यतानिवारण परिषद.
-  मुंबई कायदे कौन्सिलच्या निवडणुकीस मराठयांसाठी राखवी असलेल्या जागेवरून उभे
राहण्यास नकार.  बहुजनपक्ष या नावाचा जाहीरनामा काढून साधारण जागेवरून
निवडणूक लढविली, तीमध्ये पराभूत.
१९२२  -  मिशनच्या पुणे येथील अहल्याश्रम या इमारतीचे बांधकाम पूर्ण.
१९२३  -  मिशन ताब्यात घेण्याची अस्पृश्यवर्गातील असंतुष्ट पुढाऱ्यांची उत्सुकता
ध्यानात घेऊन मिशनची नवीन घटना तयार करून मिशन अस्पृश्यवर्गाच्या
हाती सुपूर्द केले व मिशनच्या कामातून बाहेर पडले.
१९२४-२५  -  मंगळूर येथे ब्राह्मसमाजाचे आचार्य म्हणून काम.
१९२४  -  त्रावणकोर संस्थानातील व्हायकोम येथे साधू शिवप्रसाद या पूर्वाश्रमीच्या
अस्पृश्यासमवेत मंदिरप्रवेशासाठी सत्याग्रह.
१९२५  -  सातारा येथील प्रांतिक सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.
१९२६  -   कुटुंब हे केंद्र समजून उन्नत धर्माचा प्रसार करण्याच्या हेतूने कौटुंबिक
उपासना मंडळाची पुणे येथे स्थापना.
१९२७  -  बौध्द धर्माचे अवलोकन करण्याच्या हेतूने ब्रह्मदेशचा प्रवास.  तेथील
अस्पृश्यवर्गाची पाहणी.  'ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग' हा संशोधनपर लेख
भारत इतिहास संशोधक मंडळासमोर वाचला.  तसेच 'नवाकाळ' व 'बहिष्कृत
भारत' यांमध्ये प्रसिध्द.
१९२८-१९३२  -  पुणे, बोरगाव, चांदवड, तेरदळ येथील शेतकरी परिषदांमध्ये व भोर
येथील संस्थानी प्रजापरिषदेत अध्यक्ष म्हणून सहभाग.  शेतकऱ्यांना व संस्थानी प्रजेला
मौलिक स्वरूपाचे मार्गदर्शन.
१९३०  -         कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभाग व झंझावती प्रचार.  सहा महिन्यांची
सक्तमजुरीची शिक्षा येरवडयाच्या तुरुंगात भोगली.
१९३२  -        अस्पृश्यवर्गाच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीस विरोध.
१९३३  -        भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा या विषयावरील पहिला ठरणारा संशोधनपर प्रबंध प्रसिध्द.
-  श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड पारितोषिक प्राप्त व महाराजांच्या हस्ते जाहीर गौरव.
-  शिंदे यांच्या प्रेरणेने वाई येथे प्रार्थना संघाची स्थापना.
१९३४  -        मुंबई येथे ४१ संस्थांच्या वतीने जाहीर गौरव व मानपत्रसमर्पण.
१९३५  -        बडोदे येथील मराठी साहित्य संमेलनात तत्त्वज्ञान व समाजशास्त्र या
 शाखा संमेलनांचे अध्यक्ष.
१९३७  -       रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकांच्या शपथविधिीस कर्मवीर भाऊराव
पाटील यांच्या विनंतीवरून आजारी स्थितीत हजर व शुभाशीर्वाद.
२ जानेवारी  १९४४ -  पुणे येथील राहत्या घरी देहावसान.