अहल्याश्रमाची तयारी
लेडी विलिंग्डन : १९१३ सालीं मी पुण्यास येऊन राहूं लागल्यावर मुंबईचे गव्हर्नरचे जागीं लॉर्ड विलिंग्डन हे आले. त्यांची उत्साही पत्नी लेडी विलिंग्डन यांच्या कानांवर माजी गव्हर्नरकन्या ख्रिस्तवासी मिस् व्हायोलेट क्लार्क हिची हकिकत गेली असावी. लेडी विलिंग्डन ह्या पुण्यास राहण्यास आल्याबरोबर पुण्यांतील मिशनचें काम समक्ष पाहण्याची इच्छा त्यांनीं मला पत्रानें कळवली. मला मिस् क्लार्कची आठवण झाली. मोठमोठ्या परकीय अधिकार्यांना त्यांच्या घरच्या मंडळीचें कसें सहकार्य असतें ह्याची मला खात्री पटली. लागलीच मी एक मिशनची जाहीर सभा बोलावली. मोठा शामियाना घातला. अस्पृश्य बायकामुलें व त्यांच्या मदतीला वेळोवेळीं येणार्या गांवांतील प्रतिष्ठित स्त्रियाही बोलावल्या. ठरल्या वेळीं नियमितपणें लेडी विलिंग्डन शामियानांत आल्या. जमलेला मोठा मिश्र समाज पाहून त्यांना आश्चर्य वाटलें. प्रमुख स्त्रीपुरुषांचा परिचय झाल्यावर कामाची अपूर्वता पाहून त्यांना आनंद वाटला. शाळेची टापटीप, विद्यार्थ्यांची प्रसन्न वदनें, विशेषतः त्यांची चित्तवेधक व तालसुरावर झालेली कवाईत पाहून बाई रममाण झाल्या. पुणें शाखेच्या अस्पृश्य मुलांना कवाईत शिकवण्यासाठीं अस्पृश्यवर्गाचाच लष्करी पेन्शनर मिळत असे. बँडच्या चालीवर निशाणीची कवाईत तो फार उठावदार करी. कवाईत संपल्याबरोबर लेडी विलिंग्डन माझ्या कानांवर विनोदानें म्हणाल्या, ''मि. शिंदे हे गरीब लोक पुढें एके काळीं हिंदुस्थानचे राजे होतील !'' तितक्याच विनोदानें मीं उत्तर दिलें, ''बाईसाहेब, आपला आशीर्वाद खरा होणार यांत मला तिळमात्र संदेह नाहीं. पण हे लोक राजे झाल्यावर आपण आपली तशरीफ कोठें न्याल ?'' बाई मनःपूर्वक हंसल्या. पुढें लॉर्ड विलिंग्डननें मिशनला जी वेळोवेळीं उदार मदत केली आणि मिशनच्या चालकांशीं मिळून वागले त्याचें हें पूर्वचिन्ह होतें.
आश्रमासाठीं जागा : ह्यापुढें मी ह्या शाखेच्या स्वतंत्र इमारतीच्या तयारीला लागलों. त्याप्रीत्यर्थ श्रीमंत सर तुकोजीराव होळकरांकडून २०००० रु. ची रोख देणगी मिळाली होती. देणगींतून पुणें शाखेसाठीं ज्या इमारती व्हावयाच्या होत्या त्यांना ''अहल्याश्रम'' हें नांव देण्याचें ठरलें होतें. त्या आश्रमासाठीं प्रशस्त जागा हुडकुं लागलों. नानाच्या पेठेंत जेथें हल्लीं पोलीस क्वार्टर्स आहेत त्याच्या उत्तरेला भोकरवाउी म्हणून अस्पृश्यांची एक कंगाल वसती आहे. ती त्या वेळीं अत्यंत गलिच्छ स्थितींत होती. तिच्या आजूबाजूंस जवळ जवळ दोन फर्लांग मैदानाची उघडी जागा होती. तें सर्व स्थळ इतकें उजाड आणि भयाण दिसत होतें कीं, दिवसाढवळ्या तेथें जाण्याला कोणी धजत नसत. खांचखळगे, कांटेखडेच नव्हे तर जनावरांच्या हाडाचे मोठमोठे सांपळे, चिंध्या, मोडके डबे वगैरे कंगालांच्या संपत्तीचें हें मैदान एक उघडें भांडारच होतें. हल्लीं ज्याला 