पुणे, २० मार्च १९२० रोजी मराठा समाजातर्फे सयाजीराव महाराजांना मानपत्र देण्याचा समारंभ श्री. शिवाजी मराठा हायस्कूलच्या मागील पटांगणात करण्यात आला. सदर मानपत्र वाचून दाखविण्यापूर्वी रा. ब. पाटील यांनी म्हटले होते की,
“अमुक एका जातीला खास मदत होण्याची जरूर नाही, अशी विचारसरणी ऐकू येते. परंतु ती चुकीची आहे. कारण असे म्हणणे म्हणजे शिंगरू व मोठे घोडे ह्या दोघांच्यापुढे सारखीच चंदी ठेवण्यासारखे आहे.”
उत्तरादाखल महाराजांचे भाषण झाल्यावर त्यांचे आभार मानताना रा. विठ्ठल रामजी शिंदे म्हणाले की,..................उद्या महाराजांचा मोठा गौरव होणार आहे. त्यावेली साहित्यसेवक तात्यासाहेब केळकर व समाजसेवक गोपाळराव देवधर हे त्यांच्या गळ्यात हार घालतील, मग पाटीलसाहेब कोठे आहे तुमचे शिंगरू व कोठे आहे तुमचा घोडा? तसा काही फरक येथे नाही.