दांभिक देशभक्तांपेक्षा
[महात्मा फुले यांच्यासंबंधी १९२६-२७ साली गुरूवर्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी खालील उद्गार काढले].
“म. फुले हे असामान्य पुरूष होते. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोदक समाजाने महाराष्ट्रात ब्राह्मो समाजापेक्षाही अधिक कार्य केले आहे. या समाजाचे ध्येय उच्च आहे. जोतिरावांनी लिहिलेले ‘सत्यधर्म’ पुस्तक हे सत्यशोधकांचे बायबल आहे. हे पुस्तक ब्राह्मो समाजाच्या प्रार्थनेच्या वेळी आम्ही घेतो. मी छातीला हात लावून सांगतो की जोतीरावांचे चरित्रात महाराष्ट्राचा महत्त्वाचा इतिहास ग्रंथित झाला आहे. दांभिक देशभक्तापेक्षा त्यांची देशभक्ती फारच वरच्या दर्जाची आहे.”