विधायक घटना
वरील सर्व विचारसरणी आपल्यापुढें मांडण्यांत माझा मुख्य मुद्दा हा आहे कीं, शेतक-यांनो, तुम्ही राजकारण हा आपला दुय्यम उद्देश ठेवा आणि तुमची स्वतःची आर्थिक व सामाजिक ऊर्फ विधायक घटना करणें हाच मुख्य उद्देश ठेवा; व त्या कार्याला कोणाचीहि वाट न पाहतां आपल्याच पायांवर उभे राहून ताबडतोब लागा. ह्या विधायक संघटनेचीं कांहीं ढोबळ अंगें आहेत, त्यांचा आतां खुलासा करतों.