'आयर्विन रोड' म्हणून मोठें आढ्यतेचें नांव आलें आहे त्यावर पोलीस लोकांच्या वस्तीचें ठाणें असूनही हा रस्ता सामान्यपणें दुरुस्त आणि स्वच्छ ठेवणें हें त्या वेळच्या म्युनिसिपालिटीला आपलें कर्तव्य वाटत नसे. कारण तेथें रहदारी फार नसे. मृतमांस खाण्याची संवय भोकरवाडींतील लोकांना असल्यामुळें तेथें ओंगळ अवशेष चोहींकडे अस्ताव्यस्त पडलेले असत. भोंवतालच्या जुन्या वठलेल्या वटवृक्षावर भयानक पांढर्या गिधाडांचे कळप वस्ती करून होते. प्रसंगीं खून-मारामार्याही होत. अशा स्थितींतलें हें सात एकरांचें मैदान पाहून आमच्या भावी ''अहल्याश्रमाला'' हें ठिकाण योग्य आहे असें मीं ठरविलें. मागितल्याबरोबर ही सात एकरांची जागा (पुणें शहर सर्व्हे नं. ७) आमच्या आश्रमासाठीं पुणें शहर म्युनिसिपालिटीनें ९९ वर्षांच्या करारानें दोन निरिनराळ्या भाडेपट्टया करून आमच्या मिशनच्या स्वाधनी केली. प्रथम ता. २२।७।१५ रोजीं पहिला पट्टा २ एकर ३० गुंठ्यांचा दरसाल १ रु. भाड्यांनें तयार करण्यांत आला. पुढें ही जागा पुरणार नाहीं असें वाटल्यावरून बाकी उरलेल्या ३ एकर २३ गुंठ्यांची जागा ता. १३।४।२२ रोजीं म्हणजे एकंदर ७ एकरांचें मैदान ९९ वर्षांच्या करारानें दरसाल २ रु. भाड्यांनें मिशननें म्युनिसिपालिटीकडून घेतलें. भाड्यांचे हे दोन रुपये केवळ मालकी हक्कासाठीं ठरविण्यांत आले होते. हीं. ९९ वर्षे संपल्यावर पुन्हां वेळोवेळीं नवी भाडेपट्टी करण्याचा अधिकार मिशननें राखून ठेवला आहे. ही जागा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेळीं त्यांच्या संस्थेकडे होती. ती पुढें सरकारकडे जाऊन त्यानंतर म्युनिसिपालिटीची घटना झाल्यावर पुणें म्युनिसिपालिटीकडे गेली होती आणि आतां हें मिशननें प्रसिद्ध ज्योतिबांचेंच काम पुढें चालवलेलें आहे. ह ऐतिहासिक परंपरा सिद्ध करून दाखंविल्यावर पुणें शहर म्युनिसिपालिटीनें हे भाडेपट्टे करून एवढी मोठी जागा देण्याला आढेवेढे घेतले नाहींत आणि त्याला सरकारी मंजुरीही सहजच मिळाली.
शिष्टमंडळ : २०,००० रु. आरंभींची मोठी देणगी, त्यानंतर एवढी मोठी जागा मिळाल्यावर सरकारकडून इमारतीची ग्रँट मिळविणें हें क्रमप्राप्तच होतें. लगेच भावी इमारतीचे नकाशे आणि खर्चाचीं अंदाजपत्रकें वगैरे सोबत जोडून रीतसर अर्ज मदतीसाठीं विद्याखात्याच्या अधिकार्यांकडे पाठविण्यांत आला. १९१३ सालीं जुलैमध्यें लॉर्ड विलिंग्डनकडे खास डेप्युटेशन नेण्यांत आलें. त्यावरून पुणें येथील इमारतीसाठीं रु. २०,००० ची मदत देण्याचा ठराव झाला. ही मदत बादशहा पंचम जॉर्ज यांच्या १९१२ सालच्या भेटीप्रीत्यर्थ वांटलेल्या रकमेंतून हिंदुस्थान सरकारकडून मिळावयाची होती. पण पुढें १९१४ सालीं आकस्मिकपणें महायुद्धाची आपत्ति आल्यानें इमारतीचें हें काम नाइलाजानें व इमारतीच्या खर्चाची रक्कम रोख न मिळाल्यानें सहा वर्षे पुढें ढकलण्यांत आलें.
