भागवत धर्माचा जवळ जवळ तीन हजारांहून जास्त वर्षांचा इतिहास अवघ्या पांच व्याख्यानांत आणणें म्हणजे पांच बोटांच्या ओंजळींत गंगानदी धरणेंच म्हणावयाचें. भाषणाचे द्वारें एका तासांत आटोपणें, किंवा लेखाच्या द्वारें वर्तमानपत्राच्या दोन रकान्यांत ती घुसडणें म्हणजे तर एक अजब धाडस. सारांशरूपानें तेंहि करावयाचें आहे. म्हणून श्रोत्यांची व वाचकांची सपशेल माफी मागण्याशिवाय गत्यंतरच नाहीं. टीकाकारांनीं ही माफी ध्यानांत ठेविल्यास मेहरबानी होईल.