कानडीचा वरचष्मा लिपीमध्येंहि दिसून येतो. ख्रिस्त शकापूर्वीं कदंब-घराण्यांतील राजांनीं आपल्या दक्षिणेंतील स्वारीबरोबर मगध देशातूंन जी एक ब्राह्मी लिपि नेली, तिचाच पुढें विकास होऊन हल्लींची कानडी व तेलुगू लिपी झाली आहे असें भूलरचें मत आहे. ११ व्या शतकांत आढळणा-या बालबोधीचें आणि हल्लींच्या कानडी वर्णमालेंतील ब-याच वर्णांचें साम्य दिसून येतें ते वर्ण ग, ण, क, द, ध, न, श, ल हे होत.