वरील शिष्टमंडळानें मिशनच्या मुंबई, पुणें आणि हुबळी शाखांतील विद्यार्थीवसतिगृहाचें चाललेलें सुंदर काम आणि एन. एम. वाडिया ट्रस्टीकडून मिळालेल्या देणगीनें, मुंबई आणि पुणें येथें चाललेल्या औद्योगिक शिक्षणाची महत्त्वाची योजना वगैरे चालू गोष्टी लॉर्ड विलिंग्डनला नीट समजावून दिल्यावर त्यांनीं मिशनला विशेष सवलतीची ग्रँट-इन-एड देण्याचें आश्वासन दिलें. मिशनच्या शिक्षणसंस्थांनीं जो खर्च केला असेल त्याच्या निम्म ग्रँट देण्याचें त्यांनीं आश्चासन दिलें. वसतिगृहाच्या मदतीसाठीं ग्रँट-इन-कोडमध्यें कांहींच तरतूद नसली तरी दरसाल रु. २००० पेक्षां जास्त नाहीं इतकी मदत त्यांनीं देऊं केली आणि चालू युद्धाची सबब न सांगतां ही विशेष मदत सालोसाल रोख मिळत गेली.
: १९१३ सालीं मी पुण्यास येऊन राहूं लागल्यावर मुंबईचे गव्हर्नरचे जागीं लॉर्ड विलिंग्डन हे आले. त्यांची उत्साही पत्नी लेडी विलिंग्डन यांच्या कानांवर माजी गव्हर्नरकन्या ख्रिस्तवासी मिस् व्हायोलेट क्लार्क हिची हकिकत गेली असावी. लेडी विलिंग्डन ह्या पुण्यास राहण्यास आल्याबरोबर पुण्यांतील मिशनचें काम समक्ष पाहण्याची इच्छा त्यांनीं मला पत्रानें कळवली. मला मिस् क्लार्कची आठवण झाली. मोठमोठ्या परकीय अधिकार्यांना त्यांच्या घरच्या मंडळीचें कसें सहकार्य असतें ह्याची मला खात्री पटली. लागलीच मी एक मिशनची जाहीर सभा बोलावली. मोठा शामियाना घातला. अस्पृश्य बायकामुलें व त्यांच्या मदतीला वेळोवेळीं येणार्या गांवांतील प्रतिष्ठित स्त्रियाही बोलावल्या. ठरल्या वेळीं नियमितपणें लेडी विलिंग्डन शामियानांत आल्या. जमलेला मोठा मिश्र समाज पाहून त्यांना आश्चर्य वाटलें. प्रमुख स्त्रीपुरुषांचा परिचय झाल्यावर कामाची अपूर्वता पाहून त्यांना आनंद वाटला. शाळेची टापटीप, विद्यार्थ्यांची प्रसन्न वदनें, विशेषतः त्यांची चित्तवेधक व तालसुरावर झालेली कवाईत पाहून बाई रममाण झाल्या. पुणें शाखेच्या अस्पृश्य मुलांना कवाईत शिकवण्यासाठीं अस्पृश्यवर्गाचाच लष्करी पेन्शनर मिळत असे. बँडच्या चालीवर निशाणीची कवाईत तो फार उठावदार करी. कवाईत संपल्याबरोबर लेडी विलिंग्डन माझ्या कानांवर विनोदानें म्हणाल्या, ''मि. शिंदे हे गरीब लोक पुढें एके काळीं हिंदुस्थानचे राजे होतील !'' तितक्याच विनोदानें मीं उत्तर दिलें, ''बाईसाहेब, आपला आशीर्वाद खरा होणार यांत मला तिळमात्र संदेह नाहीं. पण हे लोक राजे झाल्यावर आपण आपली तशरीफ कोठें न्याल ?'' बाई मनःपूर्वक हंसल्या. पुढें लॉर्ड विलिंग्डननें मिशनला जी वेळोवेळीं उदार मदत केली आणि मिशनच्या चालकांशीं मिळून वागले त्याचें हें पूर्वचिन्ह होतें.