२३ एप्रिल १८७३ जन्म (जमखंडी).
१८९१-९२ माध्यमिक शिक्षण पूर्ण.
१८९२-९८ पुणें येथील फर्ग्युसनमध्यें शिक्षण, बी.ए.
१८९८ प्रार्थना-समाजाचे सभासद
१९०१-०३ इंग्लंडमध्यें मॅँचेस्टर कॉलेजमध्यें तुलनात्मक धर्मशास्त्राचा अभ्यास.
१९०६ मुंबई येथें भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळाची स्थापना.
१९१० जेजुरी येथें मुरळी प्रतिबंधक सभा-पुढील मुरळी प्रतिबंधक
चळवळीचीं बीजें यामध्यें सांपडतील.
- प्रार्थना समाजाचा अधिकृत संबंध तुटला.
१९१२ भारतीय निराश्रित मंडळीच्या पुणें शाखेसाठी पुण्यास वास्तव्य.
१९१७ कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनांत अस्पृश्यता निवारणाचा
ठराव संमत.
मुख्य प्रेरणा कर्मवीर अण्णासाहेब शिंदे यांची होती.
१९१८ साउथ बरो कमिशनसमोर साक्ष. ब्राह्मण- ब्राह्मणेतर चळवळ
व डॉ. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील अस्पृश्यांची चळवळ
यांच्याशीं झालेल्या मतभेदाची बीजे या साक्षींत आढळतात.
- मुंबई येथें श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या
अध्यक्षतेखालीं अखिल भारतीय अस्पृश्यता-निवारण परिषद भरविली.
१९२० मुंबई कौन्सिलच्या निवडणुकीसाठी उभे. पराभूत.
१९२३-२४ निराश्रित साह्यकारी मंडळींचा प्रत्यक्ष चालकत्वाचा संबंध तुटला.
ब्राह्म समाजाचे प्रचारक झाले. हिंदुस्थानच्या नैऋत्य किना-यावरील
मंगळूर येथील ब्राह्म समाजाचे आचार्य झाले.
१९३० असहकाराच्या चळवळीत भाग. सहा महिने सश्रम कारावास.
१९३३-३४ राममोहन रॅय यांच्या शतसांवत्सरिक तिथि-प्रित्यर्थ महाराष्ट्र व
बृहन्महाराष्ट्रांत मोठा दौरा. याच वेळीं मधुमेहाची
तीव्र व्यथा झालेली आढळली.
१९३५ बडोदें येथील साहित्य संमेलनांत ‘ तत्त्वज्ञान व समाजशास्त्र ’
या शाखासंमेलनाचे अध्यक्ष.
२ एप्रिल १९४४ मृत्यु.
ग्रंथ
विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेख, व्याखानें आणि उपदेश – संपादक बी. बी. केसरकर १९१२.
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न १९३५.
माझ्या आठवणी व अनुभव १९५८.
इतर माहिती
लहानपणीं कुटुंबांत धार्मिक संस्कार. पुढें कॉलेजमध्यें प्राचार्य गो. ग. आगरकर, ना. ह. आपटे, जॉन स्टुअर्ट मिल्ल, स्पेन्सर यांचे संस्कार. नास्तिकवादाकडे कल. मॅक्समुल्लर यांच्या विचारानें पुन्हा धर्मश्रद्धेकडे कल. पुढें आयुष्यभर जीवनाला धर्मश्रद्धेची बैठक.
- राष्ट्रीय चळवळीकडे १८९५ पासूनच कल. महाराष्ट्रांतील सर्वांगीण सुधारणावादाचे प्रवक्ते.